Skip to main content

नटसम्राट आणि कथासम्राट!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 22/05/2016 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नटसम्राट हा एक अप्रतिम चित्रपट आहे. कालच बघितला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कथा अप्रतिम आणि तितकेच महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन सुद्धा उत्तम! मी नटसम्राट नाटक बघितलेले नाही आणि नाटक वाचलेले सुद्धा नाही. म्हणून मनात कसलीही तुलना न करता हा चित्रपट मी बघू शकलो. अशा प्रकारच्या कथा असलेले इतर अनेक मराठी हिंदी चित्रपट येऊन गेले. (उदा. राजेश खन्नाचा अवतार, सुलोचना चा मराठी चित्रपट एकटी, अमिताभचा बागबान, माझं घर माझा संसार, लेक चालली सासरला, माहेरची साडी वगैरे) पण "नटसम्राट" हा अनेक बाबतीत मला "वेगळा" वाटला. यात कुणा एकाचीच बाजू बरोबर आणि एकाची चूकच असा पूर्वग्रहदूषित विचार लेखकाने केलेला नाही.

उनाड दुपार

लेखक अज्ञात यांनी रविवार, 22/05/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
उनाड दुपार - भाग १ झोप... छे! झोप वगौर म्हातारे लोक्स घेतात! झोपेची वेळ तर फार महत्वाची वेळ, अक्ख गाव झोपलेलं आणि तुम्ही मस्त जेवण जिरवायला मोकळे, ताकाची चूळ भरून... दातात अडकलेले लोणी दातांच्या फटीतून खेचत उनाडगिरीला सुरुवात! पहिली भेट विहिरीला.. त्या अर्धमेल्या छोट्या बादलीला पायाने ढकलून बळजबरी 'आत्महत्या' करायला लावत माझे स्वार्थी दोन हात तिला जीवदान देण्यासाठी परत वर खेचत, का तर तांब्यातले पाणी पुरले नाही म्हणून! आणि अश्या ताज्या थंड पाण्याला कोण सोडणार, त्यातच ते पाणी अर्ध अंगावर, मग ते सुखवण्यासाठी उन्हात काठी आणि टायर घेऊन सुसाट ह्या वाडीतून त्या वाडीत.

होरपळ

लेखक रातराणी यांनी रविवार, 22/05/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
"मॅडम तुमच्या आईंचा फोन येऊन गेला दोनदा" बरं म्हणत सवयीने तिनं एप्रनच्या खिशात हात घातला. खिशात फोन काही नव्हता. कामाच्या व्यापात कसं काय आपल्या लक्षात नाही आलं बरं, आज फोन काढलाच नाही पर्समधून, म्हणत तिनं पर्स उघडली. फोन पाहिला तर आईचे सात मिसकॉल. तरीच हॉस्पिटलमधे फोन केलेला दिसतोय. आणि इतक्या वेळा ट्राय केला म्हणजे काहीतरी गंभीर असणार. तसाच तिने आईला फोन केला. हॅलो वगैरे म्हणायच्या आतच पलीकडुन काहीसा रडवेला आवाज आला, "अग अरु त्यांना परत त्रास व्हायला लागलाय. तू लगेच ये" "हम्म आलेच मी" एक खोल श्वास घेऊन अरुंधती गाडीची चावी घेऊन बाहेर पडली. बाहेर रखरखीत ऊन.

बेवजह

लेखक भरत्_पलुसकर यांनी रविवार, 22/05/2016 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका मित्रान हे गाणं पाठवलं. पहिल्यांदा वाटलं काहीतरी रॉक ढिन्कच्याक असेल. पण आश्चर्याचा धक्का बसला. पूर्ण गाणं ऐकून झालं तेव्हा तर अगदी शांत वाटतं होतं. मग हेच गाणं लूप मधे सुरू आहे सध्या. पहिल्यांदा सगळ्याच शब्दांचे अर्थ नाही कळले. पण जे ऐकतोय ते काहीतरी भारीये एवढ कळत होतं. गाण्याचा पहिलाच शब्द हिज्र ए यारा हाच कितीतरी वेळ कळत नव्हता. पण त्याने गाण्याची मजा काहीच कमी नाही झाली. शेवटी रेखतावर त्याचा अर्थ सापडला. प्रिय व्यक्तीपासून दुरावा. म्हणजे मला वाटत होतं की हे गाणं प्रिय व्यक्तीला उद्देशून आहे पण हा तर पठ्ठा त्या दुराव्यालाच उद्देशून गाणं म्हणतोय! अगदी साधीशी गोष्ट.

निषेध!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 22/05/2016 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच सुचत नसेल तर खुशाल कविता लिहायला घ्या.. कवितेला नसतं विषयाचं बंधन पण, पण म्हणून काहीही लिहायचं का? असल्या कवितांचा मी निषेध करतो - जव्हेरगंज

उप संपादकाची व्यथा- असत्यं वद धनं चर

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 22/05/2016 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८५ची गोष्ट असेल. नागपूरहून दिल्लीला परत येत होतो. गुप्ता (टोपणनाव) नावाच्या एका इसमाशी परिचय झाला. २७-२८ एक वर्षाचे वय असेल, माझ्या वयापेक्षा थोडे जास्त. लवकरच आमची गट्टी जमली. तो धंद्याच्या कामानिमित्त दिल्लीला चालला होता. त्याने पत्रकारिताचा अभ्यास केला होता. विदर्भात एका हिंदी वर्तमानपत्रात काही महिने त्याने उपसंपादक या पदावर काम केले होते. परंतु त्याला ती नौकरी सोडावी लागली. मी त्याचे कारण विचारले. तो म्हणाला सत्यं वद धर्मम चर असे शास्त्रात म्हंटले आहे, पण असत्यं वद, धनं चर असे कुठेच म्हंटलेल नाही. शास्त्र नियमांचे पालन केले, त्याचेच परिणाम भोगावे लागले.

सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 22/05/2016 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग २ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु --- एक झोकदार वळण घेउन बस गढीच्या मुख्य दारापाशी येउन थांबली . बाहेरुन दिसणारी गढीची भव्य तटबंदी पाहुन सर्व प्रवाशांची उत्सुकता चाळवली गेली . गढीचा मुख्य दरवाजाही चांगलाच भव्य , बुलंद दिसत होता . "चला मंडळी . आपले मुक्कामाचे ठिकाण आले . सरदार दिठेरीकरांची गढी ." कारेकरांनी सुचना दिली . सर्व प्रवासी लगबगीने खाली उतरले .

चालवायचंच म्हटलं तर...

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 21/05/2016 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर सगळंच चालवलं जातं चालून चालून बिघडल्यावर मात्र चालण्यासारखं काहीच नसतं बिघडवायला काय हो अगदी काहीही चालतं बिघडून पुन्हा चालनं मात्र चालण्यासारखं नसतं