"ओ मंडळी.. आपल्याला गोव्याला जायचंय, पण इतर पब्लिक जातं तसं नाही, जरा हटके. चला आपण DC मध्ये भाग घेऊ."
असे डॉ श्रीहास (तेच ते 'मला भेटलेले रूग्ण' वाले) एका कट्ट्यादरम्यान बोलले आणि ग्रुपमध्ये चैतन्य वगैरे वगैरे बरेच कांही सळसळले. खूप दिवसात नवीन कांही न केल्याची खुमखुमी होतीच.. आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वजण उत्साहाने सज्ज झाले.
द डेक्कन क्लिफहँगर (DC). पुण्यातून निघून महाबळेश्वर आणि पुढे कर्नाटकातून गोवा. अशी ६५० किमीची सायकल रेस. विशेष म्हणजे सोलो रेसिंग करणार्यांसाठी ही रॅम क्वालिफायर रेस आहे (रॅम म्हणजे रेस अॅक्रॉस अमेरिका - अमेरिकेच्या पश्चिम टोकाकडून पूर्वेकडे तब्बल ५००० किमी सायकलने पार करायचे)
तर.. बरीच बरीच चर्चा करून.. देशपांडेमामा, डॉ श्रीहास, सुमीत आणि sagarpdy उर्फ पाध्ये हे चार मिपाकर रेस रायडर्स..
शैलेंद्र, प्रशांत, आनंदराव, स्थितप्रज्ञ आणि मोदक हा सर्पोर्टिंग क्रू..
अशी एक जबरदस्त टीम तयार झाली. 4 Horsemen असे नामकरणही झाले.
या रेसचा वृत्तांत थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडतो आहोत. प्रत्येकाने लिहिलेले भरपूर किस्से आणि फोटोंमधून हळूहळू रेस उलगडत नेऊ.. त्या त्या लेखकाचे नांव ठळक शब्दात हायलाईट करतो आहोतच.
******************************************************
.
सागर ६० च्या स्पीडने रोडी पळवत असताना प्रशांतने डॉकला दिलेली अधिक माहिती ;)
बाकीचे लोकं पण प्रॅक्टिस करत होते..
.
मामा खंबाटकी घाट चढताना..
.
खंबाटकी घाटातच.. गाडीचा स्पीडोमीटर बघा..!
चारचाकी गाडीसाठी दिलेली स्पीडलिमिट मामांना सायकल चालवताना अनेकदा कमी पडत होती. ;)
मामा.. खंबाटकी घाट उतरताना. (इथेही स्पीड बघा..!!)
..आणि हा व्हिडीओ.
.
सायकलने घाट चढणे हा सागरचा छंद. संधी मिळाली की सायकलने बोपदेव, खंबाटकी, सिंहगड चढायला तयार. त्यामुळे DC रूटची चर्चा पसरणीच्या 10-12 किमीच्या घाटावर आली की सागरचे नांव पुढे. मोदक आणि बाकी लोक म्हणत होते, वेगाने एवढं चढायला नाही जमत, मध्ये मध्ये रायडर बदलू, पण सागर ऐकायला तयार नाही. बदललेल्या रायडर चा वॉर्म-अप नसेल वगैरे थेर्या चिकटवून याने अख्खा घाट नावावर करून घ्यायचा याचा बेत केला होता. कृ अध्यक्ष मोदकराव मात्र अजून राजी झाले नव्हते. त्यांनी अट घातली होती.. एकदम सास-बहू सिरीयल स्टाईल "सागरला माझ्या मनाप्रमाणे पसरणी कापता आला नाही, तर रेस डे ला अर्ध्या घाटात मामांना उतरवणार" रेकी च्या दिवशी पण मामांना अर्ध्या घाटातून उतरवायची रंगीत तालीम ठरली होती.
