Skip to main content

मोसाद - भाग २

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 23/12/2015 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
. स्थापना झाल्यापासून लगेचचा काळ हा मोसादसाठी अनेक कारणांमुळे खडतर होता. सुरुवातीच्या काळात घडलेल्या दोन प्रकरणांमुळे मोसादची नाचक्की होऊ शकली असती पण संघटनेच्या आणि देशाच्या नेत्यांनी दाखवलेल्या धडाडी, निर्णयक्षमता आणि चिवटपणा या गुणांमुळे मोसादला या प्रसंगांमधून तावून सुलाखून बाहेर पडता आलं. पहिलं प्रकरण म्हणजे इसेर बीरीचं. १९०१ मध्ये जन्मलेला इसेर बीरी हा हॅगन्हाचा सदस्य होता.

अघळपघळ

लेखक रातराणी यांनी बुधवार, 23/12/2015 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला खेळत होता तिच्या केसांशी काल उनाड वारा श्वास रोखूनी पहात होता उभा आसमंत सारा वाऱ्याशी मी त्या असा एक करार आहे केला न चुकता माझ्यासोबत घेऊन येणार त्याला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला येई मातीस चैतन्य हळुवार पाऊल तिचे थबकता जसे आकाशाच्या तनूवर टिपूर चांदणे पसरता मातीशी मी त्या असा एक करार आहे केला पांघरूण म्हणून घेणार आहे माती
काव्यरस

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 22/12/2015 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते. "वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले." सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली. "आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत." ग्रेगने आपला ग्लास उंचावला! "ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!" ग्रेगने मनिषकडे बघितले! मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला. "तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!" आर.एम.

स्त्री-पुरुष समानता - एक चिंतन

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 22/12/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
विसावे शतक हे इतर अनेक कारणांमुळे ओळखले जात असले तरी ‘स्त्री-पुरुष समानता' ह्या दृष्टीने त्याचे अनन्य साधारण महत्व आहे. ह्याच शतकात स्त्रिया पुरुषांसारखे वस्त्र परिधान करून पुरुषांच्या पावलांवर पाय ठेऊन, नंतर पायावर पाय ठेवून, पुढे खांद्याला खांदा लावून आणि कित्येक वेळा पुरुषांच्या डोक्यावर पाय ठेवून काम करू लागल्या. घरापासून बाजारापर्यंत, विनाकारणापासून राजकारणापर्यंत, दैन्यापासून सैन्यापर्यंत, चूली-मूलीपासून वैद्य-वकिलाच्या झुलीपर्यंत, शटल ट्रेनपासून स्पेस शटलपर्यंत, आज सर्वत्र स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे.

श्री.भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 22/12/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविकः मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुन राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही. हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्‍या भक्तगणांची संख्य अगणीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे.

एका दिग्गज कलाकाराला आदरान्जली

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 22/12/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
रफी साहेबांच्या कोट्यावधी चाहत्यांपैकी मी एक सामान्य चाहता. गळ्यात सरस्वती किंवा अल्लाह असणाऱ्या या गायकाचे किती गुण वर्णावेत? एक अष्टपैलू गायक तेवढाच एक विनम्र आणि सच्चा दिलाचा माणूस. ज्या भारतभूमीत असे कलाकार घडले त्या भारतभूमीत जन्म घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले नाही तरच नवल.

माझी कारवार मुर्डेश्‍वर भ्रमंती

लेखक समीर१२३४५६ यांनी मंगळवार, 22/12/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळयाचे दिवस होते. सहज म्‍हटलं बायकोला कुठेतरी फिरायला जाऊ, माझी ब-याच दिवसांची कारवार भ्रमंतीची इच्‍छा होती, जूलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात मी आणि मिसेस आम्‍ही दोघेही कारवार भ्रमंतीसाठी जायला निघालो. त्‍यासाठी सावंतवाडीतून बसची चौकशी केली. सकाळी 7.30 वाजता कदंबा बस होती, पण तिही फक्‍त मडगांव पर्यंत, तेथून पुढे आम्‍हांला दुसरी बस पकडावी लागणार होती. ठरल्‍याप्रमाणे सावंतवाडी स्‍टॅंडवर मडगांव जाणा-या कदंबा बसमध्‍ये बसलो, सावंतवाडी ते मडगांव कदंबा बसचे तिकीट 70 रुपये आहे.

ग्रीस आणि ययातीचे वंशज

लेखक Anand More यांनी मंगळवार, 22/12/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
"अर्धवट" यांनी ग्रीस प्रश्नावर लिहिलेला काळ्या विनोदाचा (black humor) लेख वाचला आणि मी त्याच विषयावर आधी लिहून ठेवलेल्या "ययातीचे वंशज" या लेखाची आठवण झाली. हा विषय आता मागे पडल्याने कदाचित वाचकांना संदर्भ लागणार नाहीत पण मिसळपाव वरील वाचक सुजाण आहेत या विश्वासाने इथे पोस्ट करतोय. _________________________________________________________ घराजवळ जिमखान्याच मोठ्ठ मैदान आहे तिकडे सर्व वयोगटातले लोक चालायला येतात. थोडी उच्चभ्रू स्तरातली लोकांची वर्दळ असते तिथे.

मदत

लेखक मयुरMK यांनी मंगळवार, 22/12/2015 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
मला मिसळपाव वरील नवीन लेखन वाचण्यास अडचणी येत आहे एरर आसे दिसत आहे मदत पानावर सुद्धा प्रतिसाद जाऊ शकत नाही मदत हवी Error The website encountered an unexpected error. Please try again later.

बाजीराव-मस्तानी

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 21/12/2015 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
बाजीराव-मस्तानी बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो. बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे.