मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीखंड

Bhakti · · पाककृती
A श्रीखंड श्रीखंड .. गोठ्यातून ओह माफ करा डेअरीतून आणा दूध एक लीटर उकळी द्या येऊ एकदम बेटर ऊन ऊन दूध हो द्या कोमट विरजणाने जेव्हा होईल दही घट्ट सूती कापडात दह्याला बांधा निथळया पाणी पुरचुंडी टांगा टांगलेल्या जीवा होता तास पूर्ण चौदा चक्का..दिसता घट्ट ,पुरा झाला सौदा फेटा फेटा.. पुरणयंत्री,कोण्या चाळणी वा हैण्ड मिक्सी एकास एक सम चक्का-पिठी करा एक भुरभुरा इलाईची-सुकामेवा आवडीचा निगुतीने करा हा श्रीखंड बेत आहे सवडीचा -भक्ती

वाचने 10857 वाचनखूण प्रतिक्रिया 17

Bhakti 17/04/2024 - 10:44
श्रीखंड पुरी जमलीये भारी मंडळींना वाटे प्यारी सर्वांची मी आभारी ;)

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/04/2024 - 12:33
+१ नाहीतर काय मुक्या प्राण्यांना प्रोटीनसाठी मध्ये घेण्यापेक्षा, डायरेक्ट ते जे घासपुस प्रोटीन घेतात ते खाऊन आम्ही प्रोटीन मिळवते.बाकी ज्यांना जे आवडतं ते त्यांनी खावं...नो इश्यू..

In reply to by बाबुराव

Bhakti 19/04/2024 - 12:29
अहो,आमची धाव केवळ लिंबाच्या मटणापुरती... बनवाबनवीची कृपा ;) बाकी तुमचा न आणि ण मध्ये घोळ सर्वत्र दिसतोय हो... मी पहिल्यांदा मटर पुरी वाचली .ती बनवते एकदा.