कैलास लेणी आणि परिसर.........अनुभव-१
आमच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सर, त्यांनी विद्यार्थ्यांकडे 'वेरूळ-लेणी' भेट देण्याबाबद कल्पना मांडली. मी स्वतः औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये राहत असून हि एकदाही 'वेरूळ-लेणी' बघण्यास कधी गेलेलो नव्हतो. जवळच घृष्णेश्वर आणि खुलताबाद(रत्नापूर) भद्रा मारोतीला शंभर वेळा जाऊन आलेलो आहे. पण 'कैलास लेणी', अजून नाही!
आमच्या हडको ब्रँचचे ५-६ विद्यार्थी तयार झाले. औरंगपुरा आणि सिडको ब्रँच मध्ये जास्त उत्साही कार्यकर्ते होते.
दिवस ठरला आम्ही ६ जणांनी दुचाकीवर जाण्याचे ठरवले. औरंगपुरा आणि सिडको ब्रँचवाले मिनी बस करून येणार होते.
न्युरोलॉजी हॉस्पिटल
न्युरोलॉजी हॉस्पिटल
एक जागा जेथे
क्षणाक्षणात परिस्थिती बदलते
पेशंटची आणि साहजिकच नातेवाईकांची.
वेटिंग रूम, एक अनोळखी लोकांचा परिवार
एक जागा जेथे होत असते,
ईमोशन्सची, परिस्थितिची देवाणघेवाण.
चार वर्ष बेड वर असलेल्या ओंकार ची आई,
वाट बघतेय, त्याच्या तोंडून एक शब्द ऐकण्याची.
बाविशीतल्या तिवारीचे वडिल
सर्वांसोबत आनंद व्यक्त करताहेत, त्याने तीन महिन्यांनी दिलेल्या थोड्याशा प्रतिसादाची.
गावाकडचा नाले, देव नामाचा जप करतोय, आई कोमातून बाहेर येण्यासाठी.
केअरटेकर विठ्ठल, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त आणि चांगली कालजी घेतोय एका बाबांची.
काय चूक त्या माऊलीची, जिला सांगितले होते की, तिच्या लेकराला फक्त खरच
किल्ले ढाकची भरकटलेली भटकंती
खंडाळयाच्या घाटातील राजमाची किल्ला तसा ब-याच जणांच्या परिचयाचा आहे. राजमाची किल्ला हा श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या दोन वेगळ्या दुर्गांचा मिळून बनलेला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार हा किल्ला अजूनही मजबुतीने उभा आहे . घनदाट जंगलात वसलेल हे ठिकाण एकदा अवश्य भेट देण्यासारख आहे. दुरून ही जोडगोळी जितकी आक्राळ विक्राळ वाटते तितकी मात्र ती नाही.
माझी पहिली मैत्रीण रॉक्सी
शाळेतला “खंड्या” धडा वाचायच्या आधीपासूनच मला कुत्रा प्राणी फार आवडतो. माझं हे प्रेम खेड्यात सुरु झाल्याने ते अस्सल देशीच राहिलं. पुलंनी “रावसाहेब” मध्ये सांगितलेली वेव्हलेन्थ प्राणि मात्रांच्या बाबतीतही लागू पडते असा माझा अनुभव आहे.
ज्याच्या डोक्यावरून मी सहज हात फिरवला त्याने माझ्यात काय पहिले कोणास ठाऊक, तो थेट शेतापर्यंत सोबतीस आला. मी त्याला भाकरी दिली नव्हती न बिस्किटाची चटक लावली होती. फक्त प्रेमापोटी साथ देणार हे रस्त्यावरच पिल्लू नंतर माझा जिगरी मित्र झाला. माफ करा मैत्रीण झाली कारण ती एक कुत्री होती.
गर्यांच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!
मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गर्यांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गर्यांचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात.
साहित्यः
एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गर्यांचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर.
फोटो आंतरजालावरून साभार.
थोडे अंतर...
थोडे अंतर...
असावे तुझ्यामाझ्यात
थोडे अंतर
ठेवील ओढ ते निरंतर
असावा तुझ्यामाझ्यात
थोडा अबोला
संपेल तो मनवल्यानंतर
असावा तुझ्यामाझ्यात
थोडा गैरसमज
पडेल उमज समजल्यानंतर
असावा तुझ्यामाझ्यात
थोडा संशय
वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर
राजेंद्र देवी
काव्यरस
घोसाळ्याची (पारोश्यांची) भजी
या मोसमात मुबलक प्रमाणात ही भाजी बाजारात दिसते.
अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.
अपहार...
अपहार...
तीर तुझा घुसला आरपार
घाल तूच फुंकर हळुवारं
झाले असतील घायाळ बहू
मीच झालो तुझी शिकार
झंकारल्या तारा हृदयिच्या
सांग कसा देऊ नकार
भ्रष्ट या दुनियेत झाला
माझ्या हृदयिचा अपहार
राजेंद्र देवी
काव्यरस
मिसळपाव