रंगीत तालमीच्या दिवशी सुरूर गावाजवळ मामा गाडीत, सागर ने राईड सुरू केली. वाईपर्यंत हलक्या गिअर मध्ये स्पिनिंग करून पाय मोकळे करून घेतले आणि पसरणी आला. स्पिनिंग न सोडता तसाच चढायला सुरुवात केली. मोदक-प्रशांत यांना आधीच सूचना दिली होती, 'पाणी भरपूर लागतं - तयार ठेवा'. त्याप्रमाणे मोदक दर किलोमीटरला पाणी घेऊन उभा राहत होता आणि सागर 'एवढ्यात नकोय' सांगून त्याला निराश करत होता. अर्धा घाट संपला, मोदकाने मामांना उतरवलं. सागर मागोमाग होताच. ट्रॅफिक मुळे अधूनमधून थांबायची वेळ येत होती. नव्याने वापरायला सुरू केलेले क्लिट पॅडल सोडवायची मस्त प्रॅक्टिस. दत्त मंदिर मागे सोडलं, पाऊण तासात घाट संपला. अक्षरी पंचेचाळीस मिनीटात..!!!
मॅप्रो गार्डन मध्ये नाश्त्याचा फडशा पाडताना मोदक सागरला ते 3 जादुई शब्द बोलला - 'पसरणी घाट तुझा'
.
सागर.. पसरणी घाटाच्या सुरूवातीला.
.
पसरणी घाट संपला.. पाध्ये सायकलवर आणि प्रशांत फोनवर..
******
औरंगाबादकरांनीही प्रॅक्टिस पार पाडली.. त्याचे फार फोटो नाहीत मात्र हा एक धमाल व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये शेवटी तो माणूस सोटा घेऊन नक्की कुणाला टोले द्यायला उभा होता ते शेवटपर्यंत कळाले नाही. ;)
.
.
मोदकाने केलेली तयारी... रेस रूट, मॅन्युअल, टीम स्ट्रॅटेजी आणि गाड्यांच्या टेंपररी नंबरप्लेट.
.
टीम स्ट्रॅटेजी आणि कोण नक्की काय रोल पार पाडणार याची चर्चा..
(डावीकडून - आनंदराव, मोदक, स्थितप्रज्ञ आणि डॉ श्रीहास)
.
३ नोव्हेंबर:
DC च्या आदल्या दिवशी रेस ब्रिफींग साठी सगळेजण परांजपे स्किम भूगांव येथे जमले. तेथे गेल्यावर सायकलला चिकटवलेले रिफलेक्टर, पुढचा व मागचा लाईट, हेल्मेट, अंगावरचं रिफ्लेक्टीव्ह जॅकेट असं सगळं सगळं चेक करवून घेतलं. काय अफलातून सायकल्स होत्या तिथं.. व्वा..!! ५० हजारांपासून ते ८ लाखांच्या रेंजच्या सायकल्स..!! सुमीत आणि सागर दोघंही थोडेसे हिरमुसले होते कारण ह्या सायकल्सपुढे आपला काय निभाव लागणार असं त्यांचं म्हणणं होतं आणि एका दृष्टीनी बरोबर पण होतं. डाॅक आणि शैलेंद्र नी समजुत काढण्यासाठी म्हणून सांगितलं की "आपल्याकडच्या रस्त्यांवर ह्या महागड्या सायकली कामाच्या नाहीत" पण बराच वेळ ते दोघं डिप्रेस्ड होते...
आता सपोर्ट व्हेईकलच्या तपासणी साठी मोदक, शैलेंद्र आणि सुमीत बाहेर पार्कींग मध्ये गेलेले असतांना सागर, डाॅक आणि मामा गप्पा मारत होते. तेवढ्यात फुसऽऽऽऽऽऽ आवाज आला आणि सागरच्या सायकलचं मागचं चाक उभ्या उभ्या पंक्चर झालं होतं. नेमकं मामांच्या सायकलचं पण समोरचं चाक २० मिनीटांपुर्वीच हवा सोडून बसलेलं होतं !! सागर बिचारा केलिलवाणा चेहेरा करून बसला.
सपोर्ट व्हिईकल १ - फोर्ड एंडेव्हर
.
सपोर्ट व्हिईकल २ - पोलो.
.
ब्रिफिंग आणि रेस पूर्वीची तयारी.. या फोटोत डावीकडे निळ्या जर्सीमध्ये बसला आहे तो अमित समर्थ. भारताचा दुसरा सोलो रॅम फिनिशर.
.
मार्च इनसाईड.. रजिस्ट्रेशन काऊंटरजवळ.. मोदक, शैलेंद्र, सागर आणि डॉक
.
आयत्यावेळी सायकलला रिफ्लेक्टर चिकटवण्याची गडबड.. पाध्येंना प्राणप्रिय फेल्टला मॅचिंग रिफ्लेक्टर चिकटवताना खूप यातना झाल्या होत्या. ;)
...आणि मामा चक्क हेल्मेट विसरून आले होते. :D
.
बाकीचे स्पर्धकही तयार होत होते..
.
रेस जर्सी घालून टीम तयार झाली..!!!!
डावीकडून - सागर पाध्ये, डॉक, देशपांडे मामा आणि सुमीत
.
सायकलसह..!!
.
टारगेट.. द डेक्कन क्लिफहँगर..!!!!
(क्रमशः)
************
भाग २ - द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे..!!
************
डॉ श्रीहास
६ जुलै : डॉकच्या पुणे भेटीदरम्यान प्रशांत म्हणाला शैलेंद्र जवळच राहतो. मग शैलेंद्रच्या घरी मोदक, प्रशांत आणि डॉक येऊन धडकलेच!! हो धडकलेच कारण बोलणे झाल्यापासून पाचव्या मिनीटाला सगळेजण शैलेंद्रच्या घरी पोहोचले होते. फक्त कायप्पा गृप मध्ये ओळख असलेले हे लोकं पूर्वी कधीच भेटलेले नव्हते. घरी पोहोचल्यावर कळालं की नुकतीच लडाखवारी करून आलेले शैलेंद्र उजवा गुडघ्याचं एक कार्टिलेज तिकडेच अर्पण करून आलेत आणि इथं पुण्यात ऑपरेशनचा आनंद घेऊन घरी आराम करत होते. "तुमची एंडेव्हर सपोर्ट व्हेईकल म्हणून द्याल का DC साठी?" असं विचारले, "हो घेऊन जा आणि हवं तर मी पण येतो" असं म्हणणारे शैलेंद्र टीमचा अविभाज्य भाग झाले. ३१ ऑगस्ट : "मी रेसचे पैसे भरतोय..!!" मामांचा मेसेज आला आणि DC ला टिमचं रजिस्ट्रेशन झालं. आता रेस स्पिरीट की काय जागं झालं होतं. पुढच्या काही दिवसात कमी पण झालं. मोदक, प्रशांत, शैलेंद्र यांनी चुचकारून, ओंजारून ,अगदी सरकॅझम वापरून सायकलींग + ट्रेनिंग चालू ठेवायला मदत केली. मामा आणि सागर पुण्यातून तर डॉक, सुमीत औरंगाबादेतून अशी (कदाचीत DC मधली दोन शहरातील मिळून तयार झालेली एकमेव) टीम सज्ज झालेली होती. *****सागर पाध्ये
दिवाळी नुकतीच संपलेली. DC च्या परीक्षेला जेमतेम 2 आठवडे राहिले. कृ अध्यक्ष मोदकाने रूट रेकी आणि कृ प्रॅक्टिस साठी जायचंच असा फतवा काढला. त्याप्रमाणे मामा आणि सागर गुमान तयार झाले. रेकीचा मुख्य उद्देश पसरणी आणि खंबाटकी हे दोन घाट चढायचा वेळ पाहणे आणि त्याप्रमाणे रायडर बदल लागेल का ते पाहणे होता. शिवाय प्रशांत मालक आणि मोदक याना सायकल स्टॅन्ड ला लावणे काढणे याची प्रॅक्टिस व्हावी हादेखील. आदल्या रात्री फोनाफोनी झाली, बेत नक्की झाला. रात्री १०:३० / ११:०० च्या सुमाराला मामांचा संदेश आला, सायकल बांधायला माझ्याकडे एकच वेलक्रो आहे, दुसऱ्या सायकल साठी कोणीतरी घेऊन या (स्टॅन्ड ला रबरी पट्ट्या असतात, पण त्या नेमक्या गहाळ झालेल्या). सागर संकटात, रात्री ही व्यवस्था करायची कुठून?? मोदक-प्रशांत म्हणाले, दोरी आणतो - पण तो प्रस्ताव साफ धुडकवला गेला. प्राणप्रिय फेल्ट सायकलला एक ओरखडा पण आलेला सागर ने खपवून घेतला नसता. मग फुकट गेलेल्या रबर ट्युब, नाड्या वगैरे उपाय समोर आले. अखेर शैलेंद्र ने सुचवलेला उपाय सागरला पटला. आणि सकाळी 6:30 ला सायकल आणि फाटक्या बनियान घेऊन सागर हजर झाला. सकाळी सकाळी मोकळ्या हायवेवर.. सागर.
.
सागर ६० च्या स्पीडने रोडी पळवत असताना प्रशांतने डॉकला दिलेली अधिक माहिती ;)
बाकीचे लोकं पण प्रॅक्टिस करत होते..
.
मामा खंबाटकी घाट चढताना..
.
खंबाटकी घाटातच.. गाडीचा स्पीडोमीटर बघा..!
चारचाकी गाडीसाठी दिलेली स्पीडलिमिट मामांना सायकल चालवताना अनेकदा कमी पडत होती. ;)
मामा.. खंबाटकी घाट उतरताना. (इथेही स्पीड बघा..!!)
..आणि हा व्हिडीओ.
.
सायकलने घाट चढणे हा सागरचा छंद. संधी मिळाली की सायकलने बोपदेव, खंबाटकी, सिंहगड चढायला तयार. त्यामुळे DC रूटची चर्चा पसरणीच्या 10-12 किमीच्या घाटावर आली की सागरचे नांव पुढे. मोदक आणि बाकी लोक म्हणत होते, वेगाने एवढं चढायला नाही जमत, मध्ये मध्ये रायडर बदलू, पण सागर ऐकायला तयार नाही. बदललेल्या रायडर चा वॉर्म-अप नसेल वगैरे थेर्या चिकटवून याने अख्खा घाट नावावर करून घ्यायचा याचा बेत केला होता. कृ अध्यक्ष मोदकराव मात्र अजून राजी झाले नव्हते. त्यांनी अट घातली होती.. एकदम सास-बहू सिरीयल स्टाईल "सागरला माझ्या मनाप्रमाणे पसरणी कापता आला नाही, तर रेस डे ला अर्ध्या घाटात मामांना उतरवणार" रेकी च्या दिवशी पण मामांना अर्ध्या घाटातून उतरवायची रंगीत तालीम ठरली होती.
रंगीत तालमीच्या दिवशी सुरूर गावाजवळ मामा गाडीत, सागर ने राईड सुरू केली. वाईपर्यंत हलक्या गिअर मध्ये स्पिनिंग करून पाय मोकळे करून घेतले आणि पसरणी आला. स्पिनिंग न सोडता तसाच चढायला सुरुवात केली. मोदक-प्रशांत यांना आधीच सूचना दिली होती, 'पाणी भरपूर लागतं - तयार ठेवा'. त्याप्रमाणे मोदक दर किलोमीटरला पाणी घेऊन उभा राहत होता आणि सागर 'एवढ्यात नकोय' सांगून त्याला निराश करत होता. अर्धा घाट संपला, मोदकाने मामांना उतरवलं. सागर मागोमाग होताच. ट्रॅफिक मुळे अधूनमधून थांबायची वेळ येत होती. नव्याने वापरायला सुरू केलेले क्लिट पॅडल सोडवायची मस्त प्रॅक्टिस. दत्त मंदिर मागे सोडलं, पाऊण तासात घाट संपला. अक्षरी पंचेचाळीस मिनीटात..!!!
मॅप्रो गार्डन मध्ये नाश्त्याचा फडशा पाडताना मोदक सागरला ते 3 जादुई शब्द बोलला - 'पसरणी घाट तुझा'
.
सागर.. पसरणी घाटाच्या सुरूवातीला.
.
पसरणी घाट संपला.. पाध्ये सायकलवर आणि प्रशांत फोनवर..
******
औरंगाबादकरांनीही प्रॅक्टिस पार पाडली.. त्याचे फार फोटो नाहीत मात्र हा एक धमाल व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये शेवटी तो माणूस सोटा घेऊन नक्की कुणाला टोले द्यायला उभा होता ते शेवटपर्यंत कळाले नाही. ;)
.
डॉ श्रीहास
२ नोव्हेंबर: प्रचंड ट्रॅफिकमधला नगर रोड. दोन रोडी सायकल लटकवलेली पोलो आणि आत डॉक व सुमीत हे सायकलवीर.. मागे स्टँडवर सायकली लागलेल्या गाडीत गाणी चालू होती आणि हे दोघंही बेसुर + भेसूर आवाजात गाणं म्हणत एन्जाॅय करत होते. पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये कावलेले आजूबाजूचे लोक विस्मयकारी चेहेऱ्यांनी बघत होते. सुमीत आणि डॉक पुण्यात शिरलेच चुकीच्या वेळेस. संध्याकाळचे ६:३० वाजलेले.. इनॉर्बिट माॅल येरवड्याचा रस्त्यावर मस्त ट्रॅफिक होतं. ३-४ किमी अंतर तब्बल ४५ मिनीटांनी पार पडलं. सुमीत म्हणाला की "बरं झालं पुणं सोडलं नाहीतर रोजच हे सगळं झेलावं लागलं असतं" डॉकच्या चेहेऱ्यावर हलकसं हसू आलं, त्याला घरातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडला की मोजून दिड मिनीटाच्या अंतरावर क्लिनीक आहे ना !! Deccan Cliffhanger पुणे गोवा ६४३ किमीची ultra cycling race होती ४ नोव्हेंबरला.. तोच डॉकचा वाढदिवस..!! काय तो योग जुळून आला होता वा..!! पुण्यात पोहोचलोच ८:३० ला , अगदी आरामात रमत गमत.... मोदक , आनंदराव आणि स्थितप्रज्ञ यांनी रेश्मा भुर्जी सेंटरवर स्वागत केलं (सुमीतची फर्माईश होती ) लाल रंगाची तेलकट भुर्जी पावासोबत पोटात ढकलली. मोदक पुढचा प्लॅन घेऊन तयारच होता, DC ची तयारी ह्या माणसाशिवाय होणं शक्यच नव्हतं __/\__ औरंगाबादहून खचाखच सामान भरून आलेली पोलो. (व त्यात मोदकाने भर टाकलेली चितळेंकडची खादाडीची खरेदी)
.
मोदकाने केलेली तयारी... रेस रूट, मॅन्युअल, टीम स्ट्रॅटेजी आणि गाड्यांच्या टेंपररी नंबरप्लेट.
.
टीम स्ट्रॅटेजी आणि कोण नक्की काय रोल पार पाडणार याची चर्चा..
(डावीकडून - आनंदराव, मोदक, स्थितप्रज्ञ आणि डॉ श्रीहास)
.
३ नोव्हेंबर:
DC च्या आदल्या दिवशी रेस ब्रिफींग साठी सगळेजण परांजपे स्किम भूगांव येथे जमले. तेथे गेल्यावर सायकलला चिकटवलेले रिफलेक्टर, पुढचा व मागचा लाईट, हेल्मेट, अंगावरचं रिफ्लेक्टीव्ह जॅकेट असं सगळं सगळं चेक करवून घेतलं. काय अफलातून सायकल्स होत्या तिथं.. व्वा..!! ५० हजारांपासून ते ८ लाखांच्या रेंजच्या सायकल्स..!! सुमीत आणि सागर दोघंही थोडेसे हिरमुसले होते कारण ह्या सायकल्सपुढे आपला काय निभाव लागणार असं त्यांचं म्हणणं होतं आणि एका दृष्टीनी बरोबर पण होतं. डाॅक आणि शैलेंद्र नी समजुत काढण्यासाठी म्हणून सांगितलं की "आपल्याकडच्या रस्त्यांवर ह्या महागड्या सायकली कामाच्या नाहीत" पण बराच वेळ ते दोघं डिप्रेस्ड होते...
आता सपोर्ट व्हेईकलच्या तपासणी साठी मोदक, शैलेंद्र आणि सुमीत बाहेर पार्कींग मध्ये गेलेले असतांना सागर, डाॅक आणि मामा गप्पा मारत होते. तेवढ्यात फुसऽऽऽऽऽऽ आवाज आला आणि सागरच्या सायकलचं मागचं चाक उभ्या उभ्या पंक्चर झालं होतं. नेमकं मामांच्या सायकलचं पण समोरचं चाक २० मिनीटांपुर्वीच हवा सोडून बसलेलं होतं !! सागर बिचारा केलिलवाणा चेहेरा करून बसला.
सपोर्ट व्हिईकल १ - फोर्ड एंडेव्हर
.
