Skip to main content

अगतिकता

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्याशार गूढगर्भ डोळ्यांत तुझ्या अपेक्षेची मासोळी हलली ते ओझे पेलण्याची ताकद माझ्या इवल्या खांद्यांत आहे का? शंका मनास काजळू लागली तुझे ओठ बोलले काहीतरी विचारांच्या भेंडोळ्यांत गुंतले मन त्यास त्याची जाणीवच ना झाली निर्विकार चेहरा पाहून माझा अश्रू लपवित ते मागे वळलीस मणामणाच्या बेडया दुःखाच्या पायी ओढीत हल्के तू चालू लागलीस थांबवावे तुला वाटले किती पण माझे शरीरच दगड झाले
काव्यरस

झेंडूची फुले

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
"दाखिव सखया मजला तू काय ठेविलास लपवुनी? आणिलास गेंद गुलाबाचे बागेतुनी कुठल्या (चोरुनी?) गजरा किंवा आणिलास तू (दहा रुपये खर्चूनी?) आणिलास नभिचे तारे वा तव हस्ताने याच तोडूनी?" "काय करायचे त्या गुलाबांचे सजावटी? काय करावे की गजरा अन तो माळुनी? काय करतेस ते नभीचे तारेच आणि? प्रिये तुजसाठीच 'झेंडूची फुले' आणिली वाचू आस्वादू चल तो काव्य रस चाखू न विसरु ते खाण्या आतिल खोबरे परंतु!"
काव्यरस

आमच्या मुलींचे पालक

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 07/04/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरी हॉलमध्ये बर्‍यापैकी मोठ्या साइझचा एक फोटो आहे. मी, माझी पत्नी शुभदा आणि तिच्या हातात आठ महिन्यांची आमची कन्या पुनव. मूळ फोटो पंचवीस वर्षें जुना. एकदम ordinary. आमची एक मानसकन्या देखील आहे. तिचं नाव दीपाली. तिच्याकडे हा जुना छोटासा धूसर फोटो होता. फोटोशॉप सॉफ्टवेअरची उत्तम माहिती आणि बरीच मेहनत यांच्या जोरावर तिनी या फोटोला नवजीवन दिलं, एनलार्ज केला, चांगल्या फ्रेममध्ये लावून एक महिन्यापूर्वी आम्हाला भेट दिला. अर्थातच आम्ही कौतुकानी तो हॉलमध्ये टेबलावर ठेवला. आता उत्तरार्ध. शुभदा छपाईची कामं करते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचं ऑफिस बंद होतं.

भूक भागत नाही

लेखक अभिषेक पांचाळ यांनी गुरुवार, 07/04/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाच्या क्षणांना , लागते संकटांची नजर दु:खाच्या अंधारात , हासु नसतेच हजर दु:ख करते कहर , येतो अश्रुंचा पुर अगदी समोरुन दिसते , सुख जाताना दुर दाटते दु:खाचे धुके , पुढे रस्ता दिसत नाही नेमके अशाच वेळी , काय करु सुचत नाही सुख गेलय पळुन , त्याला शोधू तरी कसे माझं नशिब किती वेड , खुळ माझ्यावरच हसे माझी अशी स्थिती बघता , देव येतो मग धावून माझ्याकडचं थोड दु:ख , संगे निघतो घेउन एक त्यालाच ती चिंता , माझी दशा पहावत नाही संकटात पडल्यावर मी , माझ्यावर हासत नाही देतो पाठीवर थाप , पुढे लढण्यासाठी देव येतो माझ्यासंगे , घेऊन कृपेची काठी देऊन मायेचा आधार , दु:ख बाजुला तो करतो माझ्याच या जन्मासाठी , पुन्हा
काव्यरस

सूक्ष्मकथा : जंगल

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 07/04/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
वाघाने डरकाळी फोडली. माकड झाडावर चढले. शेंड्यावर लपून अद्भुत हसले. अन तिथूनच घेतली उडी. खालच्या फांदीवर. वाघ झाडाखाली आला. जिभल्या चाटत पाणी पिला. अन घेतला एक सूर. पाणवठ्यात. ऊन तापले. पाणवठ्याच्या अवतीभवती गिधाडे. सूक्ष्मजंतूंचा नायनाट.अन पाण्यातला वाघ गारगार. कुठून आलं एक हरिण. बिथरुन बसलं काठावर. अन सुसाट पळालं माघारी. सैरावैरा. वाघाने जलक्रिडा केली. मग आला काठावर. अन झाडून अंग फोडली एक डरकाळी. भयचकीत. माकड पुन्हा शेंड्यावर. गिधाडे उडाली आकाशी. अन जंगलातली हरणे हिरव्या कुरणावर. सुसाट पळाली. वाघ जंगलात निघून गेला. पाणवठ्यावर गर्दी.

शून्याचे गणित आणि बळीराजा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 07/04/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य म्हणजे एक भला मोठा भोपळा अशी अधिकांश लोकांची समजूत आहे. शून्यात किती हि जोडा किंवा वजा करा उत्तर नेहमी शून्यच येणारच. पण या शून्यात एका रुपयाला हि अब्जावधी रुपये बनविण्याची शक्ती आहे. फक्त रुपयाला कळले पाहिजे त्याला शून्याच्या कुठल्या बाजूला उभे राहायचे आहे ते. ज्याला शून्याचे हे गणित कळते तो आयुष्यात कधीच मार खात नाही. या वरून मला सदूची आठवण आली. सदू आणि मी एकाच वर्गात होतो. सदूला नेहमी पैकीच्या-पैकी मार्क्स मिळायचे. तो स्वत:ला अत्यंत हुशार समजायचा आमच्याशी नेहमीच कोड्यात बोलायचा. आमच्या अज्ञानावर हसायचाहि. पण त्याचे शून्याचे गणित कच्चे होते. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता.

२. सु.शिं.चे मानसपुत्र- दारा बुलंद

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 07/04/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
१. सु.शिं.चे मानसपुत्र

दारा बुलंद

मागच्या काही भेटीमध्ये सुगंधा काकूंनी (सुगंधा सुहास शिरवळकर) त्यांच्या आठवणी सांगताना एक अशीच आठवण सांगितली. जी बहुदा सुहास शिरवळकर: असे आणि तसे मध्येही आली आहे. सु.शिं.ना भेटायला त्यांचे अनेक फॅन्स महाराष्ट्र , देशभरातून आणि परदेशातून यायचे. त्यातल्या काही मुली खास करून दारा बुलंदला भेटायचे म्हणून सु.शि. आणि काकूंकडे हट्ट धरायच्या. मग त्यांची समजूत काढता काढता शिरवळकर द्वयींच्या नाकी नऊ यायचे.