भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांना, त्यांचे नाव एका जीवाणूच्या नामकरणासाठी वापरून, नासाने सन्मानित केले !
भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट! "भारतासाठी अभिमानास्पद" असे मुद्दाम लिहिले आहे. कारण आज डॉ अब्दुल कलाम हयात असते तर त्यांना त्यांच्या अनेक सन्मानांसारखेच या सन्मानाचेही फारसे अप्रूप वाटले नसते. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेल्या माझ्यासारख्या चाहत्याला या क्षणी अवर्णनीय आनंद झाला नसता तरच आश्चर्य!
असामान्य शास्त्रज्ञांचा सन्मान, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टीचे नामकरण त्यांचे नाव वापरून करण्याचा प्रघात आहे. ते कधी एखाद्या जैविक प्रजातीचे नाव, तर कधी एखाद्या ग्रह/तारा/खगोलशास्त्रीय समूहाचे नाव, तर कधी एखाद्या परिमाण/नियम/संकल्पनेचे नाव, इत्यादी असते.
मिसळपाव