अनवट किल्ले २८: अंमळनेर, बहादुरपुर ( Amalner, Bahadurpur )
लक्ष्मीबाईच्या माहेरचा वारसा सांगणारा पारोळ्याचा अनोखा भुईकोट पाहून आम्हाला जायचे होते, ते बहादुरपुर आणि अमळनेरचे केवळ अवशेष रुपात राहिलेले भुईकोट बघायला. लगेच बस नव्ह्ती, सहाजिकच खाजगी जीपकडे मोर्चा वळवला आणि पुढच्या सिटवर स्वतःला कसेबसे कोंबून घेत जीप केव्हा सुटते याची वाट पाहु लागलो. पण जीपवाल्याला जीपमधे जास्तीतजास्त कितीजण बसु शकतात याचे गिनेस रेकॉर्ड तोडायचे असावे. बहुतेक बस भरू शकेल ईतके लोक ठोकून जीपमधे बसवल्यानंतर समाधान झाले असावे आणि जीप बोरी नदीच्या काठाने बहादुरपुरकडे निघालो. पारोळ्यापासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे.
मिसळपाव
सांज कोवळी येते का
गंध अाठवांचा घेऊन
उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून
पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा
ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा
झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली
विरून क्षितिजाच्या रेषा
आभाळ चुंबते धरा गाली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
prshuramsondge.blogsopt.com