Skip to main content

एक अतूट नातं

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 10/08/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र आणि मी एक अतूट नातं शब्दांच्या अलिकडचं.... भावनांच्या पलीकडचं... समुद्र आणि मी एक अतूट नातं भरतीच्या लाटांचं ते उचंबळून येणं नात्यातली गुंतवणूक वाढवून जाणं समुद्र आणि मी एक अतूट नातं खिन्न मनाने आकाशात टक लावणं तेव्हाच नेमकं ओहोटीचं मन स्पर्शून जाणं समुद्र आणि मी एक अतूट नातं अनेक आयुष्य त्याने सामावलीत स्वतःत अनेक नात्यांची आंबट-गोड चव .....माझ्या मनात म्हणूनच जाणवतं त्याचं माझं एकत्व समुद्र आणि मी एक अतूट नातं
काव्यरस

माझ्यासाठी तूच एक असशील ना ?

लेखक आदिती @ यांनी बुधवार, 10/08/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा सांभाळून घ्या ३ वर्षांपूर्वी लिहिलेली कविता जेव्हा चेपुवर दुसऱ्याच्या नावाने लिहिलेली भेटते तेव्हा खूप वाईट वाटत. माझी ही कविता थोडे शब्द बदलून मला चेपुवर वाचायला भेटली होती. याआधी लिहिलेली कविता तुम्ही वाचलात, तुम्हाला आवडली म्हणून म्हटलं आपली जुनी डायरी काढून त्यातून उरलेल्या कविता पण इथे टंकाव्यात. शब्दात नाही सांगता येणार डोळ्यातून समजून घेशील ना? अस्वस्थ होईन मी जेव्हा धीर मला देशील ना?
काव्यरस

माझ्यासाठी तूच एक असशील ना ?

लेखक आदिती @ यांनी बुधवार, 10/08/2016 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा सांभाळून घ्या ३ वर्षांपूर्वी लिहिलेली कविता जेव्हा चेपुवर दुसऱ्याच्या नावाने लिहिलेली भेटते तेव्हा खूप वाईट वाटत. माझी ही कविता थोडे शब्द बदलून मला चेपुवर वाचायला भेटली होती. याआधी लिहिलेली कविता तुम्ही वाचलात, तुम्हाला आवडली म्हणून म्हटलं आपली जुनी डायरी काढून त्यातून उरलेल्या कविता पण इथे टंकाव्यात. शब्दात नाही सांगता येणार डोळ्यातून समजून घेशील ना? अस्वस्थ होईन मी जेव्हा धीर मला देशील ना?
काव्यरस

Mr.Bean

लेखक हृषिकेश पांडकर यांनी बुधवार, 10/08/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी प्रथमदर्शनी जितक्या समजतात त्यापेक्षा जास्त त्या पुढल्या वेळी पाहताना कळतात.जितक्या जास्त वेळा पाहू तितक्या वेळा काहीतरी नवीन पाहिल्याचा बोध मला होतो.

अज्ञानवाद !!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 10/08/2016 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घराच्या भिंतीला रंग गायीच्या शेणाचा नाही भय जरीही आला अणुबाँब कुणाचा... माझ्या घराच्या खोलीत यज्ञकुंडाचे भूषण नाही पर्वा कधीही असो किती प्रदूषण... माझ्या घराच्या दारात काळ्या घोड्याची हो नाळ घर संपन्न होणार नाही कशाची आबाळ... माझ्या घरी प्रत्येकाच्या गळ्यामधे गंडेदोरे नाही भय कशाचे कुणी करी काळेबेरे... माझ्या घरी कपाटात पोथ्यापुराणांचा संचार त्याच्या पलीकडे व्यर्थ सुखी जीवनाचे सार... माझा घरी विज्ञानाला नाही जरासाही थारा कसा जगतो मी ते शेजाऱ्यालाही विचारा...

आशय - प्रस्तावना आणि भाग १

लेखक किंबहुना यांनी बुधवार, 10/08/2016 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
आशय तसा सुखवस्तू घरातला मुलगा. वडील सधन नसले तरी सुखवस्तु शेतकरी. रत्नागिरीतील एका दुर्गम गावातील वडिलोपार्जित आणि त्यामुळे विभागलेली तरीही एकत्र असलेल्या १५-२० एकर शेतीचे मालक, आणि त्यात स्वकष्टाने पिकवलेली ५-७ एकरावरील आमराई. त्यामुळे चंगळ नसली तरी खाण्यापिण्याची तशी काही ददात नव्हती. बाकी कुटुंबीय त्यांच्या व्यवसायाप्रमाणे शहरात स्थायिक झाले होते. एकंदरीत त्यांचे आयुष्य तसे सुखी होते. ही गोष्ट तशी म्हटली तर आशयच्या आईवडिलांची नाही, पण आशयची गोष्ट समजून घेताना त्याच्या आईवडिलांना समजून घ्यायलाच पाहिजे ना. गावात तसे काही कमी नव्हते, कमी असलेच तर शिक्षण.

