Skip to main content

काय विचार करताय?

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 09/10/2017 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच बोली आणि भाषा या लेखावर गापै यांची प्रतिक्रिया वाचून डोक्यात काही विचारचक्रे फिरू लागली. त्यात एक मुद्दा असा आला कि भाषा हि एका व्यक्तीसाठी किती गरजेची आहे? आपण लहानपणापासून काही भाषा शिकतो आणि हळूहळू त्याच भाषेत "विचारही" करू लागतो. विचार करताना आपल्याला कोणाशीही चर्चा करायची नसते किंवा कोणाला मुद्दा समजून सांगायचं नसतो तरीही आपण आपल्याला शिकवलेल्या भाषेतच विचार करतो.

बिझनेस नेट्वर्किंग क्लब्स बाबतीत ८ टिप्स

लेखक १००मित्र यांनी सोमवार, 09/10/2017 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
बिझनेस नेट्वर्किंग आपल्या व्यवसायाचे जाळे वाढावे व अधिकाधिक योग्य व्यक्तींपर्यंत आपला व्यवसाय पोचावा, तसेच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा ह्याकरीता उत्तम (एकच नव्हे) मार्ग म्हणजे बिझनेस क्लब्स द्वारे अत्यंत सुनियोजित पद्धतीने नेट्वर्किंग करणे. २०१४ पासून ते २०१६ पर्यंत मी स्वत: BNI ह्या नेट्वर्किंग क्लब चा सभासद होतो. बऱ्यापैकी सक्रीयही होतो. सध्या ब्रेक वर आहे.

पावसामुळे काय काय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 08/10/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
पावसामुळे काय काय तुझी झाली ओली अर्धी साडी अन माझाही भिजला पुर्ण खांदा एकाच छत्रीमुळे झाला वांधा वरतून दणका जोरदार पावसाचा साथीला गोल गोल टपोर्या गारा भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा आणीक खोल फसला माझा चिखलात पाय धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला प्रश्न: अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा. १) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा. २) पावसामुळे कसे परिणाम झाले?
काव्यरस

चाळिसाव्या कोसावर

लेखक रामदास यांनी रविवार, 08/10/2017 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल. आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं. घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत. मग चौथीत असताना इंग्रजी वाचायला लागलो आणि ‘हितवाद’चा वाचक झालो.

Making of foto and status : १. गंप्या आणि झंप्या

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 08/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : तीन वर्षांपूर्वी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पूर्ण शंभर दिवस मी एक मालिका चालवली होती. मी रोज माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये एक फोटो डकवत असे, आणि स्टेटसमध्ये त्या फोटोसंबंधी काही चविष्ट लिहीत असे. प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा.

बळी [शतशब्दकथा]

लेखक निओ यांनी रविवार, 08/10/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.

चिकन ६५ का ब्वा??

लेखक सत्याचे प्रयोग यांनी शनिवार, 07/10/2017 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच वेळा चिकन ६५ घरी केले गेले आणि सारखा मनात प्रश्न घोळत होता या रेसिपीला चिकन ६५ का ब्वा म्हणत असतील ?? उत्सुकतेने गूगल काकाकडे काही माहिती शोधली तर बरीच रंजक माहिती मिळाली. 1) पुर्वीच्या साऊथ इंडियन लोकांमध्ये 'कोण किती मिरच्या खातो' याच्यावरून चुरस असायची. यातूनच एका हॉटेल व्यावसायिकाने एक डिश बनवली. त्या डिशमध्ये एक किलो चिकनमध्ये ६५ मिरच्या असायच्या. म्हणून चिकन-६५ ! 2) ही डिश अस्तित्वात आली, त्यावेळी तिला आधी काही दिवस लोणच्यासारखं साठवून ठेवलं जायचं आणि मगच सर्व्ह केलं जायचं. साठवून ठेवण्याचा हा कालावधी ६५ दिवसांचा असायचा आणि म्हणून चिकन-६५ !