Skip to main content

झिन झनन निनादत होते

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 01/06/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांचे इमले रचता रचता मी इथवर आलो पण वीट वीट कोसळता नि:शब्द, खोल मी उरलो त्यावेळी जखमी अवघे भवताल सोबती होते विझत्या शब्दांच्या संगे झिन झनन निनादत होते शब्दांच्या विझत्या ज्योती उतरती गडद डोहात तरि नाद कुठुन हे येती जणु पैंजण रुणझुणतात -मी काठावर, की मीच खोल डोहात? -की रुणझुणतो मी, पैंजण होऊन त्यात?
काव्यरस

ऊन

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 01/06/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसाचा ताप संपला कि ऊन उदास होऊन कोपऱ्यात एकटे बसते. आपण कुणासाठी सावली झालो नाही म्हणून हुरहुरते, हळहळते. अंधारात गडप होऊन पाण्यापलीकडचे मृगजळ शोधू लागते. -शिवकन्या
काव्यरस

खिडकीतला पाऊस!

लेखक सचिन काळे यांनी गुरुवार, 01/06/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपूर्वीच मुंबईत हळूहळू पावसाला सुरुवात झालीय. घामाची चिकचिक आणि उन्हाने त्रस्त झालेल्यांचा, आता पावसाचे आगमन होणार याची नांदी मिळाल्याने जीव सुखावला आहे. पावसाच्या सरी पडलेल्या पाहून मला तर आनंदाने नाचावासे वाटू लागले, आणि मी फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली. "पाऊस आया!!!.....एssss पावसामें नाचोssss!!!!...... ढिंगचॅक्! ढिंगचॅक्!! ढिंगचॅक्!!!......." मोराला आपला पिसारा फुलवून पावसात नाचताना जेवढा आनंद होत असेल तेवढाच मलाही पहिल्या पावसात भिजताना आनंद होतो. पहिल्या पावसाची मजा घेऊन झाल्यानंतरसुद्धा मला कधी पावसाचा कंटाळा येत नाही.

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - जुन २०१७ - हार्ट रेट मॉनीटर (भाग १)

लेखक विंजिनेर यांनी गुरुवार, 01/06/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "विंजिनेर"! व्यायामात आपले हृदय महत्वाची भूमीका बजावते.

विवाह: परंपरा आणि प्रतिष्ठा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/06/2017 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे विवाह कसे छोटेखानी असावेत, लग्न खर्च कसा कमी असावा, हुंडा घेणे बेकायदेशीर आहे अशा चर्चा नेहमी ऐकू येतात. पण प्रत्यक्षात परंपरा टाळण्याची उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. हा लेख दुसर्‍याला सांगण्यासाठीचा केवळ उपदेश नाही. आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी माझ्या मुलीच्या विवाहाबद्दल बोलतो. (आधी केले मग सांगतोय): माझ्या मुलीचा विवाह ठरवताना मुलीच्या संमतीने मी काही अटी घातल्या होत्या.

हेडफोन आणि आयुष्य

लेखक amit१२३ यांनी गुरुवार, 01/06/2017 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेडफोन आणि आयुष्य आता एकसारखंच वाटायला लागलंय. रोज सकाळी उठून गुंता सोडवायला सुरुवात करावी लागते. रोज विचार करतो हे असं होत तरी कसं..कधी सहज रित्या गुंता सुटतो तर कधी खूप वैताग येतो. मग तो तसाच ठेवून पुढच्या कामात झोकून देतो. दिवसभर मात्र हेडफोन आणि आयुष्य या दोन्हीचा विसर पडतो. संध्याकाळी मात्र जरा रिलेक्स झाल्यावर पुन्हा या दोन्ही गोष्टी आठवतात. मग पुन्हा गुंता झालेल्या या गोष्टींची उकल करण्यास सुरुवात होते. छोटीशी गाठ पण खूप त्रास देते पण ती सुटल्यावर मात्र मनस्वी आनंद मिळतो.

चंद्रशिला ट्रेक

लेखक अजय भागवत यांनी गुरुवार, 01/06/2017 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालयात ट्रेकिंग करणारे अनेकजण आहेत. काहीही विशेष नाही. पण जर एखाद्याला चंद्रशिला ट्रेक बद्दल माहिती हवीच असेल तर येथे पहावी - https://drive.google.com/file/d/0B8a9AFSuwpEscFl6MUVLeVYwckU/view?usp=s… फोटो पाहायचे असतील तर येथे पाहावेत - https://goo.gl/photos/8nyD3bMpEcACqttU6

देवाचे मनोगत

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 01/06/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटाच आहे मज एकटाच राहू दे काय मागणे असे ते मी तुजसी देतो रे स्तुतिसुमनांचा वर्षाव जरी करिसी मजवरी तरी संतोष बहुत मज परी जवळीक न साधी रे तू वेगळा मी वेगळा पडू नको गळी रे देवत्व कठिण आहे रे तुज पेलणार नाही रे अंतर राखणे बरे रे तुज अंतरी थारा नको रे तू मम सौंदर्यात लिप्त होउन राही रे सर्वस्व मजला वाहुनी कवटाळिशी दारिद्र्य रे सुखी होउनी संसारी राहशील तर बरे रे तू संत ना महंत ना बुद्ध ना भदंत नर नारायण जोडी एकदाच झाली रे लीला माझी पठण करी कीर्तने प्रवचने करी मज जवळी येताची होशील निर्माल्य तू रे
काव्यरस

अँजेलिना जोलिची 'कुंडली' भाग: २

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 31/05/2017 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग: १ स्थळ : PINK LOTUS BREAST CENTER , LOS ANGELES Dr. Kristi Funk च्या कन्सल्टिंग रूममध्ये अँजेलीना जोली तिचा BRCAचा ( BReast CAncer ) जेनेटिक्स रिपोर्ट काळजीपुर्वक वाचत होती, तपासणीमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन्समध्ये म्युटेशन आढळले होते. अशा पेशंटला सल्ला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा Dr. Kristi Funk ना दांडगा अनुभव होता, त्यामुळे हॉलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री अँजेलीना जोली निश्चिंत होती. जोलीच्या चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचा तणाव दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनाही तिच्याशी संवाद साधायला सोपे जाणार होते.