Skip to main content

शेवटचा पदन्यास एक

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 03/08/2016 04:25 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा वर्षांपूर्वी एक तंत्रज्ञ काम करायचा हाताखाली, डॅरेन कोल्स्टन नावाचा. "आपलं काम बरं आणि आपण बरं" असा एकाग्र चित्ताने, इतरांमध्ये फारसा न मिसळता रहायचा. उत्तम कमावलेली शरीरयष्टी. त्यामुळे त्यामुळे एक श्वेतवर्णी आणि एक कृष्णवर्णी अशा नटखट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन्ही सहकारी तंत्रज्ञ सहकारी कन्यका त्याच्या आगे-मागे रुंजी घालायच्या, पण हा कुणाच्या अध्ये-मध्ये न पडता, कानांत इअरफोन्स घालून गाणी ऐकत आपलं काम करीत रहायचा.

परीकथा - भाग दहा - फेसबूक स्टेटस २.३ - २.४ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 03/08/2016 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
१ जुलै २०१६ मल्हारी आमचे आधीपासूनच फेव्हरेट गाणे. परवा त्याला जरा तडका दिला. मी परीच्या मम्मीचा एक येल्लो कलर कुर्ता घातला आणि त्या गेटअप मध्ये परीसोबत नाचू लागलो. परीच्या मम्मीच्या शिव्या खाऊनही फार धमाल आली. परीलाही नक्कीच आली असणार. कारण काल पुन्हा ती मम्मीचा एक दुसरा कुर्ता घेऊन माझ्याकडे आली.. आणि म्हणाली, "हे घाल तू.. मल्हारी नाचूया" .. मग काय, धिस टाईम विथ ब्ल्यू कुर्ता.. सोबत परी गळ्याभोवती मम्माची ओढणी लपेटून.. आणि पुन्हा एकदा मल्हारी.. बजने दे धडक धडक.. ढोल ताशे धडक धडक :) .. बाकी या अवतारात एखादा सेल्फी काढून फेसबूकवर अपलोड करायचा मोह झालेला.. पण आवरला..

बादलीयुद्ध ३

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 02/08/2016 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन ------------------------------------------------------------------------------- मी बादलीचा बादली माझी मी बादलीतल्या 'मगा'चा 'मग' माझ्या बादलीचा आपण एक प्रथितयश कवी होऊ शकत नाही ही माझ्या हृदयातली एक भळभळती जखम आहे. चित्रं काढता काढता मला कविता करण्याचा नाद लागला. नादच.

हरवलेलं विश्व

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 02/08/2016 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
विमानाने उड्डाण केल आणि जयुने हलकेच निश्वास सोडून मान मागे टाकली आणि थोड़ी रिलॅक्स झाली. आज आयुष्यात पहिल्यांदाच ती एकटीच बाहेर पडली होती. त्यासाठी विजयशी तिने कितितरी वाद घातला होता. *** विमानात बसल्या बसल्या तिच्या मनात काही दिवासांपूर्वीच्या घटनांच्या आठवाणींचे आवर्त फिरत होते... ".....अग पण मला इतक्या लांब आणि ते ही 10/12 दिवस कस जमेल? तू मुलांना घेऊन जा ना त्यांच्या सुट्टीमद्धे. सोबत ललिताबाईंना पण घे. हव तर अजयच्या बायकोला पण विचार. ती येईल. हा काय हट्ट आहे?" विजय वैतागुन बोलत होता. "माझ्यावर आवाज चढवू नकोस विजय. मुलांना इजिप्त बघण्यात काय इंटरेस्ट असणार?

नको भुलू जाहिरातींना !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 02/08/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते.

(*गणे कसेच होते)

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/08/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

ती - ७

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 02/08/2016 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती" - २ "ती" - ३ "ती - ४" ती - ५ ती - ६ ती - ७ बोरीवलीहून निघालो ते थेट घरी आलो पण येताना डोक्यात असंख्य विचार चालू होते. आपल्या हातून हे झालंच कसं.

स्वगत...

लेखक फुंटी यांनी मंगळवार, 02/08/2016 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
रातकिड्यांची किरकिर ,पानांची सळसळ ,बेडकांचे रोमांटिक ड्रांव ड्रांव,दुरून गाजही येतेय कानी , तो मुसळधार बरसून शांत झाल्यावर ही काळी रात्र...विजेचा लपंडाव माझ्या खिजगणतीत नाही...दुपारी झोपल की रात्र जागते.विषयासक्ती कमी झाल्यावर रात्री रिकाम्या भासतात .आधी जागायचो F टीव्ही पहायला.विषय संपला ...पुढे काय? आता उरत काय ? रिपीटेशन.... खाणं,पिणं,हगण,मुतण,मेैथून ....बस .... कसल आकर्षण वाटेल तर ती शक्यता नाही...अजुनही किरकिरतोय तो...काय मिळत असेल रातकिड्यांना किरकिर करून ?? मादी???

पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग २

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 01/08/2016 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग १ पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग २ -- पुढे चालु आज अजित आतुरतेने आपल्या मित्राची, रवीची वाट पाहात होता . थोड्याच वेळात रवी त्या हॉटेलमध्ये आला . तोही नुकताच एक प्रोजेक्ट संपल्यामुळे एकदम निवांत मुडमध्ये होता . अजितने लगेच दोघांसाठी चहा आणी काहितरी खाण्यासाठी मागवले . चहा आणी खाणे होईपर्यंत दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . नंतर अजितने मुख्य विषयाला सुरुवात केली . "रवी , तुला तर माहितच आहे . बरेच दिवस मी चित्रपट बनवण्याचा विचार करतो आहे .