Skip to main content

श्रीखंड

लेखक Bhakti यांनी बुधवार, 10/04/2024 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
A श्रीखंड श्रीखंड .. गोठ्यातून ओह माफ करा डेअरीतून आणा दूध एक लीटर उकळी द्या येऊ एकदम बेटर ऊन ऊन दूध हो द्या कोमट विरजणाने जेव्हा होईल दही घट्ट सूती कापडात दह्याला बांधा निथळया पाणी पुरचुंडी टांगा टांगलेल्या जीवा होता तास पूर्ण चौदा चक्का..दिसता घट्ट ,पुरा झाला सौदा फेटा फेटा..

पुस्तक परिचय --'जाई' : सुहास शिरवळकर

लेखक सुजित जाधव यांनी बुधवार, 10/04/2024 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांमधील माझा सर्वात आवडता प्रकार (genre) म्हणजे प्रेमकथा.. कॉलेजमध्ये असताना मनाला रिझवणाऱ्या, भुरळ घालणाऱ्या, एक वेगळी अनुभूती देणाऱ्या अनेक प्रेमकथा मी वाचल्या आहेत. त्या काळात मला प्रेमकथा वाचनाची एक प्रकारची नाशाच चढली होती असं म्हणायला हरकत नाही.. सुशिंची दुनियादारी, खांडेकरांची अमृतवेल, ययाती, हिरवा चाफा, मिलिंद बोकिलांची शाळा, चेतन भगत यांची टू स्टेटस्, वपुंचे पार्टनर ई., अजूनही आहेत.

बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.)

लेखक भागो यांनी मंगळवार, 09/04/2024 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.) आधीचा भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52012 आम्ही फाईनडर प्रॉपरला राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. आमचे बऱ्यापैकी बस्तान बसले होते. बायकोची इच्छा होती काही काम करावे, म्हणजे घरखर्चाला हातभार लागेल आणि बरा टाईमपासही होईल. ती तिची मनो कामना पूर्ण झाली. घरा पासून जवळ एक शिशुविहार होता. तिथे तिला काम मिळाले. काम अगदी सोप्पं(?) होतं. दोन ते पाच वर्षांच्या मुलांना त्यांच्या आया तिथे सोडून जायच्या. त्या पण नोकरी करणाऱ्याच होत्या. काय करणार. त्याना पण त्यात मजा वाटायची अशातला भाग नव्हता.

गुढी पाडवा

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 09/04/2024 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्राची पालवी, मरगळ घालवी ।। कोकीळ कूजन, श्रीराम पूजन ।। तारीख रचली, अयोध्या सजली ।। मंदिर नवे, चैतन्य सवे ।। मंदिर मालकी, रामाची पालखी ।। गुढ्या तोरणे, नयन पारणे ।। आला मधूमास, संपला वनवास ।।

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 06/04/2024 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

असणे आणि दिसणे...

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 06/04/2024 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-article-navneet-r… Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app ज्या शाळेत शिकल्या म्हणे नवनीत राणा । ती अस्तीत्वात च नाही, म्हणे, हे कारण जाणा ।। पंजाबी चमार चे, केले मराठी मोची । विरोधकांनी केली, थोडा काळ गोची ।। जात प्रमाणपत्र, पाहता अवैध । मुलं घाबरली,आ

वासोटा जंगल ट्रेक

लेखक चक्कर_बंडा यांनी शुक्रवार, 05/04/2024 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २६, २०२४ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातंर्गातील, सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात वसलेला वासोटा हा एक पुरातन वनदुर्ग, पुर्वी घनदाट जंगलाने वेढलेला तर कोयनेवर बांधलेल्या धरणामुळे आता पाण्यानेही वेढला गेल्याने अधिकच दुर्गम झालेल्या या किल्ल्यावर शिवसागर जलाशयाच्या कडेला वसलेल्या बामणोली गावातून स्वयंचलित लाँचसेवेच्या मदतीने पोहोचता येते.

डीलर झाले लिडर..

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 05/04/2024 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.loksatta.com/politics/in-nanded-lok-sabha-bjp-s-ashok-chava… Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app डीलर झाले लिडर भित्रे झाले नीडर ।। झाले भाजपा-वासी, धरला भगवा दामन ।। दाग अच्छे है..., दागी झाले पावन ।। नानांचा रिक्रृटमेंट ड्राईव्ह, चर्चा हाॅटेल स्टार फाईव्ह ।। नेत्यांना करा अगवा, व

वाढदिवस स्पेशल: आलू बोंडे

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 03/04/2024 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझा ६३वां वाढदिवस. सौ. ने वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत शिऱ्याचा नैवैद्य दाखविला.

एक आत्मशोध...

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 03/04/2024 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.esakal.com/global/swedish-national-in-nagpur-in-search-of-b… घ्या कविता... कुणी आई देता का आई पेट्रीसिया विचारत जाई. स्विडन ते नागपूर घेऊन डोळ्यात पूर तपासल्या सर्व सरकारी नोंदी तरी सुटेना कोडे, तिची कोंडी. मला काहीच नको, नाही काही तक्रार, फक्त मला झोपू दे शांत मांडीवर एकवार तू टाकलेस आश्रमाबाहेर सोडले वा-यावर स्विडिश फरीश्त्यां नी झेलले वरवरच्या वर आंगणवाड्या,पोलीसस्टेशन, शांतीनगर जुन्या भागाला भेट, कुठलाच दुवा मिळाला नाही पुन्हा पाहून आले आश्रम-