Skip to main content

प्राणिसंग्रहलयांवर(zoo) बंदी घालावी काय?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी शनिवार, 28/05/2016 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
टोकीयोच्या प्राणी संग्रहलयामध्ये अत्यंत कमी जागेत आपले ६० वर्षांचे आयुष्य खर्ची घातलेल्या ट्राजिक हनाको या हत्तीणीचा एकाकीपणामुळे मृत्यु झाला आहे. ही हत्तीण दोन वर्षांची असताना तिला थायलंड ने जपान सरकारला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ति काँक्रीटच्या एका छोट्या जागेत आपले आयुष्य व्यतीत करत होती.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जन्मठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे. http://m.huffpost.com/us/entry/hanako-loneliest-elephant-dies_us_57475c… आपण आज पासून ही शपथ घेऊयात की कोणत्याही प्राणी संग्रहलयाला आपण भेट देनार नाही, जिथे अत्यंत तोकड्या जागेत प्राणी डांबुण ठेवलेले दिसल्यास PETA वा तस्तम प्राणिमित्र संघटनांना निदर्शनास आणुन देऊ प्राण्यांनाही मन असते ,या भावनेतून अशी वागणुक कुठल्याच प्राण्याला देऊ नये फिशटॅंक मध्ये मासे पाळणे ,पिंजर्यात पक्षी पाळणे वा तत्सम क्रूर गोष्टी घरी आनू नयेत .
लेखनविषय:

वाचने 4876
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

तुमचे एकुण आयडी आहेत तरी किती हो. "चंद्रनील मुल्हेरकर" हा आयडी उडाला बहुतेक तुमचा, इतक्या लवकर आयडी अ‍ॅप्रव्हुल तरी कसे होतात तुमचे. http://www.maayboli.com/node/58837 http://aisiakshare.com/node/5202

In reply to by प्रसाद_१९८२

मला वाटत ते 10 12 आयडी साठी रिक्वेस्ट टाकून ठेवत असतील. 1 आयडी ब्लॉक झाला कि नवीन रिक्वेस्ट टाकून 10 12 आयडी पैकी एखादा वापरत असावेत. जुना आयडी। ब्लॉक होई पर्यंत नविन आयडी तयार ☺

In reply to by प्रसाद_१९८२

याचे सध्याचे मिपावय आहे १ वर्ष ६ महिने. म्हणजे दिड वर्षापुर्वीच याने हा आयडी घेतला होता. आधीचे वापरलेले अनेक आयडी बंद झाल्यावर हा न वापरलेले बाकीचे आयडी वापरतो. एकच लेख अनेक ठिकाणी टाकताना एकाच आयडीने ते सर्व स्थळावर टाकण्याची साधी काळजी सुध्दा न घेतल्याने मग तो पकडला जातो. अवांतर : सध्या पीएचडी करायचा विचार करतो आहे. 'एखाद्या संस्थळावर अनेक आयडी घेण्याचे फायदे तोटे' या विषयावर प्रबंध सादर करावा म्हणतो. स्वर्गीय नाना आणि त्याचे डझनभर डूआयडी मार्गदर्शक असताना प्रबंध लिहिणे सहज सोपे जाईल. :)

In reply to by भाते

नानासाहेब परत परत आलेले दिसताहेत. नानासाहेब नेफळे हा आयडी डिलीट झाल्यावर हे काकासाहेब केंजळे या आयडीने मिपावर वावरायला लागले. जेव्हा काकासाहेब केंजळे हा आयडी पहिल्यांदाच बघितला तेव्हा त्याचे वय पाहिले आणि आयडीचे वय २ वर्षे बघून थक्क झालो होतो. हे रोज २-३ नवीन आयडींची रिक्वेस्ट देतात असं दिसतंय आणि यांच्या स्टॉकमध्ये कोणत्याही दिवशी १०-१२ तयार आयडी असतात. एक गेला की लगेच स्टॉकमधला पुढचा आयडी पोतडीतून बाहेर येतो.

In reply to by श्रीगुरुजी

पण त्याचं असं आहेना की नव्या अवतारातील पापांचा हिशेब नव्याने धरला जात असल्याने शंभर होईपर्यंत काही होत नाही,मुल्हेरकर प्रकरणात हातोहात दिसले आहे. यांचे अत्ताशी कुठे ५-७ झाले असतील. सावध नाखु

पण मुद्दा बरोबर आहे. पण झूंना भेट न देऊन हा प्रश्न सुटेल असं वाटत नाही. अशा अनास्थेचं कारण बहुसंख्य झू सरकारी मालकीचे असतात. ते PPP (Public Private Partnership) मध्ये चालवणं हा एक उपाय असू शकतो.

In reply to by बोका-ए-आझम

ओडिशा मधील नंदन कानन झुलॉजिकल पार्क सरकारी आहे का?? काही आईडिया आहे आपल्याला??

जिकडे फार चांगल्या रितीने प्राणी संभाळतात ( ओस्ट्रेलिया वगैरे ) तिकडे पाठवा.वाघांनाही इतके छान ठेवले आहे आपल्यापेक्षा चांगले.

