पुणे ते लेह (भाग १२ लेह - पॅंगॉन्ग)
रात्री हुंडर वरून परत आल्यावर होमस्टे मध्ये मुक्कामास असलेला एक कॉलेजवयीन मुलगा माझ्याकडे आला. त्याच्याच शब्दात सांगायचे तर ठाण्यात राहणारा बॉम्बेकर होता तो.
मुंबई ते दिल्ली विमानाने, तिथून लगेच बस ने मनाली आणि तिथून खाजगी गाडीने विना मुक्काम लेह गाठले होते त्याने. जी लोक विमानाने लेहला येतात किंवा मनाली लेह एका दिवसात प्रवास करून लेह ला पोचतात त्यांनी लेह मध्ये पोचल्यावर २-३ दिवस आराम करून मग ऊंचावरचे प्रवास करणे अपेक्षित असते. ह्यामुळे आपले शरीर उंचीवरच्या विरळ हवेला सरावते. इकडे पोस्टिंगवर येणारे सैनिक ज्यांची शारीरिक क्षमता आपल्यापेक्षा चांगलीच असते त्यांना देखील हा नियम पाळावा लागतो.
मिसळपाव