Skip to main content

सह्याद्रीच्या बाजूबाजूने एक रोडट्रिप

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 16/05/2024 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच महिन्यात आम्हा तिघा मित्रांची निखळ अशी रोडट्रिप केली नव्हती, तो योग अचानक आला. मित्राने नवी कोरी इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड घेतली होती, पण त्यातून आमचं फिरणं झालं नव्हतं. सरता पावसाळा होता. १६ सप्टेंबरची रात्र. मित्राचा रात्री साडेअकराला फोन आला. मी नेहमीप्रमाणेच लवकर झोपत असल्याने झोपेतच फोन घेतला. "अरे आपल्याला उद्या पहाटे पाच साडेपाचला माळशेजला जाण्यासाठी निघायचंय, तेव्हा तयार राहा, 'दुसराही येतोय" बरं म्हणालो. मी रोजच तसाही पहाटे पाचलाच उठत असल्याने गजर लावायची गरज नव्हती. साडेचार पावणेपाचला उठलो, आवरत होतोच तितक्यात पहिल्याचा फोन आला.

सोनचाफ्याचची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 15/05/2024 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्‍या त्या आठवणी सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना ती कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली. आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला. म्हातार्‍या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन ती सर्व मंडळी मुंबईला आली.

पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 15/05/2024 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या. काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो.

माझ्या वहितला एक उतारा,-मनोदशा (mood ).

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वहितला एक उतारा.--- मला आठवतं हा उतारा लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो. शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती. वैताग आला होता. दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं. आजही तसंच वाटत होतं.म्हणून माझ्या वहितला उतारा वाचत होतो. “ मला असं वाटतं की,( मूड ) मनोदशा सतत बदलत असते आणि काही सेकंदात बदलली जाऊ शकते. जीवनातला एखादा क्षण पुसला किंवा बदलला जाऊ शकत नाही, परंतु केवळ आठवणींच्या संदर्भातून मागे वळून पाहिलं जाऊ शकतं.

त्या तरूतळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 14/05/2024 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अशोकाच्या पारावर सीतामाय उसासते सोनमृगाच्या मोहाला मनोमन धि:कारते शमीवृक्षाचा विस्तार शस्त्र पार्थाचे झाकतो प्रत्यंचेला स्पर्शण्यास शर अधीरसा होतो वृद्ध बोधिवृक्षातळी गौतम नि:संग बसे बोधरवि उगवता दिव्यप्रभा फाकतसे अजानवृक्षाच्या तळी ज्ञानयोगी अविचल अभावाच्या कर्दमीही प्रतिभेचा परिमळ नांदुरकीची डहाळी आज कशाने हलते? अणूहुनी सूक्ष्म कोणी सारे आकाश व्यापते!

अनमोल आहे जीवन अपुले मित्रांनो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवे वादळ आणू पाहात आहे जीवनाला परखूं पाहात आहे जे अपशब्दापायी बेचैनीत हरवले त्यांना पुन्हा शोधावे असे वाटे मला जीवनाशी प्रतिघात करता, जे थकले अशासंगे हसत रहावे असे वाटे मला अनमोल आहे जीवन अपुले, मित्रांनो उत्सवी उघडपणे राजी व्हावे वाटे मला सरहद्दीवर शव वस्त्र ओढून आहेत उभे, हिम्मत त्यांची वृद्धिंगत करावी वाटे मला जरका एखादा मोका मिळू शकला मला, मनुष्याचे दुःख विसरवीणे असे वाटे मला कवीला जरका नसेल कसले सामर्थ्य, शांती,सुरक्षा दुनियेत यावी असे वाटे मला *

प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी श्री समर्थांना म्हणालो, “बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना एकदम निर्णयाला येतात.मग तो त्यांचा निर्णय सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असू शकतो. मी तुम्हाला हे असं का विचारतो ह्याचं एक कारण झालं आहे. परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर मला ह्याने सांगितलं की,ती फोनवरची व्यक्ती मला मी उद्धट, अहंकारी आहे असं म्हणाली. ऐकून मला वाईट वाटलं “ असं म

(चार दिवस मिळाले असता )

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 14/05/2024 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा वाचक सुज्ञ आहेत. बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे... चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?

वरवर लहान वाटणारे अनुभव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं. माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली. मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं.

काय करावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे तजवीज आहे काय करावे मन उद्विग्न आहे काय करावे काफिला मार्गस्थ असताना स्तब्ध झाला आहे काय करावे प्रसन्नता शोधीत असताना अनुपस्थित झाली आहे काय करावे मित्राची जरूरत असताना नाराज झाला आहे काय करावे संवाद मनस्थितीचा असताना नियम लागू झाला आहे काय करावे हर एक व्यक्ती अपुला फायदा शोधीत आहे काय करावे चोहिकडून फक्त आश्वासन प्राप्त होत आहे
काव्यरस