काकतियांचे वरंगळ
*** *** *** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
काकतियांचे वरंगळ बाराव्या ते चौदाव्या शतकात एक राजघराणे गोदावरी आणि कृष्णा नदी पूर्व समुद्रास मिळते त्यामधल्या भागात राज्य करत होते. चालुक्यांचे(पश्चिमी) प्रतिनिधित्व करत नंतर स्वतंत्र झाले. तेराव्या शतकात अल्लादिन खिलजिच्या सैन्याकडून पराभव झाल्यावर मांडलिक झाले होते. काही राजांनी मात्र चांगलाच अमल ठेवला होता ते हे एकशिलानगर/ओरुगलु अथवा आताचे वरंगळ/ वारंगळ तेलंगणा राज्यात आहे. दोन अडिचशे वर्षांत काही देवळे,किल्ले,मंदिरं बांधली गेली ती पाहण्याचा योग डिसेंबरच्या दुसय्रा आठवड्यात पुरी-भुबनेश्वर जाताना वाटेत थांबून घेतला त्यातले काही फोटो देत आहे. कुठे आहे, जावे कसे हैदराबाद शहरापासून १४० किमिवर गुंटूर रोडवर /रेल्वेमार्गावर वरंगळ स्टेशनही आहे. इथून १० किमिवरचे अगोदरचे काजिपेट जंक्शन आणि हे वरंगळ या दोन्हीठिकाणी सर्व एक्सप्रेस गाड्या थांबतात. रेल्वेमार्ग पश्चिम-पूर्व आहे. स्टेशनच्या उत्तरेस वरंगळ - काजिपेट रोड आहे त्या रोडवरच सात किमिवर हनमकोंडा चाररस्ता स्टॅापजवळ थाउंजड पिलर टेंपल आहे, अगोदर पाच किमिवर भद्रकाली मंदिर आणि तलाव आहे. बसेस भरपूर आहेत आणि त्या स्टेशनसमोरच्याच स्टँडवरून सुटतात. ऑटोही भरपूर आहेत परंतू दीडशे दोनशे रुपये वनवे असाच दर सांगतात. दोन्हीमिळून लागणारा अपेक्षित वेळ दीड तास. स्टेशनच्या दक्षिणेला दोन किमिवर वरंगळ फोर्ट आहे. इकडे बस जात नाहीत. ऑटो वनवे दीडशे रु सांगतात,सत्तरला तयार होतात. वरंगळमधली हीच मुख्य जागा. मोठ्या आवारात किल्ल्याचे अवशेष मांडून ठेवले आहेत. चार दिशांची चार उंच दगडी प्रवेशद्वारे आहेत त्या अखंड स्थितीत जागेवरच आहेत. तेच आता तेलंगणा राज्याचे सांस्कृतिकचिन्ह झाले आहे. आतमध्ये वाडा आणि चार देवळे होती त्यांपैकी एक सुस्थितीत असले तरी ते त्या काळातले वाटत नाही. एक शिलालेख फरशीवर आहे. किल्ला तेव्हा फारच सुंदर असणार हे अवशेषांवरून दिसते. जावे कसे हैदराबादमध्ये राहात असाल तर सकाळी ७:१० ला सिकंद्राबादहून सुटणारी गुंटूर इंटरसिटी एक्सप्रेसने ( 12706 ) वरंगळला दहा वाजता येता येईल वरील तीन ठिकाणे पाहून परत १८:४५ ची हीच गाडी (12705)वरंगळला मिळेल. ती सिकंद्राबादला दहाला पोहोचते. रोड ट्रिप १४०+१४० किमि होईल. परंतू नवीन शहरांतील वाहतुकीचा अंदाज नसल्याने रेल्वेच बरी. इतर पर्याय: मुंबईहून कोणार्क एक्सप्रेस (11019)ने थेट इथे १०:३०ला येऊन मुक्काम करून दुसरे दिवशी १२:५०च्या ईस्ट कोस्ट एक्सप्रेसने (18646)/ भुबनेश्वर गाठता येईल खाणे,राहाणे सर्व हॅाटेलस वरंगळ - काजिपेट रस्ता, स्टेशनजवळचा पोस्ट ओफिस रोड (पाच मिनिटांवर) येथे आहेत. बाजार, याच रस्त्यावर आहेत. विशेष पर्यटक केंद्र नसल्याने हॅाटेलस/रेस्टारंटसकडून फार अपेक्षा धरू नये. एकदोन थ्री स्टार्सही जवळच आहेत. स्टेशनच्या दक्षिण /किल्ला भागात काही नाही. वरंगळ शहर उत्तर भागातच आहे. विकिलेख :- काकतीय Kakatiya लिंक:https://en.wikipedia.org/wiki/Kakatiya_dynasty २) विकिलेख :- वरंगळ किल्ला Warangal fort लिंक:https://en.wikipedia.org/wiki/Warangal_Fort फोटो १ ) वारंगळ स्टेशन प्रवेशद्वार

