Skip to main content

थोडी कॉफी, थोड्या गप्पा

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 09/08/2016 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
6.30 pm You are late. I always am. हम्म.. come on! एक तर इतक्या महिन्यांनी भेटतोय. वेळेवरून ऐकवणार का? का ऐकवू नये? मी काय तुझी गर्लफ्रेंड किंवा बायको आहे का? तुझं मन जपायला? बोर नको करूस. छान दिसतेयस. thanks. पण विषय बदलू नकोस.. मगाचपासून इथे एकटी बसलेय. वेटरला मी इतकी बिचारी वाटले की माझी कॉफीची सुद्धा ऑर्डर घ्यायला आला नाही. हां बाई, sorry. तुला सवय नसेल ना अगदीच, कुणा मुलाची वाट बघायची? of course. कशी असेल? तुझ्यासारखे नमुने कमीच. चल आता, I need coffee. ...करियर, बायको, बॉयफ्रेंड, मागच्या भेटीच्या आठवणी, आणि कॉफी... 7.15 pm चल आता. कुठे? फेरी मारू चल, एफसीमधे चक्कर मारू. ओके. ...एफसी लाईफ, पाऊस, झाडे... 7.30 pm इथे बसूया का? सिक्युरिटी बसू नाही देणार. तो येईतो बसू. ठीके. ...राजकारण, आयुष्याची स्वप्ने, सामाजिक प्रश्न... 8.00 pm hello, हां, कुठे आहात? अरे मी इथे मैत्रिणीला भेटायला आलोय. आलोच एक १० मिनटात. १० मिनटात? वैतागलास इतक्यात? अगं, मित्र आलाय यूएस वरून. ते सगळे भेटणार होते. मग सांगायचं ना, एक तर मी इतक्या दुरून आले. तुझी वाट बघण्यात अर्धा वेळ गेला.. अगं, मग मी थांबू का? नको. आता तुझं दुसरं काही ठरलेलं होतं ते कळल्यावर मला बरं नाही वाटणार तू थांबलास तर. चल मग, परत भेटू नक्की. इतक्या काळानंतर नको भेटत जाऊ. छान वाटतं भेटून गप्पा मारायला. आह, as if माझे मित्र थांबलेत म्हणून मी कटवतेय तुला..तुलाच तर घाई आहे पळायची. हो, खरं तर. चल मग, bye. bye. 9.00 pm पोचलीस ना? हो. मी अजून मित्रांसोबत आहे. ओके. रागावलीस? मी? का? अशी तुटक का बोलतेयस? ओये, हेलो.. आज तुझ्यासोबत दीड तास गप्पा ठोकून आलेय. आणि म्हणे तुटक बोलतेय. ह्ये ह्ये. चल मग, नंतर बोलू. 10.00 pm आत्ता आलो घरी. घरी? मला वाटलं आज मित्रांसोबत पुण्याच्या रस्त्यांवर फुंकत घालवणार तू रात्र. नो, जस्ट आलो. हम्म. तू खूप छान दिसत होतीस. आय नो. मी नेहमीच छान दिसते. that’s true. पण तुला भेटून छान वाटतं मला. परत भेट कधीतरी. शुअर. चल, गुड नाईट. गुड नाईट... बाय द वे, तूपण छान दिसत होतास. रियली? हां, थोडा जंगली, पण सूट्स यू. हा हा, thanks. चल, गुड नाईट.. ... Last seen 12.40 Last seen 12.45 ...चुकलेले ठोके, हललेलं काही, काही तास, काही भास...
लेखनविषय:

वाचने 7856
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

:))

गप्पा आवडल्या. जे बाोललं गेलं नाही, त्या सूचक शक्यताही आवडल्या.

In reply to by आतिवास

नेमके असेच म्हणेन. सूचक शक्यता. अगदी नेमके. लेख तर आवडलाच, प्रतिसादही आवडला.

मस्त! आणि साध्या भाषेत मांडलं ते तर खूपच आवडलं! कारण जड जेवण आरोग्याला आणि जड शब्द विचारांना अपायकारक असतात अशी आमची धारणा आहे!

:)

की काल पन नी़क # जे काही असेल ते छान आहे आणि समयसूच्क आहे.
नी़क # मूळ ग्रामीण शब्द नीख म्हणजे निव्वळ अस्सल आणि इथे नीक या अर्थानेच घेत्ला आहे.
अखिल मिपा श्रावण मासी हर्ष मानसी गुलाबी स्वप्ने चोहिकडे,गेले वाचक कुणीकडे संघटना

म्हणजे, थेट भिडलं. " मी इथे काय काय अड़थळे पार करत आले, त्याचं तुला काही नाही, अन म्हणे इतका का उशीर केला " "आता या विषयावर किती वेळ फुगुन बसणार" "सॉरी म्हणते, पुढच्या वेळी नाय करणार उशीर, झालं समाधान" "बोलतो का आता ?" "नको बोलू , खोब-याच्या वड्या केल्या होत्या तुझ्यासाठी, देऊ का" इथे राग उडालेला असतो. :) -दिलीप बिरुटे (स्वप्नाळु)

न बोललेलं बरच काही ऐकू आलं !!

आवडलं. बिट्विन द लाइन्स वाचायचाही प्रयत्न केला, ;) स्वाती

ही घटना काल्पनिकच आहे हे मी पुन्हा एकदा ठासून सांगते. ;) ;) ;) पण अनेकांच्या मनाला जर काही मोरपिसं स्पर्शून गेली असतील, तर मला त्याचा फार आनंद असेल. त्या मोरपिशी भावनांबद्दल बोलायला गेलं तर.. वर अनेक कार्ट्यांनी म्हटल्याप्रमाणे, होता हैं.. त्यामुळे, असो. ;) बिटवीन द लाईन्स वाचणार्‍यांना, असं खरंच होवो अशी शुभेच्छा देणार्‍यांना, अगदी नेमके आणि सुंदर प्रतिसाद देणार्‍यांना, आवडल्याची पोचपावती आवर्जून देणार्‍यांना आणि वाचणार्‍या सर्वांनाच खरंच धन्यवाद.

:)

खुप मस्त.....