Skip to main content

माय

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 08/05/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
माही माय माही माय नाई शिकली लेयनं रातं दिसं मेहनतं जीवं मातीले जायनं चुरुक भुरुक अशी लावे झाकटीतं रई देते पाह्यटीचं मले खायाले सायी चं दई ठूनं हातावरं डोक्सं तिचं वगारु पाजनं शाळेतल्या पोराईचं यकं दोनं आईकनं चुनं भाकरं थापूनं घाई घाई वावरातं कापूस येचता येचता जोळे नख्ख्याईशी नातं सोसून सासरवासं तरी राये समाधानी पोरं शिकतीलं लयं सदा राये ह्याचं ध्यानी दुध तपवूनं राती टाके त्यातं इरजनं व्हते दई,लोनी चं ते नाई नासलं आजुनं

हत्यार( कथा)

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 08/05/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
अभिमन्यू राजाचा दरबार भरलेला आहे.शेजारच्या आदित्यराज्यासोबत होणारया संभाव्य युदधाची छाया सगळया दरबारावर पडली आहे.. राजा अभिमन्यू - सेनापती आपली योजना जाहिर करण्याची वेळ आली आहे. वेळ न दडवता त्या योजनेची माहिती दरबारास दया सेनापती - राजाधिराज अभिमन्यूंच्या योजनेप्रमाणे आपण लहान असुनही मोठ्या पल्लांच्या तोफा तयार करण्याची महत्वकांशी योजना हाती घेतली होती. अरबी धातुतज्ञ्ांच्या मदतीने कैक सालांपासुन यावर गुप्त पद्धतीने काम चालू होते. या तोफा आता वापरण्यासाठी तयार आहेत. केवळ दोन माणसे एक तोफ वाहून नेऊन , वापरुही शकतात.. प्रधान - केवळ दोन माणसे ? असंभवही अरबी कारागिरांनी करुन दाखवले म्हणायाचे !

मराठी टंकलेखन आणि कीबोर्ड लेआउट

लेखक अज्ञात यांनी रविवार, 08/05/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मी नवीन संगणक विकत घेतला आहे व त्यात विंडोस १० आहे. त्यामध्ये मी मराठी आणि जपानी भाषा निवडली आहे. इंग्रजी तसेच जपानी भाषा सुद्धा मस्त चालते. परंतु मराठी चा कळफलक (कीबोर्ड लेआउट) अत्यंत वेगळा आणि कठीण वाटला. गूगलवर शोधल्यावर कोणालाच काही त्रास असल्याचा दिसलं नाही. अजून शोधल्यावर कळले कि तो नवीन कळफलक inscript असून अन्य भारतीय भाषांना पूरक म्हणून बनविलेला आहे. मला यावर काही शंका आहेत.
  • हा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल. मला वाटते त्यासाठी स्वतंत्र कळफलक नसल्याने शिकतांना अडचणी येतील. जपानी कळफलक फोनेटिक असून वापरण्यास अत्यंत सोपा आहे.

रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण... उच्च-दहा प्रसंग!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 08/05/2016 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सादर करीत आहे, रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण... उच्च-दहा प्रसंग! १ ) गावाला जाताना एसटीच्या / मुंबईतल्या मुंबईत बेस्टच्या / माजी पुणे-पीएमटीच्या खिडकीच्या स्वैर नकारात्मक धोरणामुळे बोटांवर होणारा आघात! २ ) दुचाकीवर नीम-जलद गतीने जाताना मध्येच रस्त्यावरचा खड्डा दृष्टिक्षेपात उशीरा शिरल्यानी होणारा 'खड्यात जा!' चा आत्म-आविष्कार. ३ ) शिंकं + लघु / दीर्घ शंका ह्याचा मिलाप. ४ ) फटाका हातात घेऊन हवेत भिराकवुन देण्याचा असफल प्रयत्न. ५ ) वीज गेलेली असताना / काळोखात शेवटची पायरी आहे / नाही ह्याचा बेताल अंदाज. ६ ) गलेभेट किंवा परदेशी गाल-चुम्बन देताना, प्राधान्य नेमक्या कुठल्या बाजूस द्यावे

"काय झालं प्रिन्सदादा?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 08/05/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला हातंच शिल्लक ठेवलं न्हायीत. तुमी बसलात त्याच्या घराबाराची उपटत. त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं. आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली. टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण ती तर थेट हायद्राबादेत पोचली.

एक संघ मैदानातला - भाग ६

लेखक शि बि आय यांनी शनिवार, 07/05/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
वाँर्मअप झाल्यावर मँचसाठी प्लानिंग करण्यासाठी आम्ही एकत्र गोळा झालो. आपापल्या प्लेस ठरवल्या, कोणी कशा रेड मारायच्या, साधारण पहिल्या ५ मिनिटांत काय करायचे, गेमचा स्पीड कसा कंट्रोल करायचा वैगरे ठरवून झाले. आता ग्राउंडच्या पाया पडून आम्ही उतरणार तेव्हढ्यात जागुने परत बोलावले आणि आत अजून एक टी-शर्ट घातला आहे ना विचारले. हे ऐकल्यावर गीताचं डोकच गरम झालं, " ऐ आक्का आता चल ना... का बाहेरच डोक पिकवतेस ?? ती पोर खेळायला आली आहे.. तुला मला घरी न्यायला नाही.." त्यावर जागुने जळजळीत नजरेने तिला उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण गीताने नजरच वळवली.

यशस्वी माघार

लेखक आतिवास यांनी शनिवार, 07/05/2016 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
1 . खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे...

देरसू उझाला....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 07/05/2016 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire मला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज माझे देरसू उझाला हे पुस्तक राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झाले आहे. मला खात्री आहे माझ्