Skip to main content

निवडुंग तरारे इथला....

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 10/12/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
In Flander's Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या डॉ. जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. एका अनाम युद्धक्षेत्रावर लढताना वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांचं हे भावविभोर मनोगत. युद्ध निषेधार्ह असतं, घातक असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी अजूनही ते आधुनिक जगातलं एक अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही वाचताना मनाला चटका लावून जाते. ही मूळ कविता व तिचा मी केलेला भावानुवाद.

मिपा धुळवडः इतर मिपाकरांची उणीदुणी काढण्यासाठीचा धागा

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 10/12/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी गुजरात निवडणुकांवर काढलेल्या धाग्यावर विनाकारण अन्य कुठल्या तरी धाग्यावरील गुजरात निवडणुकांशी काहीही संबंध नसलेले मुद्दे आणायचा प्रकार घडला हे सर्वांनी बघितलेच आहे. आणि जे काही मुद्दे मांडले होते त्याला मुद्दे न म्हणता एकमेकांची उणीदुणी काढणे हा प्रकार होता हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. गेल्या काही दिवसात हा प्रकार अनेकदा बघायला मिळालेला आहे. मिपावर थोडीफार इतर मुद्द्यांवर चर्चा होतेच त्याला नक्कीच ना नाही. तेव्हा गुजरात निवडणुकांवरील धाग्यावर आताच्या निवडणुकांवर चर्चा न होता व्यापक राजकारणावर चर्चा झालेली समजू शकतो.

Making of photo and status : १०. अंतिम भाग (समारोप)

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 10/12/2017 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 समारोपाचे मनोगत : काही अपरिहार्य कारणास्तव (कोणतेही कारण न सांगण्याकरिता हे एक चांगले कारण असते, नाही!!!? हा! हा!! हा!!) माझी ही मालिका मी थांबवत आहे. तरी मी असे करण्याचे कारण सांगतो. गेले दहा आठवडे म्हणजे अडीच महिने मी ही मालिका चालवत असताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, की दर रविवारी मी मालिकेचा नवीन भाग प्रसिद्ध करतो.

द डेक्कन क्लिफहँगर..!!!

लेखक मोदक यांनी रविवार, 10/12/2017 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मंडळी.. आपल्याला गोव्याला जायचंय, पण इतर पब्लिक जातं तसं नाही, जरा हटके. चला आपण DC मध्ये भाग घेऊ." असे डॉ श्रीहास (तेच ते 'मला भेटलेले रूग्ण' वाले) एका कट्ट्यादरम्यान बोलले आणि ग्रुपमध्ये चैतन्य वगैरे वगैरे बरेच कांही सळसळले. खूप दिवसात नवीन कांही न केल्याची खुमखुमी होतीच.. आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वजण उत्साहाने सज्ज झाले. द डेक्कन क्लिफहँगर (DC). पुण्यातून निघून महाबळेश्वर आणि पुढे कर्नाटकातून गोवा. अशी ६५० किमीची सायकल रेस.

किक भाग २ - नुन - कुन चे साम्राज्य...

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 09/12/2017 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
किक... भाग १ भारतातल्या प्रत्येकासाठी अभिमानास्पद अशी युद्धभूमी, कारगिल. याच्या दक्षिणेला आणखी एक युद्धभूमी आहे. .... बायकर्स साठी. या युद्धभूमीवर शत्रू म्हणावे असे दोनच. एकतर आत्मविश्वासाचा अभाव किंवा अति-आत्मविश्वासाचा प्रभाव. याशिवाय धोकादायक खिंडी, हिमनद्या, उत्तुंग हिमाच्छादित पर्वत आणि या सगळ्यातून जाणारा खडकाळ, लांबच लांब आणि कधीच संपणार नाही असा वाटणारा रस्ता. ठिकठिकाणी बर्फ वितळून वाहणारे आणि आधीच न दिसणाऱ्या रस्त्याला पूर्णपणे झाकून टाकणारे दगाबाज ओढे.

पुनश्च टेबल माऊंटन

लेखक पिशी अबोली यांनी शनिवार, 09/12/2017 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी केप टाऊनला कामानिमित्त जाऊन आले, त्यानंतर परत लगेच जाता येईल असं वाटलं नव्हतं (झैरात-http://www.misalpav.com/node/38109). पण पुन्हा एकदा मला नेण्यापुरता प्रोजेक्टकडे फंड आहे, हे सांगत दीडेक महिन्याभरानंतरची तारीख नक्की करणारा तिथल्या प्रोफेसरचा मेल आला, आणि तयारीची गडबड सुरू झाली. मागच्या वेळेस भेटलेल्या लोकांना कळवणे, वर्षभरातल्या कामाचा आढावा घेणे या सगळ्या धामधुमीत दसरा-दिवाळी पार पडली. माझ्या नशिबाने व्हिसा वेळेत आला, पण जाण्याच्या दिवशी पर्यंत करन्सी मिळालेली नव्हती.

पुणे ते लेह (भाग ५ - जम्मू ते श्रीनगर)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 09/12/2017 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
२९ ऑगस्ट काल रात्री ज्याने रूम दिली तो लॉजच्या काउंटरवर बसलेला मालक का मॅनेजर जो कोणी असेल तो आणि अजून एका व्यक्तीचे जोरजोरात भांडण. का संभाषण ? बहुतेक भांडणचं. भाषा... बहुतेक उर्दू सतत खालून वरच्या आणि वरून खालच्या मजल्यावर दोघांचेही धावत जाणे. त्यामुळे भयानक वाजणारा लॉजचा लाकडी जिना. आणि हा सगळा बिनडोकपणा मध्यरात्री २ ते २:३० ह्या गाढ झोपेच्या वेळेत जर कुणी करत असेल तर तुम्ही काय करू शकता?

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/12/2017 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.

होट्टल

लेखक DAGDU यांनी शनिवार, 09/12/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.

वैद्यकीय 'मेवा'

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शनिवार, 09/12/2017 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्यकीय 'मेवा' ! डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे.