Skip to main content

धरणीचे मनोगत

लेखक वैभवदातार यांनी बुधवार, 11/10/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
हे गगनराजा , थांबव तव उष्ण किरण शरा तव ऊर्जेने मज दाह होतो विनविते तुजला आज धरा उष्ण वात वाहती भवती तप्त ऊन पडे निष्पर्ण त्या वृक्ष लताना पाहुनी धरणी रडे शुष्क होती नद्या जलाशय तडफडती त्यात जलचरे एकमात्र ह्या थेंबासाठी शांत विहग चहूकडे विचरे वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला? तव अनलशरे तनूसी भेगा आता किती मी साहू? हे दिनमणी न कळे मजला तुजवीण कोणा मी पाहू? करद्वय जोडुनी नमिते तुजला थांबव हे तप्त आप वरुणराजा बरसआता शमवि मम शरीर ताप ---- शब्दांकित वैभव दातार

लेखकाची थेट भेट !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 11/10/2017 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात. साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत.

एका रात्रीचा थरार

लेखक लाल गेंडा यांनी बुधवार, 11/10/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिनेशने वडापावचा मोठ्ठा घास घेतला आणि समोर बसलेल्या दीनुकाकांकडे पाहिलं. साठीत पण म्हातारा चुणचुणीत होता. डोळ्यातलं तेज जरासं उतरल्यासारखं वाटत होतं पण खरं किती होत तेच जाणे. दिनेशला इथे येऊन दहाच दिवस झाले होते. या दहा दिवसांत दिनूकाकांनी त्याला नोकरीच्या सगळ्या खाचाखोचा समजवून दिल्या होत्या. त्यांचं अख्ख आयुष्य चौकीदारीत गेलं होतं. कोकण सुरू होतो घाटांनंतर तिथलं पहिलं गाव हे. एका बाजूला घनदाट जंगल, डोंगर, त्याच्या दर्या-खोऱ्या आणि दुसऱ्या बाजूला त्यातून वाहणारी ती छानशी सुबक पण छोटीशी नदी. दिनेशला पहिल्या फटक्यातच सगळं आवडलं होत.

जुळ्यांचं दुखणं!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 10/10/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर. त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न. माझ्या मते, आजकाल जुळ्यांचं प्रमाण वाढलं आहे ते वंध्यत्व(infertility) साठी घेतल्या जाणाऱ्या थोड्या आक्रमक(!) उपचार पद्धतीमुळे. बऱ्याच डॉक्टर लोकांशी झालेल्या बोलण्यातून असं समजलं की हे उपचार चालू असतील तर २-३ गर्भ राहणं खूप कॉमन आहे. आमच्या बाबतीत तेच झालं असावं.

सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...

लेखक वैभवदातार यांनी मंगळवार, 10/10/2017 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता... आता कशाला पावसा तू उगाच कोसळतोस उभी राहिली पिके ही का त्यांना भिजवतोस नक्षत्रे पावसाची सारी संपली ती आता रे सरला आश्विन आता अन् आली आली दिवाळी रे असा अवेळी तू येता उडे खूपच धांदल मेघ गर्जना विद्युत काळे काळे हे बादल नको रागाने बरसू नको आणू रोगराई दिवस सण उत्सवाचे आहे लगबग घाई निरोप घेऊन धरणीचा पुढल्या वर्षी रे तू यावे आगमन होईल शिशिराचे तू आता उगी राहावे -- शब्दांकित (वैभव दातार )

आनंदभूमी भूटान (भाग -१ )

लेखक योगेश आलेकरी यांनी मंगळवार, 10/10/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
a आनंदभूमी भूटान (भाग -१ ) भारत आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये आपले इवलेसे सांस्कृतिक व भोगोलिक अस्तित्व टिकवून असलेला एक सार्वभौम देश भूटान. स्थानिक लोक भूतान ला 'द्रुक युल' संबोधतात म्हणजे ड्रॅगनचे घर. देशाचा जवळपास सर्वच भूभाग हा डोंगराळ प्रदेश त्यामुळे नीसर्गिक साधनसंपत्तीची नुसती रेलचेल.

सिक्कीम ची सैर

लेखक योगेश आलेकरी यांनी मंगळवार, 10/10/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
सिक्कीम ची सैर खूप दिवसाची पूर्वांचल भटकंतीची इच्छा पूर्ण होणार होती, ऑगस्ट २०१६ कोलकाता येथून दुचाकीवरून सुरु झालेला प्रवास पश्चिम बंगाल, असम, मेघालय, त्रिपुरा, मिझो, अरुणाचलप्रदेश करून आता वेध लागलेले ते सिक्कीम या राज्याचे. भूतान देशाला वळसा घालून असम, बंगाल प्रांतातून प्रवास करून सिक्कीम जावे लागणार होते. प्रचंड वादळी वारा व पाऊस यामुळे प्रवासाचा १८ वा मुक्काम अनपेक्षितरित्या धुपगुडी येथे पडला. ७ सिस्टर्स गटात अलीकडेच समावेश झालेले हे एक छोटंसं पण नितांत सुंदर राज्य आता माझ्यापासून फक्त १२८ किमी दूर होतं.

मधुघट१

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 10/10/2017 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
मधुघट कुणा मिळे भरलेला शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।। बळ कैसे येईल अंगा जळही दुर्मिळ भासतसे अमृताची जरी हाव नसे ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।। लोळे कुणी मखमालीवरी वणवण, हाय! कुणा ललाटी भलीबुरी, ही जगरहाटी! कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।। भला जाणता दीन नेणता कष्ट करी अमाप जरी जैसे तैसे रहावे धरी साखरपाणी तो प्यालेला ।।३।। - संदीप चांदणे

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

लेखक मिल्टन यांनी सोमवार, 09/10/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली.

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

लेखक मार्गी यांनी सोमवार, 09/10/2017 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
अपयशातून शिकताना रामराम! सायकल नव्याने सुरू करून चार वर्षं झाली आहेत. सायकलीच्या सोबतीत इतकं काही शिकायला मिळालं, नवी दृष्टी मिळाली! ह्या पूर्ण प्रवासात सायकलसह अनेक दिग्गज सायकलपटू, फिटनेस क्षेत्रातील मातब्बर आणि प्रेरणा देणारे लोक सतत भेटत आहेत! हे निवेदन सुरू करण्यापूर्वी ह्या सर्वांना एकदा नमन करतो. माझी मागची शेवटची सायकल मोहीम किंवा मोठी राईड २०१५ डिसेंबरमध्ये होती. तेव्हा दुस-याच दिवशी मी पूर्ण गळून गेलो होतो. वाटलं होतं की, सायकलिंग सोडूनच द्यावं. प्रत्येक सायकलिस्टला हा अनुभव अनेकदा येतोच. पण असो, सायकल काही सुटली नाही.