मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आर्ट ऑफ लिव्हिंग

महासंग्राम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वेळ : आणीबाणीची काळ : प्यायला उठलेला स्थळ : जागतिक खंड्या पक्षी पालक श्री श्री विजु भौ आपल्या भव्य राज प्रासादात चकरा मारताना विजु भौ : ए कोण आहे का रे तिकडे ???? इकडे आमचा ग्लास रिकामा झाला तरी कोणाच लक्ष नाही. खंड्या ग्लास भर माझा जरा, श्या आजकाल बियर पण गोड लागत नाहिये.... खंड्या : ओ बाबा ते नाही जमणार आता!!!! विजु भौ : (बुचकळ्यात पडून) का म्हणून ??? का म्हणून नाही जमणार, हाय रे दैवा काय आमच नशीब ज्यांना आम्ही मोठ करण्यासाठी दिवसाची रात्र करू खस्ता खाल्ल्या. जिथे पाण्याची बियर करून समस्त तहानलेल्या जनतेची तृष्णा भागवली ते हे दिवस पाहण्यासाठी. अरे हेच का ते अच्छे दिन. एवढे अत्याचार सहन नाही होत रे आता. उचल रे देवा आता मला उचल आणि नेऊन टाक गोव्यात. खंड्या : पपा, तुम कायको टेंशन लेरे मै हूँ ना !! विजु भौ : तू आहेच म्हणून तर टेंशन आहे रे बाळा, जेव्हा पासून तू उद्योगात् लक्ष घातलं, माझं आयुष्यातलं लक्ष उडून जायची पाळी आली आहे.. इथून जायलाच हवं आता, पण जाणार कुठे सगळ्या देशात हिच बोम्बाबोम्ब आहे खंड्या : डोंट वरी पपा मी एक ठिकाण शोधुन काढलंय जिथे आपल्याला कोणी कोणी काही नाही करू शकणार विजु भौ : कुठे ते ??? खंड्या : त्या रवी अंकल नी किनै यमुनेच्या तिरावर एक सांस्कृतिक महोत्सव भरवला आहे. तिकडे ते 'Art of leaving' शिकवतात आहे म्हणे !!!

वाचन 4793 प्रतिक्रिया 0