_______________________
शहरातील इतर ठिकाणे.
फोटो २) हजार खांबी मंदिर आता मोडकळीस आलेले.

फोटो ३)पाटी

फोटो ४)आवारातले दुसरे मंदिर

फोटो ५) नंदी

_________________________
वारंगळ किल्ला परिसर
फोटो ६)पाटी वारंगळ किल्ला

फोटो ७)किल्ला नकाशा

फोटो ८)काकतीय राजा आणि सिंह

फोटो ९)वारंगळ अवशेष

फोटो १०) मारुती.

फोटो ११)सिंह आणि तोरण

फोटो १२)वारंगळ किल्ला शिल्प

फोटो १३) भैरव

फोटो १४)एक शिल्प

फोटो १५)वारंगळ किल्ला आवाराबाहेरचा शिताबखान महाल. ( हे खरेतर थडगे असावे.)

फोटो १६)पाटी शिताबखान महाल.

फोटो १७)दोन शिलालेख कोपय्रात टाकले आहेत.

फोटो १८)शिलालेख

____________________ आपणास काही माहिती असेल तर अवश्य लिहा.

मिपा गदारोळात कंजूसजींचा हा
In reply to मिपा गदारोळात कंजूसजींचा हा by पगला गजोधर
हा भाग नक्षलप्रभावित नाही.
फोटो दिसत नाहीयेत, घरुन
In reply to फोटो दिसत नाहीयेत, घरुन by यशोधरा
फेसबुकच्या लिंक्स आहेत. बॅन
सुंदर फोटो ! कलाकुसर खरेच
In reply to सुंदर फोटो ! कलाकुसर खरेच by डॉ सुहास म्हात्रे
भव्य आणि कोरीव प्रवेशद्वार
किल्ल्यातील अवशेष निदान
कच्चा नकाशा स्क्रीनशॅाट
लेख
In reply to लेख by मनिमौ
>>त्रोटक वाटतोय>>
जबरदस्त शिल्पकला आहे.
काकतीय-यादव संबंध
In reply to काकतीय-यादव संबंध by सुनील
चालुक्य राजवट कमजोर होत
हो, काकतीय आणि देवगिरीचे यादव
वरंगळ मधील एका प्रसिद्ध प्राचीन
हे झाले थोडे विषयांतर . पण लेख छान आहे . फोटो दिसत नाहीत .
In reply to हे झाले थोडे विषयांतर . पण लेख छान आहे . फोटो दिसत नाहीत . by सिरुसेरि
फोटो घरच्या संगणक अथवा
खुपच अप्रतिम धागा.
थोडक्यात पण उत्तम ओळख
In reply to थोडक्यात पण उत्तम ओळख by समर्पक
मनापासून धन्यवाद समर्पकजी
रामप्पा मंदिर थोडे पुढे
फोटो आणि माहिती आवडली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video