Skip to main content

सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 01/06/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी राग,कधी अनुराग, कधी प्रेम, कधी आग कधी हो, कधी नाही कधी घरी विचारते,कधी माहीत नाही, तू तर रोज सखे भेटतीस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग कधी भांड भांड भांडतेस, तर कधी गळ्यात पाडून रडते कधी स्वत:च खरं करतेस, तर कधी माझ चुकलं म्हणतेस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी अल्लड, पोरसवदा मुलीच वागणं तर कधी प्रौढे सारखं बोलणं कधी फोन कट करणं , तर कधी,सारखं मिस कॉल देणं कधी म्हणते, तोंड बघणार नाही, तर कधी,तुला भेटल्या शिवाय करमत नाही कधी तू खूप चांगला,तर कधी,

मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 01/06/2016 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..

सांधण दरी--जिथे एअरटेलचे नेटवर्क गंडते

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 01/06/2016 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ेब्रुवारी मध्ये एक-दोन जोरदार ट्रेक कम भ्रमंती पार पडल्या आणि हळूहळू उन्हाळा तापू लागला .बेडूक जसे भूमिगत होऊन पावसाळा सुरु होण्याची वाट बघत निद्रीस्तावस्थेत जातात तद्वतच आम्हीसुद्धा आता जुलै पर्यंत घरातच पडी मारून बसायचे नक्की केले.पावसाळ्यात भ्रमंतीची जोरदार सुरुवात एक दिवसीय पन्हाळ-विशाल ट्रेकने होणार त्यामुळे या छोट्या ब्रेकचे फारसे दु:ख होत नव्हते. पण स्वस्थपणे घरात बसून राहतील तर ती कसली ट्रेकर मंडळी ? चर्चा तर होणारच...आणि ग्रुपमध्ये चर्चा सुरु झाली सांधण दरी ट्रेकची.

हो...! मला तुमचा पैसा हवाय...-मर्लिन मुनरो

लेखक महामाया यांनी बुधवार, 01/06/2016 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... आठवणीतला हॉलीवुड/तीन ‘हो...! मला तुमचा पैसा हवाय...! पण त्यांत गैर काय...तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला एखाद्या कंगाल, फाटक्या माणसाच्या पदरी घातलं असतं का...?

लाल इश्क (मराठी चित्रपट परीक्षण)

लेखक समीर_happy go lucky यांनी मंगळवार, 31/05/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय??

वात्रटिका - झिंगाट प्रेम

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 31/05/2016 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या शालूत कळी लाजली फुलपाखराचे जी झिंगाट झाले जी. फिरफिर नाचला शिट्टी वाजवली झिंगत म्हणाला आय लव यू. झिंग झिन झिंगाट झिंग झिन झिंगाट. प्रिन्स चिमण्याने डाव साधला बेसुध फुलपाखरू चोचीत धरला. फुलपाखरू खाऊन चिवताई खुश चिवचिव प्रिन्स आय लव यू. झिंग झिन झिंगाट झिंग झिन झिंगाट. दूर झाडावर काळा कावळा त्यांचे प्रेमाचे चाळे बघत होता,.......
काव्यरस

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२

लेखक अक्षय१ यांनी मंगळवार, 31/05/2016 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही. टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे. (स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.१

लेखक अक्षय१ यांनी मंगळवार, 31/05/2016 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण...

लेखक अक्षय१ यांनी मंगळवार, 31/05/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते.

महापुरुषांच्या जयंती निमित्त सोरा गावाने घालून दिला नवा आदर्श.(महापुरुषांची एकत्र जयंती)

लेखक विशाल चंदाले यांनी मंगळवार, 31/05/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुष्काळावर बरीच चर्चा चालू आहे आणि सगळीकडेच त्याच्या उपाययोजनांवर चर्चा आणि कामे सुद्धा चालू आहेत. असंच एक काम हाती घेतलं होतं सोरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) गावातील तरुणांनी. ह्या कामाचं विशेष म्हणजे निमित्त होतं ते महापुरुषांच्या जयंतीचं. गावातील तरुणांनी महाराणा प्रताप सिंह, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंती वेगवेगळ्या साजऱ्या न करता एकत्र साजऱ्या करायचा संकल्प केला होता.