Skip to main content

एक आत्मशोध...

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 03/04/2024 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.esakal.com/global/swedish-national-in-nagpur-in-search-of-b… घ्या कविता... कुणी आई देता का आई पेट्रीसिया विचारत जाई. स्विडन ते नागपूर घेऊन डोळ्यात पूर तपासल्या सर्व सरकारी नोंदी तरी सुटेना कोडे, तिची कोंडी. मला काहीच नको, नाही काही तक्रार, फक्त मला झोपू दे शांत मांडीवर एकवार तू टाकलेस आश्रमाबाहेर सोडले वा-यावर स्विडिश फरीश्त्यां नी झेलले वरवरच्या वर आंगणवाड्या,पोलीसस्टेशन, शांतीनगर जुन्या भागाला भेट, कुठलाच दुवा मिळाला नाही पुन्हा पाहून आले आश्रम-गेट. तुझी नकोशी, त्यांची पेट्रीसिया अशीच का सापडली जनका स सिया (?!) आता शोधल्या शिवाय, जाणार नाही... कुणी आई देता का आई ?
लेखनविषय:

वाचने 1068
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया