अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १
अशक्य (कथा) (काल्पनीक) - भाग १
तपंजय शिक्षण संस्थेची इमारत नेहमी प्रमाणेच गजबजलेली होती . इमारतीसमोरच्या पटांगणात मधल्या सुट्टीमधे विद्यार्थ्यांचा खेळ , दंगा चालु होता . या सगळ्या धामधुमीतही संस्थेचे प्राचार्य , प्राध्यापक नीलकंठ हे आपल्या ऑफीसमधे बसुन कुठल्यातरी महत्वाच्या विषयावरील लेख लक्षपुर्वक वाचत होते .
"सर , आत येउ का ? " या प्रश्नाने प्रा. नीलकंठ यांची समाधी भंग झाली . त्यांनी समोर पाहिले . एक शिक्षक ऑफीसच्या दारापाशी उभे राहुन विचारत होते . त्यांनी आपल्या बरोबर एका विद्यार्थ्याला जवळ जवळ जबरदस्तीने हाताला पकडुन आणले होते . त्या मुलाचा हात काळानीळा पडला होता .
मिसळपाव