लट उलझी सुलझा जा बलमा
लट उलझी सुलझा जा बलमा
बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.पंडित भीमसेन यांचे गायन ऐकावयास गेलो होतो. त्यांनी सुरवात केली "चतुर, सुदरा बालमवा " . म्हटले "वा, हा चतुर बालम काय करतो ते कळले तर आपल्याला थोडे मार्गदर्शन होईल." पण कसले काय, तानांच्या जोरदार मार्यात पंडितजी काय म्हणत आहेत त्याचाच पत्ता लागेना.,बलमा राहिला बाजूलाच ! मग एकदा छॊटा गंधर्व यांची "न च सुंदरी करू कोपा" ची तबकडी ऐकत होतो. नारी मज बहु असती येथ पर्यंत गाडी ठीक चालली होती पण पुढे तानांच्या भेंडोळ्यात शब्दच कळेनात. पण आता ठरवले चतुर बलमा ची चीज शोधणे आपल्याला शक्य नाही पण नाट्यगीत तर मिळेलच की. मिळाले.
मिसळपाव