एका दिग्गज कलाकाराला आदरान्जली
लेखनप्रकार
रफी साहेबांच्या कोट्यावधी चाहत्यांपैकी मी एक सामान्य चाहता. गळ्यात सरस्वती किंवा अल्लाह असणाऱ्या या गायकाचे किती गुण वर्णावेत? एक अष्टपैलू गायक तेवढाच एक विनम्र आणि सच्चा दिलाचा माणूस. ज्या भारतभूमीत असे कलाकार घडले त्या भारतभूमीत जन्म घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले नाही तरच नवल.
"चौदहवी का चांद हो" सारखं प्रेमगीत
"कोई सागर दिल को बहलाता नही " सारखं विरहगीत
"रे माम्मा रे माम्मा रे" सारखं बालगीत
"बडे मियां दिवाने ऐसे ना बनो" सारखं खट्याळ गीत
किंवा "जान जानी जनार्दन" सारखं मस्तीने ओतप्रोत भरलेले गीत
किंवा भजन किंवा देशभक्तीपर गीत असो , रफिसाहेबानी या सर्व गाण्यात प्राण फुंकून ती अजरामर केली.
" जहां डाल डाल पार सोने की चीडीया करती हो बसेरा वह भारत देश है मेरा" हे देशभक्तीपर गीत आजही आपल्या रोमारोमात देशभक्तीची ज्वाला पेटवते.
"ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान" हे अजरामर भजन तर सामाजिक सलोख्यासाठी केली जाणारी प्रार्थना बनून राहिलिये.
रफी साहेबांची असंख्य भजने आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.
२४ डिसेंबर हा रफी साहेबांचा वाढदिवस. या महान गायकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
गोपी चित्रपटातील रफी साहेबांच्या स्वर्गीय आवाजातील एक भजन खाली देत आहे.
हे भजन ऐकताना आपण अहंकार क्षणभर विसरून शांततेच्या महासागरात विहार करू लागतो.
या क्षणभंगुर जीवनात , सुखात तुम्हाला बरेच साथी मिळतील पण दु:खात तुम्ही एकटेच असाल. परंतु ईश्वर हाच सर्व प्रसंगात आपला असतो. सुख येतात आणि जातात , पण लोभिपणाने माणूस अनेकदा पापाच्या मार्गावर ओढला जातो. एक ईश्वरच मानवजातीवर भेदाभेद न ठेवता निरपेक्ष प्रेम करतो हा संदेश या गीतातून आपल्याला मिळतो.. हा ईश्वर म्हणजे आस्तीकांसाठी आवडत्या देवाचे रूप असतो तर नास्तीकांसाठी ही एक अमूर्त चांगुलपणाची भावना म्हणूया आस्तिक असो वा नास्तिक, हे गाणे ऐकताना कोणीही अंतर्मुख होणारच.
गीतकार - राजेंद्र कृष्ण संगीतकार - कल्याणजी आनंदजी राग : दरबारी
सुख के सब साथी, दुःख में ना कोई।
मेरे राम, मेरे राम, तेरा नाम एक सांचा दूजा ना कोई॥
जीवन आणि जानी छाया,
जूठी माया, झूठी काय।
फिर काहे को साड़ी उमरिया,
पाप को गठरी ढोई॥
ना कुछ तेरा, ना कुछ मेरा,
यह जग योगी वाला फेरा।
राजा हो या रंक सभी का,
अंत एक सा होई॥
बाहर की तो माटी फांके,
मन के भीतर क्यूँ ना झांके।
उजले तन पर मान किया,
और मन की मैल ना धोई॥
वाचने
2979
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
रफीजींबद्दल आपल्या मनात
In reply to रफीजींबद्दल आपल्या मनात by सतिश गावडे
नास्तिकांना भजन ऐकताना काय
_/\_
भक्तिगीते गाताना गायक आपले
In reply to भक्तिगीते गाताना गायक आपले by कंजूस
माझ्या मते कुठल्याही स्त्री गायिकांना...........................
मित्रहो
In reply to मित्रहो by शान्तिप्रिय
असं कसं आसं कासं
In reply to मित्रहो by शान्तिप्रिय
आम्हीही निर्मळ मनाने तुम्हाला
In reply to आम्हीही निर्मळ मनाने तुम्हाला by सतिश गावडे
1111
भाविक नसलेल्यांनाही रफी
छान लिहिलंय.
सौन्दर्य,