साथ : एक आकलन
साथ : एक आकलन
- डॉ. सुधीर रा. देवरे
साथ
हा रस्त्यावरचा
दीप क्षीण तेजात
तेवतो एकटा
भीषण काळोखात
- तिष्ठते कुणि तरी
समोरच्या खिडकीत ;
केव्हढी तयाची
सोबत आणिक साथ.
- इंदिरा संत
साथ! श्रीमती इंदिरा संत यांची ही कविता. फक्त आठ ओळींची आणि दोन कडव्यांची आहे. या कवितेतला प्रत्येक शब्द महत्वाचा असून कविता आस्वादण्यापूर्वी तिच्या शब्दांचा – म्हणजेच तिचा भाषिक पसारा पाहू :
हा - कोणताही दीप नव्हे. विशिष्ट दीप.
लघुकथा - थांब!
ब्लॉग दुवा हा
नेहमीचीच गर्दीची वेळ होती.८:५२ ची बदलापूर यायला काही क्षण बाकी होते. महेश ब्रिजवरून धावत धावत येत होता, आपल्या नेहमीच्या डब्याशी पोचण्यासाठी गर्दीतून वाट काढत होता. तो नेहमीच्या जागी जाऊन पोचला आणि उभा राहिला. आज गर्दी जरा जास्तच होती. महेशने मोबाईल बघितला आणि खिशात टाकला. पाकिट, चावी चेक केलं आणि बॅग पुढे घेऊन तयार झाला. ८:५२ ची लोकल आली. चढण्यासाठी एकच झुंबड उडाली. ’अंदर जाओ’, ’अरे काय करतोयस यार माझा पाय आहे’, ’उतरू द्या उतरू द्या!’ सगळा कल्लोळ झाला. महेशला कुणीतरी धक्का देऊन मागे लोटलं.
एकटा !
घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला,
मित्र आला, तो धुरात धुसमटलेला,
आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला,
सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला,
आता तिघे, क्षण बावचळलेला..
इशारा घुमला, YZ मंदावलेला,
येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला..
आता परत आम्ही दोघे,
मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला
हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला...
(सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)
काव्यरस
Confession Box : शकीरा..बहूरुपी आणि..... भाग १
कांदेपोहे खाताखाता टिव्हीवर म्युझिक चॅनलवरील गाणी बघत असताना दारावरची बेल वाजली. टिव्हीचा आवाज म्युट केला व दरवाजा उघडला.
साहेब आहेत का? खाकी वर्दीतल्या व्यक्तीने विचारले.
हो. - मी
कोण आहे ? - बाबांनी विचारले.
पोलिसकाका आहेत. - मी
हातातील वर्तमानपत्र बाजुला ठेवून बाबा पटकन उठून दाराजवळ आले.
आपल्या सोसायटीतील मैदानात कार्यक्रम करायचा आहे, सोसायटीच्या सेक्रेटरीने आपली सही घेऊन यायला सांगितले आहे.
- पोलिसकाका
बाबांनी वाचून वहीत सही केली. ११ वाजता कार्यक्रम बघायला या असे आमंत्रण देऊन पोलिसकाका निघून गेले.
बाबांनी दरवाजा बंद केला व आईला हाक मारून बोलावले.
शृँगार १०
माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला .
फारच वाढल्या आहेत म्हणून त्यांना थोड बारीक करण्याचा आणि आकार देण्याचा प्रयत्न होता पण हे साध कामही किचकट झाल होत . कधी इकडची मिशी बारीक कधी तिकडची . इकडं एक आकार तिकड भलताच फार प्रयत्न करूनही काही जमेना तेव्हा तीन पर्याय राहिले होते आहे तसच राहू देण व हस करून घेण . इतके दिवस अस्ताव्यस्त दाढी मिशा घेऊन फिरत होतो पण आता तो उपाय अशक्य होता .
मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन
नमस्कार,
गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे.
आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे.
माझी ज्युरी ड्यूटी ६
भाग ५
पीडित महिलेची साक्ष बरीच मोठी होती. जवळपास प्रत्येक मोठ्या सुट्टीनंतर दुभाष्या बदलत असे. एकदा एक गंमतीदार दुभाष्या आला होता. अनुवाद करताना एखाद्या नटासारखे चेहर्यावरील हावभाव जिवंत असायचे. कधी खांदे उंच करून, भुवया उंचावून, डोळे मोठ्ठे करून आपले भाषांतर सादर करायचा. तमाम ज्युरी मंडळींची करमणूक होत होती. तो दुभाष्या गेल्यावर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. आश्चर्य म्हणजे जसा दुभाष्या असे तसे त्या साक्षीदार बाईंचा उत्साह कमीजास्त होत असे. ह्या नटसम्राटाच्या वेळी तिच्या उत्तरात एक जोश होता. नंतर काही शांत दुभाषी आले.
मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी
कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे.
सांधीकोपरं
बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं.
सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी.
उघड्या दरवाज्यातनं गांधीलमाशी आत यायची अन वळचणीला जाऊन भिरभिरायची. दिवळीच्या आत तिनं पण भोकं भोकं करुन ठेवलेली. त्यात जाऊन लपायची. एकदा कोळ्याच्या जाळ्यात सापडली अन मरुन गेली. मागे भोकाभोकातली अंडीपिल्ली ठेवून तशीच गेली.
मिसळपाव