युटा आणि अरिझोनाचे वाळवंट - भाग २
भाग १
ब्राईस कॅनियन, होर्शू बेंड आणि अन्टोलोप कॅनियन
आतामात्र माझे निसर्ग सौंदर्याबद्दलचे मत बदलायला सुरुवात झाली होती आणि ब्राईस कॅनियन राष्ट्रीय उद्यानात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता मनाला लागली होती.
ब्राईस कॅनियन राष्ट्रीय उद्यान हे युटा राज्यात आहे. लाखो वर्षे बर्फ, पाऊस, ऊन आणि वारा याचा परिणाम होऊन येथील डोंगरांची झीज होऊन उंचच उंच सुया किंवा सुळके (Needles) झाले आहेत. शेकडो एकर परिसरात लालसर गुलाबी रंगाचे हे सुळके हजारो वर्षांपासून उभे आहेत.
मिसळपाव