Skip to main content

सेकंड लाईफ - भाग ७

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 05/09/2017 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ सेकंड लाईफ - भाग ५ सेकंड लाईफ - भाग ६ ------------------------------------------------------------------------------------------------- दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफीसला गेलो.

क्रॉस सबसिडी

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 05/09/2017 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
क्रॉस सबसिडी काल सकाळी सकाळी एक रुग्ण आला होता. खाऊन पिऊन सुखी दिसत होता.गळयात, हातात सोन्याच्या साखळ्या. वय वर्षे २८. इकडे दुखतंय तिकडे दुखतंय. सोनोग्राफी केली तेंव्हा अति दारू पिण्यामुळे यकृतात चरबी भरलेली दिसत होती. आतड्याला सूज आलेली दिसली त्यांना सांगितले हे बाहेर खाण्यामुळे तुम्हाला अन्न विष बाधा झाली आहे. त्यावर ते म्हणाले अहो मी रोजच बाहेर खातो. (व्यवसायाने बिल्डर आहे. मुंबईत पनवेल मध्ये वडिलोपार्जित भरपूर मालमत्ता आहे. ) कुठे खाल्ल्यामुळे झाली ते सांगता येईल का? मी म्हणालो असं कसं सांगणार? बाकी काही नव्हतं. जाताना विचारलं "कन्सेशन" किती?

बाप्पाचा नैवेद्यः साधे सोपे मलई पेढे

लेखक मीता यांनी मंगळवार, 05/09/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
IT मधल्या लोकांना (म्हणजे मी.. ) नीट काही जमत नाही असा माझ्या मातोश्रींना जाम विश्वास आहे . निदान यावेळेस तरी बाप्पाला काहीतरी स्वतः बनवून खाऊ घाल असा विनंतीवजा हुकूम आल्यावर मी आणि बाप्पाने एकाचवेळेस आवंढा गिळला .. नेमकं काय बनवायचं याच्यावर विचार करताना - ते सोपं पाहिजे, चवीला चांगलं पाहिजे , दिसायलाही छान दिसलं पाहिजे , मेहनत कमी हवी आणि अतिमहत्वाचं म्हणजे बाप्पा आणि मातोश्रींना ते आवडलं पाहिजे .

उदय कॉर्लिग्झम्सचा

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 05/09/2017 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
मायकल आपल्या डोळयातील पाणी टिपत व्यासपिठावरुन खाली उतरला. प्रत्येक भाषणाच्या शेवटी तो असाच भावनिक व्हायचा. मनाच्या गाभा-यापासुन उमटणा-या भाषणांमुळेच त्याच्या चाहित्यांची संख्या वाढतच जात होती. दरवेळेस भाषणानंतर त्याच्याभोवती लोकांचा गरडा पडायचा. व्यासपिठावर हजारो श्र्ओत्यांना साद घालणारा मायकल यावेळेस मात्र मुका होऊन जायचा. गर्दीतुन स्मितहास्याने तो तिथुन बाहेर पडायचा आणि थेट समुद्र किनारा गाठायचा. आपल्या उध्वस्त भुतकाळाच्या खुणा तो त्या समुद्रकिना-यावर शोधत असे. कॉर्लिग नावाच्या एका लहानश्या देशात मायकल रहात असे. ह्या कॉर्लिग देशाच्या भुभागाला तिन्ही बाजुने अथांक समुद्र लाभला होता.

मेंदुला दुखापत

लेखक रानरेडा यांनी सोमवार, 04/09/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदुला दुखापत पाशवी गवत आहे पाशवी गवत आहे खेळ आणि डेझी चेन आणि हसणे स्मरण पथ्यावर ल्यूनी ठेवण्यासाठी आला पापी हॉलमध्ये आहे पार्सर्स माझ्या हॉलमध्ये आहेत या कागदाच्या चौकटीत चेहर्यावर जमिनीवर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी पेपर बॉय अधिक आणतो आणि जर बांध काही वर्षांनी खुले होते आणि जर टेकडीवर काहीच जागा नसेल आणि जर आपले डोकेदेखील अंधाऱ्या विरहीत असतील तर मी तुम्हाला चंद्राच्या गडद बाजूला बघितो पागल माझ्या डोक्यात आहे पागल माझ्या डोक्यात आहे आपण ब्लेड लावा, आपण बदल करा मी पुन्हा विचार करेन 'जोपर्यंत मी समजणार नाही आपण दार लॉक आणि कळ टाकून द्या माझ्या डोक्यात कोणीतरी आहे पण मी नाही आहे जर मेघगर

पंख पसरून उडणारी डुकरे

लेखक रानरेडा यांनी सोमवार, 04/09/2017 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
पंख पसरून उडणारी डुकरे तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस आणि मी हि तुझी कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर कधीतरी पावसाकढे बघत कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे - कवी उडता डुक्कर उर्फ रानरेडा उर्फ कुत्तो मे कामिना (रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)

ओळख

लेखक अमित रेडीज यांनी सोमवार, 04/09/2017 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
नसतो मी कधी भारतीय का मिळे मला हा शाप ओळख माझी का रे असली आधी धर्म मग जात शोधलेस तर सापडतील बघ गुण अवगुण सगळ्यांत नको कुणा तू कमी रे लेखुस बघून धर्म अन जात आरक्षण ही जरूर असावे क्रयशक्तीच्या हिशेबात नका तिथेही आणून ठेवू ह्याचा धर्म नि त्याची जात

अमेरिकेतील किराणा खरेदीचा अनुभव

लेखक Jack_Bauer यांनी सोमवार, 04/09/2017 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
हि २०१० सालातील गोष्ट आहे. मी अमेरिकेत नुकताच आलो होतो आणि त्यावेळी स्मार्टफोनचे तितकेसे प्रस्थ नव्हते आणि माझ्याकडेही स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींसाठी गूगल करणे नसायचे. मी माझ्या रूममेट बरोबर रहात होतो आणि अमेरिकेत येऊन मला ४ दिवस झाले होते. घर दाखवताना घरमालकाने इथून १० मिनिटावर किराणा - भाजीपाला ह्यासाठीच दुकान आहे असे सांगितले होते. पहिले २ दिवस भारतातून आणलेले पदार्थ खाऊन काढले पण आज जरा गरम खायची हुक्की आली. रूममेटला कांदा बटाट्याचा रस्सा करता येत होता , तो म्हटला मस्त रस्सा आणि भात करू , तू सामान घेऊन ये . आता किराणा आणण्याची गरज होती.