Skip to main content

वादळ

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 02/04/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ उरी फुटते रात्र उठे अंधारी प्राणात पेटे वादळ क्षितीजाचे रंग असुरी शुभ्र चांदण्या जाळून काळोख पसरे चहुकडे प्रकाशाच्या तुकड्यासाठी एक छाया तडफडे पानांच्या हिरव्या देहातून हुंकारते वाऱ्याचे काळीज घायाळ त्या सुरांभोवती श्वासांचा हलतो आवाज मंद शुक्राचा भास भुलते चंद्राची वाट निद्रेत आज फुलांच्या उसळते दु:खाची लाट
काव्यरस

Dead Man's Hand - 2

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 02/04/2018 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
"मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..." "साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!" महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता. "च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..." सुमारे वीस मिनीटांत इन्स्पेक्टर घाटे, सब् इन्स्पेक्टर महाडीक, हेड कॉन्स्टेबल राणे आणि इतर चार शिपाई यांच्यासह सायरनचा आवाज करत पोलिस जीप मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या टोकाला येऊन थांबली.

Dead Man's Hand - 1

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 02/04/2018 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे दोनचा सुमार .... पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र .... भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे .... किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता .... अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार .... रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार .... "एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..." कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेला माणूस म्हणाला. तो बहुतेक सर्वांचा प्रमुख असावा.

गणपत वाणी, सतत मागणी

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 02/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

ग्रामीण पेहराव

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 02/04/2018 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण वासियांचा पेहराव इकडे सर्वत्र एकसारखा दिसत असे. उत्तर महाराष्ट्र पट्ट्यात पांढरा रंगाचा सदरा, पांढरे धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पुरूषांचा पेहराव दिसायचा. वयाने तरूण आणि शाळा- महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांत पांढर्‍या सदर्‍यासोबत पांढरा पायजमा असायचा आणि अशाच पेहरावात सर्रासपणे तरूण मुले कॉलेजलाही जात असत. महाविद्यालयात सुध्दा ड्रेसकोड नावाची भानगड त्यावेळी नव्हती. आम्ही माध्यमिक शाळेत जायचो तेव्हा आमच्या गावच्या माध्यमिक शाळेचा गणवेश पांढरा सदरा आणि खाकी आखूड चड्डी असा होता.

समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती

लेखक दुर्गविहारी यांनी सोमवार, 02/04/2018 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
‘शुभमंगल सावधान’ हे शब्द कानावर पडताच राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला, आणि त्याच्या पायाला जी भिंगरी लागली ती आयुष्यभर! एकाच ठिकाणी कायमची वस्ती करायची नाही, फिरत राहायचे, अख्खा देश पालथा घालायचा या एकाच ध्येयाने तो अक्षरश: भारतभर हिंडला. कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले, तरीसुद्धा भ्रमंती, देशाटन चालूच होते. विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते. समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली.

स्टिकीन

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 02/04/2018 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire स्टिकीन १८८०च्या उन्हाळ्यात मी एका निमुळत्या कनूमधून फोर्ट रँगेलहून निघालो. मला वायव्य अलास्काच्या बर्फाळ प्रदेशाची पाहणी पूर्ण करायची होती. १८७९च्या हिवाळ्यात मला ही भटकंती अर्धवट सोडावी लागली होती. सगळे सामान, म्हणजे फार काही नाही, ब्लँकेट इ.इ. बोटीत चढल्यावर माझ्या इंडियन सोबत्यांचा निरोप समारंभ सुरु झाला.

घरी जायच्य...एक रूपक

लेखक शरद यांनी सोमवार, 02/04/2018 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
घरी कधी जायच्य ? (श्री.संदीप चांदणे यांची कविता )tp://www.misalpav.com/node/42187 सकाळचे सहा वाजावयाचे आहेत. आम्ही दोघे निरव शांततेत, शांतपणे कॉफीचे घुटके घेत आहोत. मी विचारले " एक छान कविता बघायची आहे ? " ती प्रश्नार्थक नजरेने बघते. मी तिला संदीप चांदणेंची."घरी कधी जायच्य ? काढून देतो. ती वाचते. दोघेही गप्प. थोड्या वेळाने मी विचारतो " काय वाटले ? " कॉंप्युटरकडे बघतच ती म्हणते "रूपक कथा..आहे. " रूपक कथा..... मग बच्चीला "घरी जायच्य " म्हणजे काय ? आता बाबाला जावयास घरच नसेल तर तो भटकत बसणार हे खरेच.

घुंगरू

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 02/04/2018 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
पायातल्या घुंगरानी मला विचारले …. “खरे खरे सांगशील? ...तू नाचतेस की मी नाचतो ? तूच नाचतेस तर माझी जरुरी काय ? जर मीच नाचतो तर तुझा उपयोग काय ? केव्हा केव्हा अशीच श्रांत उगाचच बसलेली असतेस … माझ्याकडे नजर जाताच … सारी सारी फुलून येतेस ! माझ्यासवे तू आणि तुझ्यासवे मी .. मग नाचच नाच होतो … तू तू नसतेस ..मी मी नसतो …..” प्रश्न माझेच घुंगरानी विचारलेले …. नाच होतो तेव्हा नेमके काय होते ?

ज्या (sine - sin) आणि कोज्या (cosine - cos)

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 28/03/2018 03:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बहुतेकांना त्रिकोणमितीमधील - Trigonometry - ज्या (sine - sin) आणि कोज्या (cosine - cos) ह्या दोन मूलभूत गुणोत्तरांची तोंडओळख तरी असतेच. ह्या गुणोत्तरांचा जगातील पहिलावहिला अभ्यास भारतीय गणिती आर्यभट (जन्म इ.स. ४७६) केला होता अणि इतकेच नाही तर त्यांसाठी त्याने योजिलेल्या ’ज्या’ आणि ’कोटिज्या’ ह्या संज्ञाहि sin आणि cos ह्या रूपाने जागतिक गणितशास्त्रामध्ये चिरस्थायी झाल्या आहेत.