Skip to main content

पाटील मालक

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाटील मालक. ".....या माणसाने एकही सल्ला न देता किंवा एका पैशाचीही मदत न करता मला अनेक गोष्टी शिकवल्या !" असे मी एखाद्याविषयी म्हणालो तर नक्कीच विचारात पडाल की याने नक्की काय केले असेल? ..विचारलं तर मलाही नीट सांगता येणार नाही, पण ओळख झाल्यापासून अवघ्या एक-दीड वर्षांतच या व्यक्तीने कांहीही न बोलता माझ्यावर प्रचंड प्रभाव टाकला.. आणि आज ओळख होऊन बारा तेरा वर्षे सहज झाली असावीत. आजही तो प्रभाव कमी झाला नाहीये. त्या दिवसात मी कॉलेज करून पार्ट टाईम जॉब करत असे.

जीना यहाँ, मरना यहाँ...

लेखक अभिदेश यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
एक टिपिकल सकाळ. डोळ्यांवर अजूनही असलेली झोप. कोणीतरी हाका मारून उठवतंय. आपल्याला उठवत नाहीये, पण नाइलाज आहे. कसंबसं उठून, अर्धवट झोपेत ब्रश सुरू झालाय आणि तिकडे रेडियोवर 'भूले बिसरे गीत' सुरू झालंय. लता गातेय - कधी 'राजा की आएगी बरात...', तर कधी 'बरसात मे हमसे मिले तुम...'. सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांच्या आणि खासकरून सकाळची शाळा असलेल्यांच्या घरातलं हे अगदी रोजचं दृश्य. सकाळपासून सुरू झालेला रेडिओ हा रात्री छायागीत, बेला के फूल ऐकूनच बंद व्हायचा.

La Ruta del Cares

लेखक निशाचर यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
अटलांटिक महासागराला पायाशी घेऊन उभा असणारा उत्तर स्पेन! लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरच्या खर्‍याखुर्‍या पाऊलखुणा इथे पाहायला मिळतात, तशीच पस्तीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वी मानवाने रंगवलेली गुफाचित्रंही. पण सोळाव्या शतकात अमेरिका खंडाहून युरोपला परतणार्‍या खलाश्यांसाठी या भागाचं वेगळंच महत्त्व होतं. जिवावर उदार होऊन केलेल्या सागरसफरीनंतर युरोपच्या भूमीचं प्रथमदर्शन त्यांना होत असे उत्तर स्पेनच्या एका पर्वतरांगेमुळे.

हातोळे

लेखक सूड यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

हातोळे


बदलापुरात अनंत हलवायाकडे श्रीखंड घेताना एकदा हा पदार्थ दिसला होता. खायला अगदी चविष्ट वाटला. खाताना, त्यात काय काय असावे याचा अंदाज घेत केलेली ही पाकृ.


साहित्यः

शेवटचा दिस....

लेखक चॅट्सवूड यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
"सर कुठं जायचंय?" "अरे, त्या पुलावरून घे ना" मी टॅक्सीच्या ड्रायव्हरला सांगितले. त्याने मान डोलावली. त्याने गाडी पुलाच्या दिशेने वळवली. मी टॅक्सीच्या मागच्या सीटवर एकटाच बसलो होतो. मी बाहेर बघितले. रात्र झाली होती, पावसाने जोर पकडला होता. बाहेर गाड्यांची संख्या तशी कमीच होती. बरे आहे, मी डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. मी वाकून माझे डोके माझ्या दोन पायांमध्ये सरकवले. मी तसाच बसून राहिलो. ड्रायव्हरने माझ्याकडे नाराजीने बघितले. मी कण्हत होतो.

दृकश्राव्य विभाग :- राजा बेवड्याची गोष्ट (वर्‍हाडी कथा)

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

ह्या माणसानं एकाले एक कड्यांग वऱ्हाडी ल्येख लिवून उलीशीक वऱ्हाडी आमालेबी शिकोली नं बाप्पा! आता दिवाळी अंकात आयकतीन का थे? तुमाले मालूम झालं अशीनच का काय दंगल करून ठेवेल हाय तं!
Footer

दृकश्राव्य विभाग :- आठवणीतली दिवाळी - चिन्मयी सुमित

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 कॅमेरामागे : ज्योति अलवनि कॅमेरासमोर : चिन्मयी सुमित गोष्ट ... चा पहिला अध्याय चालू असताना ज्योति ताईने सतिश राजवाडेंना साक्षात हजर करुन उपक्रमाला एक अनपेक्षित भेट दिली होती ! काही काही उपक्रम आणि त्यांच्याबरोबर आपणहुन येणारे ज्योति ताईसारखे लोकं यांचे ऋणानुबंधच असतात असं म्हणायला हवं. याही वेळी त्या घेऊन आल्या आहेत आपल्या भेटीला चिन्मयी सुमित यांना.

मला भेटलेले रूग्ण - ११

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 19/10/2017 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

वाटते आज

लेखक shrivallabh Panchpor यांनी गुरुवार, 19/10/2017 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते आज वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफुटून घ्यावे शब्दांना नवे पंख असावे आकाशी घेउनी मला उडावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे शब्दांना नवे श्वास द्यावे माझ्या श्वासांशी एकरूप व्हावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे शब्दांशिवाय काव्य आज स्फुरावे यमकाने मग स्वतःशीच हसावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे कवितेला आज विषय नसावे माझ्यातल्या मला मीच शोधावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे शब्दांच्या कोषात कवितेने जन्मावे फुलपाखरू होऊनी रंग उलगडावे वाटते आज नव्याने