Skip to main content

शस्त्रास्त्रांचा बाजार

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 28/12/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
शस्त्रास्त्रांचा बाजार अनंतकृष्णन हा एक तमिळनाडू च्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील छोट्याशा गावात प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्माला आलेला हुशार तरुण. वडिलांच्या शाळेतच बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले आणि बारावीला उत्तम गुण मिळवल्यामुळे त्याला तिरुनेलवेलीच्या श्री तिरुवल्लुवर सरकारी अभियांत्रिकी विद्यालयात प्रवेश मिळाला. घराजवळच्या महाविद्यालयातूनच अभियंता बनलेल्या अनंताने GATE दिली आणि त्यात त्याचे गुण चांगले आले. या गुणांवर चांगल्या महाविद्यालयात एम टेक ला प्रवेश घ्यावा या विचारात असताना DRDO (संरक्षण संशीधन आणि विकास संघटन) येथील नोकरीची जाहिरात आली.

लावणी

लेखक वैभवदातार यांनी गुरुवार, 28/12/2017 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी पदर ढळला खांद्यावरुनी लाजेने झाले मी चूर नका रोखून पाहू मला धडधडे माझा ऊर ||१ || रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ || पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली सुगंधी गजरा शृंगार करुनि मी वाट पहाते रंगमहाली ||३ || स्पर्श होता तुमचा माझे अंगअंग शहारले श्वास होती एकरूप आपले दुसरे विश्व न उरले |||४ || सहवासामध्ये तुमच्या राया स्वत्व माझे हरवले शृंगारक्रीडा करता करता तन मन भान हरपले ||५ || वर्षू दे तुमची प्रीती मजवरी सचैल आज मी न्हाले रात्र सरली पहाट झाली आकंठ तृप्त मी झाले ||६ || --शब्दांकित (वैभव दातार)
काव्यरस

मराठी शुभेच्छापत्र स्पर्धा: रौप्यमहोत्सवी वर्ष

लेखक पारुबाई यांनी गुरुवार, 28/12/2017 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे. ‘ही दीपावली आपल्याला सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो’ मात्र त्या वेळेसही बाजारात इंग्रजी भाषेमध्ये बरीच वेगवेगळ्या प्रकारची ग्रीटींग्स उपलब्ध असायची.

'फेकू'किस्से

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 27/12/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांना थापा मारायची बालपणापासून सवयच असते. त्यातील काहींची मोठे झाल्यावर ही सवय मोडते तर काहीजण आयुष्यभर फेकुगीरी करत राहतात. समोरचा थापा मारतो हे आपल्याला कळत असतं, परंतू आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीचे वय, पद किंवा परिस्थीती बघून दुर्लक्ष करतो.अडाण्यापासून ते उच्च शिक्षितापर्यंत अशा थापा मारणारे सर्रास आढळतात. गंमत म्हणून मी प्रत्यक्ष ऐकलेले काही फेकू किस्से देतो. किस्सा: १ आमच्या घरी नवीन फ्रिज घेवून माणसं आली त्यांच्या मागे एक पिळदार शरीर असलेला तरुणही आला. तो नेमका बाबांच्या मित्राचा मुलगा होता. बाबांनी त्याला विचारले तू ह्यांच्याबरोबर कसा काय?

... एक क्षण भाळण्याचा.(४)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/12/2017 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : http://www.misalpav.com/node/41704 ती आत आहे. येईलच. सामोसे घेउया तोवर. आता आमच्या गप्पा चहाच्या टेबलवर सुरू झाल्या. अचानक खोलीच्या दारातून एक साधारणतः पन्नाशी पलीकडच्या एक बाई आल्या. बाइंच्या चेहेर्‍यावर काहीसे हरवल्यासारखे भाव. किंवा कोणतेच भाव नाहीत असे म्हणाना. बाईनी आमच्या कडे पाहिले आम्ही नमस्कार केला. त्यानी उलट नमस्कार केला नाही. ही माझी पत्नी सौंदर्या. नाथ साहेबानी ओळख करुन दिली. चला . बसायचंय इथे. का आत जायचंय परत. बाईंच्या चेहेर्‍यावर काहीच प्रतिक्रीया नाही.

गूढ अंधारातील जग -५

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 27/12/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -५ पाणबुडीतील शस्त्रास्त्रे- पाणबुडी बद्दल एवढे गूढ आणि भीतीदायक काय आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणबुडी आपल्या अगदी जवळ येईपर्यंत ती आपल्याला सापडतच नाही. आणि एकदा परत बुडी मारली कि एवढ्या प्रचंड महासागरात तिला सर्वशक्तीनिशी शोधणे हे जवळजवळ अशक्यच आहे. जेवढे आपण हत्तीला घाबरत नाही तेवढे बिबळ्याला घाबरतो. कारण बिबळ्याचे वजन ४० किलो असले तरी तो एवढासा लहान ( २-३ टन वजनाच्या हत्तीच्या तुलनेत ) पण अत्यंत चपळ आणि सहज दिसून येत नाही आणि केंव्हा हल्ला करेल हे हि समजणार नाही.

.. एक क्षण भाळण्याचा(३).....

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 26/12/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://www.misalpav.com/node/41677 चला तुमचं चहा पाण्याचं बघु या. आलेल्या पाहुण्याला नुसत्या गाण्यागीण्यावर पाठवलं तर त्या रागावतील. तुमच्या वहिनी हो. बसा हं आलोच मी . आम्ही कशाला कशाला म्हणायच्या आतच ते आलोच असे म्हणत आत गेले. सुमीत माझ्या कडेच पहात होता. त्याला बहुतेक हे नवीनच होते. नाथ साहेब हे सुमीतला अगदी सुरवातीला कोणत्यातरी कंपनीत मॅनेजर म्हणून होते. त्यावेळेस सुमीतची त्यांची भेट झाली होती. वाचन ही त्यांची कॉमन आवड. त्यातून ओळख वाढत गेली. चित्रपटाची आवड हेही आणखी एक कारण.

निर्दोष घोटाळा !

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 25/12/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
निर्दोष घोटाळा ! देशाच्या अर्थकारणालाच नाही तर राजकारणालाही कलाटणी देण्यास कारणीभूत ठरलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री ए. राजा यांच्यासह सर्व १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. देशात घडलेल्या एकंदर गैरव्यव्हारापैकी 2 जी स्पेक्ट्रम चा गैरव्यवहार सर्वात मोठा समजला जात होता. ‘कॅग’सारख्या संस्थांनी तर यात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याचे अहवाल दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सीबीआय ला दिला.

अन्नदाता सुखी भव (क्रमशः)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 24/12/2017 02:19 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज