Skip to main content

मला आलेला अनुभव -२

लेखक ओरायन यांनी सोमवार, 02/10/2017 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला अनुभव -२ ह्यात मी छोटे छोटे दोन अनुभव एकत्र केले आहेत. कारण प्रत्येकासाठी ऐक ऐक वेगळा धागा काढणे शक्य नाही व ते व्यवहार्यदेखील नाही. आपण कधी पूर्णपणे आपल्यावरील ताबा गमावला आहे का ? म्हणजे कधी पूर्णपणे वेळेस्वाधीन झाला आहेत का ? ' वेळ आली पण काळ आला नाही' या उक्तीचा तुम्हाला अनुभव आला आहे का ? मला दोन वेळेस आला आहे. १. नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. माझी 'पोहायला शिकण्याची' तयारी चालू झाली होती. तसे बघायला गेलो तर हे पोहायला शिकण्याचे वय उशीराच झाले. मात्र त्याचा एक फायदा (कि 'तोटा' ?) म्हणजे आई वडिलांचे आपल्यावर वाढलेला विश्वास. काळजी करण्याचे प्रमाण कमी.

नाशिककर मिपाकर

लेखक सचिन७३८ यांनी सोमवार, 02/10/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकच्या मिपाकरांचा कट्टा आयोजित करावासा वाटतो आहे. तेव्हढ्याच भेटी-गाठी होतील. नाशिककरांचे काय मत आहे?

कट्ट्याची जागा व वेळ :

रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता 'गावरान मिसळ', थोरात फार्म, दिंडोरी रोड, नाशिक (कढीभेळवाल्या कुलकर्णी फार्मसमोर)

तेथेच गप्पा व मिसळ खाण्याचा कार्यक्रम (TTMM बेसिसवर) होईल.

(ता. क. : TTMM - तुम्ही तुमचं आम्ही आमचं)

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 02/10/2017 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40787 दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी - १.दमा निदान होण्यास उशीर का होतो २.श्वसननलिकेची रचना दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत. A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते. B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ...

मला भेटलेले रुग्ण - ९

लेखक डॉ श्रीहास यांनी रविवार, 01/10/2017 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40777 पेशंटसोबत मुलगी आणि जावई आलेले होते ...... तपासणी झाल्यावर रिपोर्ट्स सांगितले.... औषध कशी घ्यायची, पेशंट प्रशिक्षण कार्यक्रमला येण्याची तारीख दिली .... आणि अजून काही विचारायचं आहे का असं म्हटल्याबरोबर पेशंट नी तक्रार केली कि मुलं लक्ष देत नाहीत तब्येतीकडे , बराच त्रास सहन करावा लागतो ह्या वयात ..... त्यांना कळायला पाहिजे ..... मी विचारलं कि सोबत कोण आहेत आलेले , तेव्हा पेशंट बोलला जावई आणि मुलगी आहेत ...

अभिजन आणि बहुजन वर्गातल्या सीमारेषा पुसट करणारा कलावंत

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 01/10/2017 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजला असताना हॉस्टेलला राहायचो. त्या हॉस्टेलला बाहेरच्या राज्यांमधून आलेल्या हाय फाय मॉडर्न अशा मुलीही राहायच्या. 'जो जिता वोही सिकंदर'मधले मॉडेल कॉलेजचे 'पजामा छाप' पोरं रजपूत कॉलेजमधल्या मुलींकडे ज्या नजरेनं बघायचे, त्याच नजरेनं मी आणि माझे 'लुजर' मित्र त्यांच्याकडे बघायचो. लांबूनच. त्या वेळी आमच्यासाठी त्या अप्राप्य अप्सरा होत्या आणि आम्ही मर्त्य मानव. त्या मुली इंग्लिशमध्ये बोलत आणि इंग्लिश गाणी ऐकत. त्यांचा-आमचा आर्थिक स्तरच नव्हे तर अभिरूची आणि तत्सम स्तरही खूप वेगळा होता.

बोली आणि भाषा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/10/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही.

बोली आणि भाषा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/10/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही.

मुंबईकर . . . . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/09/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ? अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? भिजला असतास पावसात तर सुकवता आलं असतं स्वतःला . .