सपोर्ट व्हिईकल २ - पोलो.
.
ब्रिफिंग आणि रेस पूर्वीची तयारी.. या फोटोत डावीकडे निळ्या जर्सीमध्ये बसला आहे तो अमित समर्थ. भारताचा दुसरा सोलो रॅम फिनिशर.
.
मार्च इनसाईड.. रजिस्ट्रेशन काऊंटरजवळ.. मोदक, शैलेंद्र, सागर आणि डॉक
.
आयत्यावेळी सायकलला रिफ्लेक्टर चिकटवण्याची गडबड.. पाध्येंना प्राणप्रिय फेल्टला मॅचिंग रिफ्लेक्टर चिकटवताना खूप यातना झाल्या होत्या. ;)
...आणि मामा चक्क हेल्मेट विसरून आले होते. :D
.
बाकीचे स्पर्धकही तयार होत होते..
.
रेस जर्सी घालून टीम तयार झाली..!!!!
डावीकडून - सागर पाध्ये, डॉक, देशपांडे मामा आणि सुमीत
.
सायकलसह..!!
.
टारगेट.. द डेक्कन क्लिफहँगर..!!!!
(क्रमशः)
************
भाग २ - द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे..!!
************
वाचने
54850
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच....
ओ राजे... नक्की किती दात पडले
In reply to मस्तच.... by किल्लेदार
ओ राजे... नक्की किती दात पडले
In reply to ओ राजे... नक्की किती दात पडले by मोदक
हाहाहा... धन्यवाद
In reply to ओ राजे... नक्की किती दात पडले by गवि
चार ....
चार दात घशात गेलेत.
In reply to चार .... by किल्लेदार
धमाल!
भन्नाट
जोरदार, चला, रेस सुरू झाली
भन्नाट, अफाट वगैरे वगैरे...!
क ह र!
क्या बात है.. टीम एकदम
तुम्ही हा रिपीटीटिव्ह कंटाळा
In reply to क्या बात है.. टीम एकदम by गवि
पॅशनमुळे असेल किंवा आवडीमुळे
In reply to तुम्ही हा रिपीटीटिव्ह कंटाळा by गवि
अजिबात कंटाळा येत नाही!
In reply to तुम्ही हा रिपीटीटिव्ह कंटाळा by गवि
.........
In reply to क्या बात है.. टीम एकदम by गवि
.......
In reply to क्या बात है.. टीम एकदम by गवि
झक्कास...
भारी !!!
येस्सार..!! :)
In reply to भारी !!! by डॉ सुहास म्हात्रे
मस्त रे
भारी रे,
1 च नंबर
वाह
मंडळी.. एक मदत हवी आहे.
हेच
In reply to मंडळी.. एक मदत हवी आहे. by मोदक
काका आता बघा बरं.. आता
In reply to हेच by नाखु
ज ब र द स्त!!!!
आला रे आला!
डिस्क्लेमर टाकताय का?
In reply to आला रे आला! by देशपांडेमामा
म्हणून चक्क स्त्राबेरी
करवंदाच्या झाडावर उगवलेली
In reply to म्हणून चक्क स्त्राबेरी by शैलेन्द्र
हा हा !
In reply to करवंदाच्या झाडावर उगवलेली by मोदक
हे टीजर्स वाटतं :)
In reply to हा हा ! by देशपांडेमामा
अचाट शौक.....
हे कुठचे आहे ?
तो होय.. तो भाग जलोरी पास
In reply to हे कुठचे आहे ? by चौकटराजा
सर्व प्रतिसादकांचे आभार्स..
खूप दिवस झाले वाट पहात होतो
वा वा वा .....
वा वा. मस्तच...
हा मोदक ठार वेडा आहे....
ॲक्चुअली नऊ
In reply to हा मोदक ठार वेडा आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
या फोटोत डावीकडे निळ्या
मस्त रे...वाचतोय...
मस्त वर्णन ...
भन्नाट
जबरदस्त हो दादा
झकास
सायकल समूह -
__/\__
In reply to सायकल समूह - by निनाद
मस्तच .
श्रीहासडॉक, सागर, मामा आणि
वाह, अशा धाग्यांवर क्रमशः
जबरी राइड
जबरा...
भीषोण सुंदर दादा !
जबरी !!
रेस डे