न्यू यॉर्क : १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क
===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर...
"दिल्याने " होत आहे रे ...
"प्लिज मला सोडतोस का रे ऑफिसला" आशु एकदम घाईघाईत म्हणाली. ठीक आहे म्हणून निघालो आम्ही बाईकवर. वाटेत गप्पा मारताना सांगत होती "काल कॅश एक्सेस लागली, कुण्या एका वयस्कर व्यक्तीची पेन्शन मोजून घेण्यात चूक झाली असावी, आज गेल्या गेल्या कॅमेरा चेक करून आणि त्यांना फोन करून पैसे परत करते त्यांचे".
गाडी वाट काढत काढत कॅम्प पर्यंत आली तोच मागून एका रिक्षावाल्याने आवाज दिला, " ओ ताई तुमचा स्कार्फ पडलाय मागे तिकडे ". मी गाडी स्लो केली पण आशु म्हणाली प्लिज चल पुढे ... स्कार्फ मागे कुठे पडलाय काय माहिती ... वेळ जाईल अरे शोधण्यात". मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना.
पाचवी सावित्री
सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात.
पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.
एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.
समेट....
समेट....
रम्य ती पहाट, शांत तो घाट,
चंद्रभागेचा हलकासा खळखळाट
गळा तुळसीमाळा, मुखी विलसतसे हास्य
रम्य तो आरतीचा थाट
गजबजला बघ हा चंद्रभागेचा घाट
कीर्तनी दंग पाहा ते भाट
युगानुयुगे उभा विठू माझा ताठ
धन्य ती पाउलिची वीट
आता कोठली वारी धरिली खाट
बोलाव माउली कर आता समेट
राजेंद्र देवी
काव्यरस
पहिलं पाऊल
क्षणात क्षण विरत गेला
काळ ही पुढे चालत गेला
अबाल राहिलो आजही तसेच
कर्तव्य ना दिसले कुठेच
उद्या करीन म्हणता म्हणता
उद्या कधी आलाच नाही
दाभोळकर, कुलबूर्गी गेले
तरी आम्हाला जाण नाही
हो, मस्त चाललंय आमचं
पण पोट मात्र भरत नाही
शोधून शोधून थकलो, पण
समाधान कुठे मिळत नाही
इराक, सिरीया साक्ष आहे
भविष्य फार स्पष्ट आहे
सावरा लवकर स्वतःला
ऐका तळमळीच्या साद ला
कुठून येतात कन्हैया, उमर
पुरे आता यांचा कहर
का नाही पुरस्कारांचा मान
हेच का सामाजिक भान
बदललं पाहिजे वाटतं
बलिदान, निस्वार्थ जाचतं
शक्य आहे तुम्हा आम्हालाच
फक्त पहिलं पाऊल लागतं.....
The Place of Peace
जसा पाण्याने वाहण्याचा आपला धर्म कधी सोडला नाही तसाच आम्हीही निरंतर रस्त्याने प्रवास करण्याचा आमचा छंद गोडी लागल्यापासून आजवर सोडलेला नाही. असाच या निरंतर रस्त्यांचा वर्षाचा शेवटचा प्रवास आम्ही मावळ्यांनी ५ dec २०१५ रोजी करण्याचा योजिला. पण नेहमी प्रमाणे जागा ठरत नव्हती, आणि नेहमीप्रमाणेच टांगू came up with an idea of हरिश्चंद्रगड…!!
धोनी - ऐसी न कोई होनी
सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ ....
इमोटीकॉन(Emoticon) / ईमोजी(Emoji)
काल रात्री माझ्या आत्येबहीणीशी चॅट करताना मी ईमोजी परिवारात नव्यानेच सामील झालेली एक ईमोजी वापरली. आणि काहीही शब्दात न लिहिता तिला माझ्या भावना कळल्या. Do pictures speak more than words? Sometimes… Yes… Definitely. आणि ह्याच्या सर्रास वापरामागे खरं तर शोधामागे हाच तर खरा उद्देश्य आहे. जणू लेखक वाचकाला सांगत असतो कि तू वाचताना ते कोणत्या भावनेने वाचावेस. नाही का?
मग काय आहे हा प्रकार आणि नक्की कधी सुरु झाला म्हणून आंतरजालीय शोध घेतला आणि लक्षात आलं की ईमोजी आणि इमोटीकॉन हे दोन भिन्न प्रकार आहेत. हे दोन्ही एकमेकांशी संलग्न असले तरीही.
केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ५
पंधराव्या शतकात म्हणजे साधारणपणे १४८८ मधे पहिला युरोपियन दर्यावर्दी Bartolomeu Dias केपच्या किनार्यावर येऊन पोहोचला. येथील रुद्र वादळी लाटा, अत्यंत ओबडधोबड खडकांचा किनारा, बेभरवशाचे हवामान आणि सैतानी वेगाचे वारे अनुभवल्यामुळे या भागाला त्याने नाव दिले ' केप ऑफ स्टॉर्म्स'. हळूहळू मात्र केपला वळसा घालून सुदूर पूर्वेला जाणे शक्य आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात यायला लागले होते. इथून आपल्याला पूर्वेकडच्या देशांशी दळणवळणाचा आणि व्यापाराचा राजमार्ग मिळतोय हे एकदा समजल्यावर मग केप ऑफ स्टॉर्म्स हे निराशादायी नाव मागे पडून 'केप ऑफ गुड होप' हे नवीन नाव प्रचलित झाले.
मिसळपाव