Skip to main content

कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 27/02/2024 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता. . आम्ही पाणी गरम करून रूम मध्ये रेडी टू मेक चहा बनवला, विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. ऊरलेले पाच सहा खाकर्यांचे पॅकेट त्याने मला दिले. बॅग भरून खाली आलो. लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती तिने लॉकरमध्ये सामान ठेवले आम्ही निघालो, मिपाकर चित्रगुप्त काकांचा व्हिडिओ कॉल आला त्यांच्याशी बोललो.

मराठी : लेखन घडते कसे?

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/02/2024 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन.

मनी वसे ते

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 26/02/2024 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
मनी वसे ते -------------------------------------------------------------------------------------------------------- २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होता. त्यादिवशी रात्री शाळेत थांबायचं ठरलं. सर असं म्हणल्यावर त्या कल्पनेने वरुणला धमाल वाटली. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन होता.त्याच्या तयारीसाठी मुलं काम करणार होती. मराठी भाषा गौरव दिन म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने तो दिवस साजरा करण्यात येतो. तर, विज्ञानदिन हा सर सि.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो.

अपहरण - भाग ४

लेखक स्मिताके यांनी सोमवार, 26/02/2024 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ - https://misalpav.com/node/51961 कर्नल ऑडमिंटन. एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने! कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता. आता कान इकडे करा. हे नुसते नामधारी कर्नल होते. मॅलार्ड बदकं मारताना घेतलेला बंदुकीच्या पावडरचा वास आणि चार्ल्सटन शहरात रस्त्यावरून शांतपणे मिरवणुकीने जाताना पाहिलेली सैनिकांची रेजिमेंट हेच काय ते त्यांचे युद्धविषयक अनुभव!

जरांगे निघाले.,,,,

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 26/02/2024 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
वाढे माईक्स चा खणखणाट, पूढे कॅमेरांचा लखलखाट, गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट तोंडात शब्द कडक, जरांगे निघाले तडक... कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार, शाब्दीक-चाबकांचा टणत्कार, मिडीयाला रेडी साक्षात्कार, आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार ! मी तोडणार बामणी कावा, जातीयवादी झालास भावा, सिल्वर ओक चा का तू छावा, इलेक्शन अन तापला तवा ! तुला काय एम पी तिकीट हावा? थकले रे पोलीस, नको धरु ओलीस, विषय खूप खोलीस राजकारणी टोळीस जनतेस हा पोळीस निवडणूक होळीस. नको रे करु उपास, आपण करु तपास, नको बसू 'उग्र तपा' स, सांगू आपण 'शपा' स, आणा रे संत्रा रसा स.....

सांज

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 25/02/2024 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर
काव्यरस

टुकार कविता: मामीचे गाणे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/02/2024 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
मामीची अदा पाहा मामींचे गाणे ऐका. मर्दानी आवाज आहे छान छान छान. मामीचे गाणे ऐकून मामाची झोप उडाली. वेश बदलून मामा आता दिन - रात भटकतो. मामाच्या सभेत मामी गायली रिकाम्या खुर्च्यांनी सभा गाजवली. मामीच्या गाण्याला हजारों प्रतिसाद मामी मुळे होतो मामाचाच प्रचार.

फ्रेंच राज्यक्रांती - नवीन पुस्तक

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/02/2024 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नवीन पुस्तकाबद्दल लिहिताना जरा मनात धाकधुकच आहे, परंतु एका पुस्तकाबरोबर एक पुस्तक भेट म्हणून देणार असल्यामुळे मिपाचे सदस्यांना हे सांगावे म्हणून लिहित आहे. अर्थात पुस्तकाबद्दल माहिती सांगावी हा मुख्य उद्देश नाकारता येत नाही. image host नमस्कार! वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, सांगण्यास आनंद वाटतोय, की फ्रेंच राज्यक्रांती हे पुस्तक छापून हाती आले आहे. एकूण पाने ५३३ झाली आहेत. किंमत आहे. रु.

पाकिस्तान-५

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शुक्रवार, 23/02/2024 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले. पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर पहील्या दशकापर्यंत प्रजासत्ताक झाला नव्हता, आणि ब्रिटिश अधिराज्याचा भाग होता. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानची महाराणी एलिझाबेथ होती जशी ओस्ट्रेलिया नी कॅनडाची होती. पाकिस्तानात गव्हर्नर जनरल आणि पंतप्रधान होते, पण राष्ट्रपती नव्हते. त्यातही सत्तेचा विचित्र हिशोब होता.

सोम्या बाबा.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 23/02/2024 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती. "हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं. "रुसलाय," आई म्हणाली. "कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला. "त्याला गाय हवेय," आई म्हणाली. "काय बाई आक्रितच?" "गप शाळेत जाऊन अभ्यास करायचा सोडून गुरं सांभाळायची आहेत," संज्याची आई माझ्याजवळ येत म्हणाली. मी तोंड दुसऱ्या दिशेला फिरवून तसाच झोपून राहिलो. "जेवलाय पण नाय," आई म्हणाली. "काय? ये चल उठ, असं जेवणावर रुसतात व्हय?