Skip to main content

प्रतिभेचे देणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/11/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती ठिणगी होऊन येते अन वणवा होऊन छळते ती लकेर लवचिक होते अन गाण्यातून रुणझुणते ती कधी निखारा होते विझुनी मग होते राख उमलविते त्यातून फूल मग तिचीच फुंकर एक ती उल्केसम कोसळते उखडून दिशांचे कोन धगधगत्या चित्रखुणांची ती लिहिते भाषा नविन जे तरल नि अक्षर ते ते, जे अथांग, अदम्य ते ते, जे दूर असूनही भिडते, जे जटिल तरी जाणवते, ते तिचेच देणे असते…. …..किती घ्यावे? तरीही उरते !
काव्यरस

सांज

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 13/11/2017 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
अंग पेटून सांज जीव चिरते पापण्यांच्या पंखातून हळूच पाणी फिरते सय येता हुंदका कंठात फुटतो गहिवरलेल्या क्षितीजातून उदास रंग गळतो प्राणाच्या ओघळीत व्याकूळ शीळ तडफडते काळोखाच्या काठावरती दिवसाचे बन विझते खोल खोल गात्रात पिरतीचा मोहोर जळतो उरात आसवांचा झरा उचंबळुनी वाहतो
काव्यरस

!! श्रद्धांजली !!

लेखक जागु यांनी सोमवार, 13/11/2017 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील कै. शशिकांत गणपत घरत उर्फ अण्णा. अण्णांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथील फुंडे गावचा. आई,वडील चार भाऊ आणि पाच बहिणी असा आग्री समाजातील भला मोठा परिवार. अण्णा भावांमध्ये शेंडेफळ. अण्णांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. घरी शेती व मिठागरे होती. अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने सगळ्या मुलांना सक्तीने शाळेत घातलेले.

व्होल्टेज स्टॅबिलायझर ची गरज

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 13/11/2017 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी टीव्ही / फ्रीज विकत घेताना त्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी सोबत व्होल्टेज स्टॅबिलायझर सुद्धा विकत घ्यावा लागत असे . हल्लीच्या काळात या उपकरणांसाठी व्होल्टेज स्टॅबिलायझर आवश्यक आहे का ? असल्यास कुठल्या कंपनीचा व्होल्टेज स्टॅबिलायझर चांगला आहे ?

बोली भाषा 'नगरी'

लेखक ओरायन यांनी सोमवार, 13/11/2017 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक : चंद्रशेखर अवटी *अहमदनगरची आवडती 'बेक्कार' बोली* नगरी बोली अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरी या बोलींप्रमाणे ठळकपणे उठून दिसणारी निश्चितच नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. उत्तर बाजूने खान्देश, पूर्वेला मराठवाडा, पश्चिमेला कोकणकडा, दक्षिणेला सोलापूर-पुणे यामुळे आसपासच्या प्रदेशाचा मोठा प्रभाव लगतच्या कोपरगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा अशा काही तालुक्यांवर आहे. मराठीतले अव्वल ग्रंथलेखन, महानुभावांचे म्हाइंभटासह अनेक ग्रंथकार आणि लीळांची स्थाने इथलीच. ज्ञानेश्वरी, नाथपंथीयांचे ‘अमर-शिष्य संवाद’पासून लेखन याच परिसरात घडले.

हे टाळता आले असते? -३ एरोपेरू: फ्लाईट- ६०३

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 13/11/2017 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
हे टाळता आले असते? -१ वारिग फ्लाईट २५४ हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३ १ ऑक्टोबर, १९९६ रात्री मियामीहुन, सॅन्टियागो, चिली येथे जाणारे बोईंग - ७५७ लिमा, पेरू आंतराष्ट्रीय विमानतळावर नियमित थांबा घेण्यासाठी उतरले तेव्हा त्यात १८० प्रवासी होते.

गूढ अंधारातील जग

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 12/11/2017 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग आपण कधी खिडकीच नसलेल्या कार्यालयात काम केलं आहे का? महिनोंमहिने सूर्यप्रकाश , चंद्रप्रकाश, उघडे आभाळ पाहिलेले नाही. तीन तीन महिने २४ तास त्याच त्याच माणसांचा चेहरा पहिला आहे का? तीन महिने सलग बिन अंघोळीचे राहिला आहात काय ? आणि वापरलॆले कपडे न धुता टाकून दिले आहेत का? डिस्पोझेबल डायपर नव्हे तीन महिन्यात केस कापता आले नाहीत म्हणून एखाद्या गोसाव्यासारखे वाढू दिले आहेत का?

डेरमाळ-पिसोळ ट्रेक

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी रविवार, 12/11/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
         डेरमाळ-पिसोळ ट्रेक   ङेरमाळ आणि पिसोळ, फार दिवसांपासून हुलकावणी देत असलेले बागलाणातले अनवट किल्ले. गाळणा टेकड्यांमध्ये वसलेल्या या किल्ल्यांची उंची जरी फार नसली तरी विस्तार विस्तृत आहे. त्यामुळे एकेक किल्ला शांतपणे बघायला एक संपूर्ण दिवस तरी हवाच. सतराव्या शतकामध्ये  राठोडवंशीय बागुल राजे पिसोळसह इतर किल्ल्यांवर वास्तव्यास होते. त्यांच्यावरुनच या प्रांताला बागलाण असे नाव पडले. ३२ वा बागुल राजा नामदेव याने गवळी राजाचा पराभव करुन पिसोळ, डेरमाळ व मुल्हेर हे किल्ले घेतले.

Making of photo and status : ६. च्यामारी !!!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 12/11/2017 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय.