Skip to main content

न्यूत की द्यूत?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 09/05/2024 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे.

वाट पहाणं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 09/05/2024 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
वाट पाहाणं “सखी,मंद झाल्या तारका आता तरी येशील का?” हे गाणं माझ्या कानावर पडलं.किती आतुरतेने सखा तिची “वाट” पहात आहे,हा विचार मनात आला आणि वाटलं, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा वाट पाहतअसतो?आपण छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहत असतो. रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी. नवीन चित्रपट पाहण्याकरता तिकिटांसाठी. नव्या फूलांचा सुगंधी वास दरवळून आणणाऱ्या वसंत ऋतु येण्यासाठी. आतुरतेने मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मेलमधील आपल्या स्वीकृत पत्रांसाठी.आपल्या कुटुंबांतील व्यक्ती परदेशी असताना काम झाल्यावर परत घरी येण्यासाठी. आपल्या सेवानिवृत्तीसाठी. करिअरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी.

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 09/05/2024 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
रोबोट्सनी जग जिंकले होते माणूस इतिहास जमा झाला होता. पण रोबोट्सना पोट नव्हते, त्वचा झाकण्याची गरज नव्हती आकांक्षा नव्हत्या त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले आता पुढे काय असा प्रश्न पडला जेव्हा त्यांना मिसळपावच्या अर्काईव्हमध्ये माहितगारची एक जुनी कविता आढळली मग त्यांनी पोट असणारे त्वचा झाकाविशी वाटणारे आकांक्षा असणारे जन्म मृत्यू असणारे रोबोट बनवले असा लावला रोबोटमय जगाने माणसाचा पुर्नशोध

एआय रोबोट प्रोफेसर

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 09/05/2024 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाला शिकण्यासाठी शिकवणारा गुरू लागतो म्हणून मीच बनवला हा एआय रोबोट प्रोफेसर अपल्याला शिकवण्यासाठी यापुढे त्याचे विद्यार्थी रोबोट असतील ?

समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/05/2024 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता, "समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा" सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले, "आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही. तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो.

नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

लेखक मार्गी यांनी बुधवार, 08/05/2024 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल ✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण ✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग ✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं! ✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल ✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका ✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध सर्वांना नमस्कार. सध्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये थोडा आल्हाददायक थंडावा मिळावा, म्हणून हा वेगळ्याच विषयावर लिहीण्याचा प्रयत्न. गेल्या काही महिन्यांमध्ये काही दिवस आजारी असल्यामुळे व फ्रॅक्चरमुळे आराम करत असताना सहज म्हणून ह्या व्यक्तीरेखा आठवल्या.

ब्रम्हांडं आणि कृष्णविवर (ब्ल्याक होल)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/05/2024 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.पोंक्षना, कृष्णविवर(ब्ल्याक होल) ह्या विषयावर बोलून थोडी माहिती द्यावी अशी विनंती केली. ते म्हणाले, “ कृष्णविवर,म्हणजेच ज्याला,ब्ल्याक होल म्हणतात ते, आपण पाहू शकत नाही, असं असूनही आपण दावा करतो की ते अस्तित्वात आहे. आपण हा दावा कोणत्या आधारावर करतो?

सोनचाफ्याची फूलं आणि तो स्पर्श

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/05/2024 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी. सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परिसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती. टाक्कारांची सुम्या आणि केसकरांचा गुरूनाथ एकुलती एक मुलं.ल्हानपणी लपंडाव,लंगडी खोखो हे त्यांचे नेहमीचे खेळ असायचे.जवळपासच्या मित्रांना सामील करून खेळायचे.

प्रकाश नारायण संत

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 08/05/2024 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच परत एकदा लंपन ची आठवण झाली बेळगावी कडची मराठी भाषा असलेली प्रकाश नारायण संत यांची हि कादंबरी आणि त्यावरील पुलंचे विचार या विडिओत नितीन धर्मधिकारी यावर चित्रपट काढीत आहे असे ऐकलंय https://www.youtube.com/watch?v=Tu3_IibrVrk

आता फक्त काढ दिवस

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/05/2024 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनाला लागतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस?