Skip to main content

राजमाची - क्षणचित्रे

लेखक स्पा यांनी गुरुवार, 16/06/2016 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
कंजूष काकांनी वृतांत टाकला आहेच, मुसळधार पावसात कशी बशी काढलेली काही क्षण चित्रे येथे देतोय. धुकं आणि पावसामुळे क्यामेरा बहुतेक वेळ ब्यागेतच राहिला, मोबाईल ने फोटो काढावे लागलेत १.कोंदिवडे गावातून राजमाची वाटेवरला गणराय dasds २.

गरीब-श्रीमंत

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 16/06/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मी रद्दी आणि काही जुनं सामान भंगारात देण्यासाठी काढलं, आणि बराच कचराही काढून टाकला. यात काही जुने कपडेही होते. भंगारात काही जुनी विजेची उपकरणे, काही भांडी, वगैरे होतं. आमच्याकडे नेहमी रद्दीसाठी येणाऱ्या भंगारवाल्याने ते सारं भंगार एका बॉक्समधे भरलं. त्यानं किती पैसे द्यावेत यावर मी कधीच घासाघीस करत नाही. तो बॉक्स उचलून तो निघाला आणि मला कचऱ्याची पिशवी आठवली. खाली जाताजाता ती कचऱ्याच्या डब्यात टाकशील का, असं मी त्यालाच विचारलं, आणि त्याने खांद्यावरचा बॉक्स खाली ठेवून कचऱ्याची पिशवी उघडली. आतले जुने कपडे पाहून त्याचे डोळे चमकत होते. साहेब, हे कपडे कचऱ्यात नका टाकू...

दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके

लेखक अत्रे यांनी गुरुवार, 16/06/2016 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या ओळखीच्या एका मुलाला नुकतेच दहावीमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्याला बक्षीस म्हणून पुस्तक द्यायचा विचार करत आहे. कृपया १. करीयर मार्गदर्शन २. प्रेरणादायी (चरित्र वगैरे) या विषयांवरील वाचनीय पुस्तके (शक्यतो मराठी) सुचवा. धन्यवाद.

मुदत ठेवींचे पतमानांकन

लेखक पुणे मुंग्रापं यांनी गुरुवार, 16/06/2016 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -११

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 15/06/2016 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
भाग अकरावा - आज सकाळी जरा लौकर उठलो आणि आवरून नाश्ता करून निघालो कारण आज आम्हाला मादाम तुस्साद्स ला जायचे होते. तिथे खूप गर्दी असते तिकिटासाठी. त्यामुळे लौकर पोहोचणं गरजेचं होतं. आमच्या घरापासून जवळ होतं. बेकर स्ट्रीट हे सगळ्यात जवळचं ट्युब स्टेशन आहे इथे जाण्यासाठी. या स्टेशनला उतरल्यावर ३ ते ५ मिनिटे चालत जायला लागतं. आम्ही पोहोचलो तेंव्हा खूप लाईन लागलेली होती तिकिटांसाठी. आम्हाला बराच वेळ लाईन मध्ये थांबावं लागलं. माणशी ३५ पौंड तिकीट आहे इथे. तिकीट काढून आतमध्ये गेलो आणि रेड कार्पेट वरून आतमध्ये गेल्यावर आमचे स्वागत हॉलीवूड सेलिब्रिटीजने केले. एक एक मेणाचे पुतळे बघत पुढे चाललो होतो.

लाज कुणाला

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 15/06/2016 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्दकथा-- वेल्लाभटांच्या "थक्क करणारी एक घोडदौड" धाग्याला प्रतिसाद देताना सुचलेली(सत्यकथा) माझ्याकडे तब्येत बरी नाही म्हणून आलेला एक माणूस. वय वर्षे ५७. करत काहीच नाही. पूर्वी काय करत असे सुतार काम. आजकाल काम झेपत नाही. केंव्हापासून १२ वर्षेपासून. कारण? बायको म्हणाली त्यांची तब्येत बरी नसते ना? तब्येत बरी नसते म्हणजे काय? मी त्याच्या दहा वर्षात झालेल्या सर्व तपासण्याचे बाड अथपासून इतिपर्यंत पाहिले. कुठेच काही नव्हते. आमच्या आईच्या शब्दात -- त्याचे "सुख" दुखत होते. याला दोन मुली कमावतात आणी बापाला पोसतात. बापाने मुलीना सांगितलेले तुमच्या लग्नाचे तुम्ही पहायचे.

सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : ३ :

लेखक जगप्रवासी यांनी बुधवार, 15/06/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : १ : सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : २ : रात्र गाजवली ती दीड वर्षाच्या अर्णवने, थोडी झोप लागली की हा सप्तसुरात रडायला सुरु करी. त्याला झोपवे पर्यंत रात्रीचे दोन वाजले. अर्धा तास झोप लागली तर लगेच याने परत रडून सर्वांना उठवलं. त्याच्या रडण्याच्या नादात सकाळचा अलार्म पण लवकर वाजल्यासारखा वाटला.

शैक्षणिक बाजारहाट

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/06/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आजचा जमाना शिक्षणाचा आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेणं वाईट आहे, असं आज एखादा अशिक्षित माणूसही म्हणणार नाही. सर्व जगाने शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व जग सुशिक्षित व्हायला हवं. मात्र शिक्षण आज ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे माणूस सुशिक्षित होणं लांबची गोष्ट झाली, तो शिक्षित तरी नीट होतोय का अशी शंका घ्यायला जागा आहे. शिक्षण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी, अशा व्याख्या तयार होऊन आज शिक्षणाचा पायाच खचला आहे. कसेही करून पदवी मिळायला हवी. पदवीचे प्रमाणपत्र हातात मिळालं की गंगेत घोडं न्हालं.

मधातील मेवा फळं

लेखक उल्का यांनी बुधवार, 15/06/2016 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
'भुकेला कोंडा नि नीजेला धोंडा' असे म्हणतात.