शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कालपर्यंत मी सुद्धा अशी काही कल्पना केली नव्हती... पण सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असते, याचा फर्स्ट ह्यांड अनुभव घेतला मी!
===============================================================================
कार्यालयीन कामानिमित्त गेल्या आठवड्यात बंगलोरास आलेलो, आणि वीकेंड मैसुरच्या कार्यालयात घालवून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच घरवापसी करणार होतो. हा मैसुर म्हणजे महिषासुराचा धाकटा भाऊ आणि बकासुराचा चुलत भाऊ असावा असं उगीच वाटत रहातं. असो. तर, दिवाळीच्या आधीच्या वीकांताला मी घरात नसल्याने सौ तुफान चिडलेली...