नानामाई आणि इतर… यांच्या डूआयडीच्या अश्याच महाटुकार धाग्याची मी वाट पहात होतो. :) शपथ? देनार? डांबुण? आनू? बेशुद्ध मराठी! जर तुला सरळ शुध्द मराठीत लिहिता येत नसेल तर मिपावर कशाला येतोस रे? संपादक मंडळ या डझनभर डूआयडीवर आतातरी काही कार्यवाही करणार आहे का???

In reply to by भाते

'मिपा'वर शुद्धलेखनाचा आग्रह? आपणांस 'मिपा'स्थापनेचा इतिहास माहीत नाही का? खरेच पूर्वीचे मिपा आता राहिले नाही. हर हर.

:@

आधी सर्वजण चिकन मटणादि पदार्थ खाणे बंद करा, प्राणिसंग्रहालय ही फार दूरची गोष्ट आहे.

.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जन्मठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे.
सहमत. जंगली प्राणी बघण्याची ज्या कोणाला हौस असेल अशांना सर्व सोयी सुविधायुक्त अशा बंद पिंजर्‍यात जंगलात ठेवावे, आपसूक जंगली प्राण्यांचे दर्शनही होइल व बंदिस्त प्राण्यांचे दु:खही समजेल

In reply to by मार्मिक गोडसे

बरोबर, जंगलात जाऊनच प्राणी पाहण्यात खरी मजा आहे. सर्पोद्यानात आळशी, हौदात पडून राहिलेले साप बघून झोप येते. ट्रेक करताना कधी चुकून साप दिसला कि जी फाटते त्यात खरी मजा आहे. [ज्युरासिक पार्क झालंच पाहिजे]

याच विषयावर सिन्थेटिक जिनियस या नावाने पण एक धागा मायबोलि या सन्केतस्थळावर वाचला. म्हणून टर्बोचार्जड फिलॉसॉफर व सिन्थेटिक जिनियस ही एकच व्यक्ती असा माझा अन्दाज आहे. मला वाटते माझ्याप्रमाणे अनेक जण मिपा व माबो वाचत असतील मग असे दोन्ही ठिकाणी लिहून काय प्रतिसाद येतात त्यावरून वाचकान्चे काय मत आहे असा रिसर्च लेखकाला करायचा आहे का? असे असेल तर उत्तम. मी वाट पहात आहे.

वांझोटी चर्चा. भूतदया वगैरे ढोंग आहे,मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे,जो प्राणी बलशाली,बुद्धीमान असेल तो इतर प्राण्यांवर राज्य करेल त्या उक्तीप्रमाणेच आज आपण प्रगत प्राणी म्हणून वावरत आहोत आणि आपल्या मनोरंजनासाठी म्हणून आपण काही प्राणी कैद केले तर मला त्यात काही वावगं वाटत नाही. जंगलामध्ये माणूस गेल्यावर इतर प्राणी माणसावर दया दाखवत नाहीत,तर आपण का दाखवावी.

प्राणीसंग्रहालयावर बंदी घालावी. आपल्याकडेही हल्लीच डॉ प्रकाश आमटे यांच्या वाघिणीच्या दुर्दैवी बछड्यांचा अंत केवळ प्राणीसंग्रहालयाच्या नालायक लोकांमुळे झाला होता.

सहमत. बंदी घालावी. वाघ, सिंह, हत्ती यासारख्या रुबाबदार प्राण्यांना त्या पिंजरयांमधे बघवत नाही. पक्ष्यांनाही पिंजरयात डांबणे हा तर क्रूरतेचा कळस. त्यापेक्षा अभयारण्ये वाढविण्याकडे भर द्यावा.

नुकतीच ही बातमी बघितली.. http://www.mirror.co.uk/news/world-news/astonishing-new-footage-shows-g… माणसाच्या चुकेमुळे एका गोरिल्ल्याचा हकनाक बळी गेला.. :( तुम्हीच राव त्यांच्या जागेत अतिक्रमण करताय, तुम्हीच गोळ्या घालताय, खुप वाईट वाटले.

आई..गं. अतिशय दुर्दैवी घटना. वीडियो वरुन तरी असे वाटतंय की तो गोरिल्ला हिंसक झाला नव्हता. लोकांच्या किंचाळल्याने तो गोंधळून गेला बुहुतेक आणि त्या मुलाला स्वत:बरोबर सुरक्षित जागी घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असावा. त्याला गोळ्या घालण्याच्या ऐवजी स्टन गन नी बेशुद्ध पाडलं असतं तर?.. असा विचार मनात आला.

In reply to by पद्मावति

तसा विचार केला गेला प्राणीसंन्ग्रहातर्फे, पण गोरिल्ला पुर्ण बेशुध्द होण्यासाठी ३० मिनिटे लागली असती, व या प्रक्रियेत तो हिंसक होउ नये, म्हणून हा निर्णय घेतल्या गेला. :(