Skip to main content

आंबा कलाकंद

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 28/05/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम हापूस आंब्याचा रस, १०० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम खवा. सजावटीसाठी पिस्ते काप, केशराच्या काड्या. kalakand कृती: हापूस आंब्याचा रस काढून मिक्सरवर फिरवून बारीक करून घ्यावा. रस मोजून घ्यावा. पनीर आणि खवा एकत्र करून गुठळ्या मोडून घ्याव्या. साखर आणि आमरस एकत्र करून मंद गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की एकत्र केलेले खवा पनीर त्यात मिसळावे. परतत रहावे.

बोर न्हाण

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शनिवार, 28/05/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
चार महिन्यांपूर्वी माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी. आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते.

प्राणिसंग्रहलयांवर(zoo) बंदी घालावी काय?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी शनिवार, 28/05/2016 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
टोकीयोच्या प्राणी संग्रहलयामध्ये अत्यंत कमी जागेत आपले ६० वर्षांचे आयुष्य खर्ची घातलेल्या ट्राजिक हनाको या हत्तीणीचा एकाकीपणामुळे मृत्यु झाला आहे. ही हत्तीण दोन वर्षांची असताना तिला थायलंड ने जपान सरकारला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ति काँक्रीटच्या एका छोट्या जागेत आपले आयुष्य व्यतीत करत होती.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जन्मठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे. http://m.huffpost.com/us/entry/hanako-loneliest-elephant-dies_us_57475c… आपण आज पासून ही

सहावा वेतन आयोग - पगार झाले कमी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 28/05/2016 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
सहावा वेतन आयोग लागू झाल्याचा काही महिन्यानंतरची गोष्ट. माझा एक दाक्षिणात्य मित्र नागराजन (टोपण नाव) माझ्या केबिन मध्ये आला. येताच म्हणाला पटाईतजी, आपको मालूम है, हमारे साथ धोका हुआ है. मी विचारले कसे काय. नागराजन हा हिशोबात हुशार. रोकड अनुभागात काम करण्याचा त्याचा दांडगा अनुभव. निश्चित बिना कुठल्या ठोस आधारा शिवाय तो असे म्हणणार नाही. त्याचे म्हणणे होते जिथे सर्व कर्मचाऱ्यांचा पगार वाढ १.८६% दिली तिथे उच्च श्रेणीच्या अधिकार्यांना २.६७% पगार वाढ दिली यातच सर्व गोम आहे. (अर्थात त्यांचा पगार १.८६ च्या हिशोबाने २६०४० च्या जागी २.६७च्या हिशोबाने ३७४०० वर निश्चित केला गेला).

राजमाची बाईक ट्रीप

लेखक सत्याचे प्रयोग यांनी शनिवार, 28/05/2016 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरील दुव्यावरुन प्रेरणा घेऊन राजमाची बाईक ट्रीप करू करू म्हणता योग काही येत नव्हता.

मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग २, Million Dollar Baby.........

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 28/05/2016 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी पौंगसावस्थेत असतांना काही कारणांमुळे माझे शिक्षणातून लक्ष उडाले.बरीच वर्षे अशी वाया गेली.पण वाचन मात्र सोडले न्हवते.त्याच सुमारास एक कथा वाचनात आली. एका ऋषी कडे एक शिष्य असतो.त्या शिष्याला पण माझ्यासारखाच शिक्षणात रस न्हवता.एक दिवस तो ऋषीचे घर आणि शिक्षण, ह्या दोघांना रामराम करतो आणि परत आपल्या गावी जायला निघतो.वाटेत तहान लागल्यामुळे, तो एका विहिरीपाशी पाणी प्यायला जातो.तेंव्हा त्याला दिसते की, सतत दोरी घासल्या मुळे तिथल्या एका दगडाला चीर पडली आहे.त्याच क्षणी त्याला जाणवते, की एखादे ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवून, ते ध्येय गाठायचा प्रयत्न केला की, आज नाही तर उद्या, ते ध्येय साध्य होतेच. तो पर

डाकिया डाक लाया डाक लाया, कारगिलचा पोस्टमन....

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शनिवार, 28/05/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मे 09,1999,0930 वाजता जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांसाठी एक रजिस्टर्ड पोस्ट पॅकेट हाती होते, ते द्यायला मी आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो, पॅकेट खुद्द साहेबांच्या नावचे होते म्हणून मी सामान्य प्रशासन मधे डाक न देता साहेबांच्या गोपनीय विभागात आलो होतो.

खाद्यपुराण

लेखक अश्विनी वैद्य यांनी शनिवार, 28/05/2016 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- इंग्लंड मधील एक भारतीय रेस्टॉरंट वेळ :- दुपारची पोटात कावळे ओरडायची दिवस :- फेब्रुवारीतल्या थंडीतला एक रविवार (इथे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती वैगेरे बरोबरच्या जेवणाचा उल्लेख किंवा कोणाच्या अचानक झालेल्या भेटीमुळे किंवा ओढावलेल्या प्रसंगामुळे उडालेली धांदल वैगेरे प्रकार लेखात पुढे येणार नसल्याचे आधीच सांगितलेले बरे, लेखाची सुरवात मारे अशी केल्याने उगाच गैसमज नको. ) तर आज खूप दिवसांनी आम्ही तिघी मैत्रिणी, नवरा आणि मुलं ही मनाला चोवीस तास चिकटलेली कवच कुंडलं घरीच काढून ठेवून आयतं हादडायला (जेवायला) इथे एकत्र जमलो होतो.

माझे सत्तुचे प्रयोग (छायाचित्र दिलेली नाहीत)

लेखक सुंड्या यांनी शुक्रवार, 27/05/2016 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
तसा सत्तु हा प्रकार महाराष्ट्रीय लोकांसाठी अपरिचित नाही परन्तु सत्तुचा अथवा त्यापासुन बनविलेल्या खाद्य पदार्थांची रेलचेल 'आपल्याकडे' कमीच (असं माझं मत आहे! जाणकारांनी सुधारणा करण्यास मदत करावी हा आग्रह). गेल्या काही वर्षापासून उत्तर-प्रदेश, बिहार मधील मंडळींच्या संपर्कामुळे सत्तुचे काही खाद्यपदार्थ खाण्यात आले व आवडले सुद्धा आणि ते स्वतःच्या स्वयंपाकघरात व्यवस्थितपणे बनवु शकलो, अश्याप्रकारे आमच्या स्वयंपाक-घरात सत्तूची रेलचेल सुरु झाली.