Skip to main content

कोपनहेगन- पॅरीस भटकंती-३

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 11/02/2024 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोपनहेगनच्या रॅडीसन कलेक्शन समोर दिसलेली एक अलिशान गाडी. . सकाळी लवकर जाग आली. आज कोपनहेगनला आल्याचा तिसरा दिवस होता. इथे एक गोष्ट मस्त झाली. वेळेच्या फरकामुळे मला पहाटेच जाग यायला लागली. नाश्ता करून मी ज्यूस घेतले, ते बिन साखरेचे होते. काल मासा बनवणारा आफ्रीकन दिसला, बोलला तू अजून इथंच आहेस? मी सांगीतलं - “नाही, आज आम्ही जाणार”.

व्ही फॉर ... (भाग १)

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 11/02/2024 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
व्ही फॉर ... (भाग १) ----------------- दिप्या एक गँगस्टर होता . मोठा भाईचा उजवा हात ! त्या दिवशीची सकाळ उजाडली तीच भयानक खबर घेऊन... मोठा भाई त्यांच्या गॅंगचा डॉन होता . त्याची हत्या करण्यात आली होती. भाईच्या गावचा उरूस होता . त्यासाठी तो गावाला चालला होता . पहाटेची वेळ . रस्त्याच्या बाजूला वाऱ्यावर प्रसन्न डोलणारी शेतं . फिकट निळ्या आकाशात विहरणारे पक्षी … पण त्याला काय माहिती होतं की - त्याचाही प्राणपक्षी असाच, थोड्याच वेळात, उडून जाणार आहे ते ! त्याच्याबरोबर दहा पोरं होती. तीन आलिशान गाड्या होत्या . सगळ्या प्रकारची हत्यारं होती . परदेशी बनावटीची . अगदी महागाची .

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/02/2024 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे. महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले.

पाकिस्तान-३

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 10/02/2024 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला.

पाकिस्तान-२

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 10/02/2024 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
. शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं? हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईनकाम्फ' मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय. शेवटी, 1947 च्या दोन दशकांपूर्वीच पाकिस्तानची मागणी का उद्भवली? वेगळा मुस्लिम देश यापूर्वीही निर्माण होऊ शकला असता.

प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं..

लेखक Shantanu Abhyankar यांनी शनिवार, 10/02/2024 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. १४ फेब्रुवारी, म्हणजे संतश्रेष्ठ व्हॅलेंटाईन यांच्या नावाचा प्रेमाच्या गावी जाण्याचा दिवस. आपल्या सखीला किंवा सख्याहरीला आपले प्रेम जाहीरपणे सांगण्याची संधी देणारा दिवस आणि अर्थात काही सडक सख्याहरींना आपली जागा दाखवून द्यायचा दिवस. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे अगदी आगळावेगळा दिवस. नेहमीच्या दिवसासारखा हा नाही उजाडत. सूर्यही जरा लाजत, दबकत उगवतो, उषेचा रक्तिमा अधिक गडद भासतो आणि हवाही पॅरिसच्या हवेसारखी धुंद नशीली बनून जाते. त्यातून आज वसंत पंचमी, म्हणजे भारतीय कामदेवाचा उत्सव आणि अभारतीय लव्ह डे असे एकत्र आले आहेत.

‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 09/02/2024 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये अनेक थोर विचारवंत होवून गेले जे मरेपर्यंत आपल्या तत्त्वांना चिकटून राहिले. या राज्यक्रांतीने अनेक नवनवीन विचारांना जन्माला घातले. मुख्य म्हणजे राज्यघटना हा प्रकार जन्माला घातला. हे सगळे असले तरीही ही राज्यक्रांती फ्रान्ससाठी फसलीच म्हणायची... का? ती चर्चा पुस्तकात मनोगतात करण्याचा विचार आहे. राजेशाही नष्ट केली आणि कॅथोलिकांचा प्रभाव कमी केला. फ्रेंच राज्यक्रांतीत जी काही प्रमूख मंडळी होती त्यात एक होता ‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794) त्याने नुसता राजकारणात भाग घेतला नाही तर तो एक अत्यंत बुद्धिमान गणिती होता.

तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 09/02/2024 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
Taljai1 गेल्या काही वर्षांमध्ये बहुसंख्य जनता ही आरोग्याबद्दल जागरूक झाली आहे. योगासने, विविध खेळ, व्यायामशाळा आणि इतर माध्यमांद्वारे आरोग्य आणि स्वास्थ्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. योग्य पोषण, व्यायाम, शारीरिक हालचाल (NEAT exercise) आणि पुरेशी विश्रांती ह्या द्वारे तंदुरुस्ती मिळवण्याचे आणि रोगांना दूर ठेवण्याचे अनेकांचे ध्येय आहे.

ज्योत

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/02/2024 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
रिकाम-टेकडी मोठी तिच्या माथ्यावर माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर मृगजळ साठवितो रोज थोडे थोडे पिऊनी ते दौडतात कल्पनांचे घोडे एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख उडतात - टाळण्यास समीक्षकी डंख कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते
काव्यरस