गोदो आला गोदो आला

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 10/08/2016 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गोदो आला गोदो आला खेळखेळणी घेउन आला गोदो आला गोदो आला अहा हर्ष तो मनी दाटला! गोदो आला गोदो आला कसा दरबार पाहा सजला स्वागत करण्या एक गलबला हरहर गोदो निनाद झाला गोदो आला गोदो आला ओवाळावे पटकन त्याला भेटवस्तु द्या माणिकमोती त्रिशुलतलवार बरछ्याभाला गोदो आला गोदो आला जो जो बोले कुजबुजवाला कोल्ह्यांची ती ऐकून कुई हरिण बोलले सिंहच आला गोदो आला गोदो आला हिरवी राने हिरवा पाला दुधात न्हाले गोकुळ सगळे आनंदी त्या गोकुळबाला गोदो आला गोदो आला जलौघ वाहे अरण्यातला तूतीवरचा रेशमकीड़ा खुशीत आला अन् वळवळला! गोदो आला गोदो आला अंधास दिसे पंगु धावला बहिरा ऐके मुक्यास वाचा मंदबुद्धि तो पंडित झाला गोदो आला गोदो

खडकाचे मौन

लेखक निखिल निरगुडे यांनी बुधवार, 10/08/2016 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्या निर्जन सागरी किनाऱ्यावरील एका खडकावर तो शांत एकटाच बसलेला होता. अगदी शांत, निश्चल, निर्विचार अवस्थेत. न कसली चिंता, न दुख, न आनंद, न मोह, न लोभ. निर्विकार… क्षितिजाजवळ सूर्य आज्ञाधारक बालकासारखा अंधार पडण्यापूर्वी घाईने घराकडे निघाला होता. दूरवर सागरात एक नाव हेलकावत होती, कुठेतरी नारळाची झाडे वाऱ्याच्या संगतीने डोलत होती, सागर तर जणू एका आगळ्या धुंदीत थैमान घालत होता. पण, तो स्तब्ध होता. त्याच्या पायांपासून काही दूर, सागरा पर्यंत पसरलेल्या खडकासारखा… खोडकर लाटा त्या खडकाचे मौन भग्न करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तो खडक एका तपस्वी योग्यासारखा दृढ स्तब्ध होता.

प्रश्न

लेखक इना यांनी बुधवार, 10/08/2016 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेचं आलीस आयुष्यात वाऱ्याच्या झुळूकीसारखी मनात मात्र माझ्या वादळासारखी राहिलीयेस तुझं हसणं, तुझं दिसणं कोरलय माझ्या अस्तित्वावर रात्रीच्या आकाशात ध्रुव चमकत रहावा तसा गुणगुणत राहतो तुझा आवाज माझ्या कानात त्या क्षणी जवळ असतीस तर मिठीत घेतली असती तुला किती आवडतेस तू मला मीही सांगितलं असत मग पण नाही सांगता आलं तेव्हाही आणि आताही आता फक्त स्वप्नं पाहतो त्या स्वप्नातही तू भेटतेस तेही दूर जाण्यासाठीच मग भेटतेस तरी का ते तुलाच माहीत तुझ्याचंजवळ हरवून आलोय मी स्वतःला बेमालूमपणे पण तुझ्या नाही येतं लक्षात आणि माझ्याजवळ असलेला मी अजूनच अगतिक होतो पण यातलं काहीही तुला कळून उप

थोडी कॉफी, थोड्या गप्पा

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 09/08/2016 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
6.30 pm You are late. I always am. हम्म.. come on! एक तर इतक्या महिन्यांनी भेटतोय. वेळेवरून ऐकवणार का? का ऐकवू नये? मी काय तुझी गर्लफ्रेंड किंवा बायको आहे का? तुझं मन जपायला? बोर नको करूस. छान दिसतेयस. thanks. पण विषय बदलू नकोस.. मगाचपासून इथे एकटी बसलेय. वेटरला मी इतकी बिचारी वाटले की माझी कॉफीची सुद्धा ऑर्डर घ्यायला आला नाही. हां बाई, sorry. तुला सवय नसेल ना अगदीच, कुणा मुलाची वाट बघायची? of course. कशी असेल? तुझ्यासारखे नमुने कमीच.