नमस्कार मंडळी,
मी गुजरात निवडणुकांवर काढलेल्या धाग्यावर विनाकारण अन्य कुठल्या तरी धाग्यावरील गुजरात निवडणुकांशी काहीही संबंध नसलेले मुद्दे आणायचा प्रकार घडला हे सर्वांनी बघितलेच आहे. आणि जे काही मुद्दे मांडले होते त्याला मुद्दे न म्हणता एकमेकांची उणीदुणी काढणे हा प्रकार होता हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. गेल्या काही दिवसात हा प्रकार अनेकदा बघायला मिळालेला आहे.
मिपावर थोडीफार इतर मुद्द्यांवर चर्चा होतेच त्याला नक्कीच ना नाही. तेव्हा गुजरात निवडणुकांवरील धाग्यावर आताच्या निवडणुकांवर चर्चा न होता व्यापक राजकारणावर चर्चा झालेली समजू शकतो. पण जो काही प्रकार तिथे झाला तो तर नक्कीच खटकण्यासारखा होता. मी त्या गुजरात निवडणुकांवरच्या धाग्यावर तयारी करण्यात बर्यापैकी वेळ आणि श्रम खर्ची घातले होते. आणि शेवटी त्या धाग्याचा उपयोग एकमेकांची उणीदुणी काढायला झाला हे बघून खरोखर वाईट वाटले. असल्या फालतू प्रकारासाठी व्यासपीठ आपण आपला वेळ घालवून का उपलब्ध करून द्यावे हा प्रश्नही पडला. त्यातही ताज्या घडामोडींच्या धाग्यावर विषय ओपन एन्डेड असल्यामुळे बरेच अवांतर झाले तरी समजू शकतो पण गुजरात निवडणुकांसारख्या अत्यंत क्लोज्ड एन्डेड विषयावरील धाग्यात काहीही संबंध नसलेले मुद्दे का यावेत हे समजण्याच्या पलीकडचे आहे.
हा धागा काढायचा उद्देश हा की ज्यांना अन्य मिपाकरांनी कधीतरी कुठल्यातरी वेगळ्या धाग्यावर काहीतरी लिहिले आहे त्याची चर्चा करायची आहे, एकमेकांची उणीदुणी काढायची आहेत, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढायच्या आहेत त्याला व्यासपीठ देणे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांनी या धाग्यावर येऊन वाटेल तो धुमाकूळ घाला आणि ज्यांना ते वाचायची इच्छा असेल त्यांनी हा धागा जरूर वाचावा. पण इतर कोणीही लिहिलेल्या चांगली चर्चा अपेक्षित असलेल्या धाग्यावर जाऊन गोंधळ घालू नये ही विनंती.
तेव्हा होऊन जाऊ द्या धुळवड.
वाचने
8925
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_
मी त्या गुजरात
सॉरी रे ट्रुमना.. तुझ्या
आवडली कल्पना.
एक अनावश्यक सल्ला !
उम्मिद पे दुनिया कायम है...
In reply to एक अनावश्यक सल्ला ! by माम्लेदारचा पन्खा
धाग्याचा उपयोग ....!
In reply to एक अनावश्यक सल्ला ! by माम्लेदारचा पन्खा
प्रचेतस हा अगदीच होपलेस
असाच अजुन एक कधीच होप्स न
In reply to प्रचेतस हा अगदीच होपलेस by अभ्या..
हे मात्र अगदी खरं, अगदी
In reply to असाच अजुन एक कधीच होप्स न by अभ्या..
बेसिक मस्ती बे, दूसरे काही
In reply to हे मात्र अगदी खरं, अगदी by प्रचेतस
ब्वारं...!
In reply to बेसिक मस्ती बे, दूसरे काही by अभ्या..
संपादकांना विनंती
हा अन्याय आहे
In reply to संपादकांना विनंती by गॅरी ट्रुमन
अप्रकाशित नको
In reply to संपादकांना विनंती by गॅरी ट्रुमन
फेसबुकवर एखादा प्युअर जोक
In reply to अप्रकाशित नको by पैसा
हम्म..
काय राव मी लीष्ट काढुन आलेलो.
सूडने नक्कल काय केलीन आणि
सूड निरागस हो
In reply to सूडने नक्कल काय केलीन आणि by कंजूस
बघा ना राव. मी माझ्या
In reply to सूडने नक्कल काय केलीन आणि by कंजूस
माई का लाल म्हणजे माईंचा
In reply to बघा ना राव. मी माझ्या by आदूबाळ
ते समजण्यासाठी ग्रंथ विकत
In reply to माई का लाल म्हणजे माईंचा by टवाळ कार्टा
धाग्याचे प्रयोजन कळले नाही.
ईश्वर पिलियन रायडर यांस माझे
असे अजून ८-१० जण आहेत ज्यांनी
In reply to ईश्वर पिलियन रायडर यांस माझे by arunjoshi123
अरुणजोशी यांनी भरपूर विचार
नाव हिंदूहृयसम्राट बाळ ठाकरे
जैश-ए-मोहम्मद च्या टेररिस्टचे
In reply to नाव हिंदूहृयसम्राट बाळ ठाकरे by arunjoshi123