साहित्यः १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम हापूस आंब्याचा रस, १०० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम खवा. सजावटीसाठी पिस्ते काप, केशराच्या काड्या.
कृती: हापूस आंब्याचा रस काढून मिक्सरवर फिरवून बारीक करून घ्यावा. रस मोजून घ्यावा. पनीर आणि खवा एकत्र करून गुठळ्या मोडून घ्याव्या. साखर आणि आमरस एकत्र करून मंद गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की एकत्र केलेले खवा पनीर त्यात मिसळावे. परतत रहावे. मिश्रणाचा गोळा होत आला की ताटाला तूप लावून गोळा थापावा. पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवावे. चांदीचा वर्खही लावता येईल. आवडीप्रमाणे वड्या कापाव्या.
मी माझ्या आत्याच्या पंचात्तरीला मुंबईला न्यायचे असल्याने मिश्रण बर्फीसारखे न ठेवता वडीसारखे घट्ट केले. नाहीतर कलाकंद थोडा ओलसर असतो. ताज्या आंब्याचा मस्त स्वाद येतो.
दुसरा फोटो कार्यक्रमाच्या गडबडीत फार काही चांगला आला नाहीय.

वाचने
12097
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
बायकोला हे फोटो दाखवा
In reply to मस्त... by मुक्त विहारि
करणार.
एकदम भारी प्रकार आहे अनन्या!
खवा भाजून घ्यायचा नाही का?
..
In reply to खवा भाजून घ्यायचा नाही का? by कंजूस
+१
In reply to .. by कवितानागेश
वाह, मस्तं!
वा..
छान दिसत आहे.....नक्कि करुन
जबरी..
जब्राट
दिपकबाबा पनीरवाले यांचेशी शमत
In reply to जब्राट by दिपक.कुवेत
आपणही येताना पनीरचं काहीतरी
In reply to जब्राट by दिपक.कुवेत
ताई मी आले की करुन ठेव ;)..
कधी येतेस?
In reply to ताई मी आले की करुन ठेव ;).. by विशाखा राऊत
Ho.

वा!वा!झकास.
आहा सुंदरच!
आहा सुंदरच!
नककी करणार
मस्त दिसतेय.
आंबे मिळतायत तोवर करून पहा.
मस्तच