Skip to main content

वास बापूंचा

लेखक रानरेडा यांनी रविवार, 08/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही ....

थायलंड - ८ दिवस ट्रिप प्लान (स्वतःच्या फॅमिलीबरोबर जाणार्यांसाठी)

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 08/04/2018 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
उपयुक्त साईट्स विमान बुकिंगसाठी - www.skyscanner.com हॉटेल बुकिंगसाठी - www.agoda.com हॉटेल रिव्ह्यूसाठी - www.tripadvisor.com या सग्ळ्या मी स्वतः वापरलेल्या आहेत :) रहाण्यासाठी जागा बँकॉक - खाओसान रोड फुकेत - बांग्ला रोडच्या जवळ (पण बांग्ला रोडवर नाही :D) क्राबी - मार्केटच्या जवळ ------------------------------------------------------------------------------------------------------------- पोहोचण्याचा दिवस (T day) बँकॉक ------------------------------

दंतकथा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 07/04/2018 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
गचपानात दडलेल्या फुटक्या बुरुजाखाली पोटार्थी गाईड सांगतोय : ही तेजतर्रार नावाची तोफ वापरून अमुक सैन्याने तमुक सैन्याच्या अमुक इतक्या सैनिकांना एका क्षणात घातले कंठस्नान वर्तमानाच्या विवंचना विसरून डोळे विस्फारलेल्या गर्दीला दिसू लागतंय गाईडने न गायलेल्या पवाड्यातल्या दंतकथेचं सोनेरी पान : (रण स्थंडिल हे धगधगते रणचंडी तांडव करिते उकळते रक्त जणू लाव्हा कळिकाळा घाम फुटावा टापांची उडते धूळ रणभेरी करी कल्लोळ तळपती वीज - समशेर गनिमाची नाही खैर विजयाचा अविरत डंका कानावर येतो, ऐका मृत्यूही थिजूनी जावा वीरांनो मुजरा घ्यावा धड धडाड गर्जे तोफ युद्धाचा चढता कैफ धड
काव्यरस

होत अस कधी कधी

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 07/04/2018 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
होत अस कधीतरी कधीतरी काहीतरी राहून जात. निवांत वेळी अचानक आठवत रहात. ऑफीस मध्ये कुठल्यातरी विषयावर प्रेझेंटेशन चालू आसत.तुम्ही त्यात असता आणि नसताही. कधी तरी अस होतेही किंवा होतही नाही. समोरच्या सफेद पडद्या वर अचानक तुमच्या आयुष्यातील क्षण चित्रे नव्हे स्थिर चित्रे दिसायला लागतात. तुम्ही दचकता इतराना तुमच्या मनातले पडद्यावर दिसतेय म्हणोन.

नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/04/2018 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ सुमारे ३० वर्षे आधी नाशिक (गांधीनगर) येथून विमानांचे घरगुती (डोमेस्टीक) उड्डाणे होत होती. मी लहान असतांना एनडीसीसी बँकेच्या जुन्या इमारतीत (सीबीएस जवळील) इंडीअन एअरलाईन्स चे बुकींग काउंटर बघीतले होते. गांधीनगर धावपट्टी ही इंडीयन आर्मीच्या ताब्यात होती आणि अजूनही (२०१८) वापरात आहे. मी स्वतः कंपनीच्या कामानिमीत्त तेथे भेटी दिलेल्या आहेत. ही धावपट्टी कमी आसनी विमान उतरण्यायोग्य आहे. गांधीनगर विमानतळ हा नाशिक शहरातच आहे. त्यासाठी फार लांब जावे लागत नाही. अगदी शेअर रिक्षानेदेखील जाता येथे. गांधीनगर हे नाशिक पुणे रस्त्यालगतच आहे.

दोसतार - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 07/04/2018 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42343 हा मोका साधून म्हादू शिपायाने एकदम बोलो भारत माता की ...असे म्हंंटले. त्यावर पोरानी ही हात उंचावून जोरात जय म्हंटले आणि आमचे समूहगीत संपवले. मटंगे बाईनी आम्हाला गायन वर्गात चला अशी खूण केली. पण त्याकडे लक्ष्य न देता काय व्हायचं ते होऊ दे म्हणत आम्ही मुलांमधे जाऊन बसलो. त्या दिवशी कार्यक्रम संपला तसे आम्ही तेथूनच पसार झालो.

विकीपेडिया वरील माहितीचे संकलन...

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 07/04/2018 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
विकीपेडिया हा वाचकांच्या सहकार्याने माहिती पुरवणारा संदर्भ कोश आहे असे मानले जाते... विकीपेडियात खालील माहिती वाचनात आली ती बरोबर आहे असे मानावे काय? जर संदर्भ न देता माहिती भरली गेली असेल ती चुकीची किंवा अपुरी असेल तर तिला दुरुस्त करायची काय सोय आहे? ... येथील तज्ज्ञ सदस्यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे... https://mr.m.wikipedia.org/wiki/ पावनखिंडीतील_लढाई १) ... सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले; जवळपास १४००० सैनिक मारले गेले. प्रत्येक मावळ्या ने ५५-६० मुगल कापून काढले, इतके शुर मावळे, इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात.... २) ...

म्हतारीचं काॅन्फीडन्सं

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 06/04/2018 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा म्हतारीचं कॉन्फीडन्स दुपारची वेळ होती. मुलांची मधली सुट्रटी ची वेळ झाली होती. खिचडी तयार झाली होती.घंटी वाजली.तसा मुलांचा लोंढा बाहेर पडला.सारी किलबील सुरू झाली.भातावाली बाई तयार झाल्या होत्या. मुलांची रांग केली. त्यांना काही सूचाना केल्या आणि तिच भींतीला टेकलो.मुलं येत होती .जात होती. तेवढयात एक आजीबाई आल्या.हातात एक डबा होता.त्या काठी टेकून तिथचं शांत बसल्या.त्या खाली जमीनीकडं बघत होत्या.त्यांच लक्ष तिथं नव्हतं.त्यांच्या हातातला डबा पण त्यांनी लपवला होता.बहुतेक मी तो पाहू नये म्हणून त्यांनी तसं केल असावं.

ती जशी जशी जुनी होत गेली

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 06/04/2018 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
ती जशी जशी जुनी होत गेली हळूहळू माझी सोनी बनत गेली वाईनवानी कडुशार होती नंतर मधाचे पाणी बनत गेली रंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो खटके उडायचे अधूनमधून पुढे नवीन कहाणी घडत गेली या एकल्या जीवाची ती राणी बनत गेली आधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो मग हवी होती कशाला बायको ? डोळे सताड उघडे असायचे, राव या डोळ्यांचीच जणू पापणी बनत गेली कधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही आत सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली बायको आधी नकोशी वाटत होती यार आता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी बनत गेलीय ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस

हे ही खरंय !

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 06/04/2018 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
हे ही खरंय ! मनात नेहमी तीच हुरहूर काहूर करून टाकणारी ! तीच आठवण मन व्यापून टाकणारी , रोज आठवण काढायलाच हवी ....... असं नाहीये खरं तर पण रोज आठवण येते ..... हे ही खरंय ! पाण्याने वाहतं असलं पाहिजे त्याने सगळं पुसलं गेलं पाहिजे डोळे, मन, अंगण, आभाळ ते नेहमी भरून वाहीलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर पण रोज आसवे भिजवून जातात ..... हे ही खरंय ! विरह विसरता आला पाहिजे, नवा डाव मांडता आला पाहिजे, आचारात, विचारात, वागण्यात, जगण्यात, नेहमी हसणं जमलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर पण रोज हसून फक्त क्षण साधायचे ......