अनवट किल्ले ३१: एश्वर्यसंपन्न गाळणा ( Galana )
बहुतेकदा महाराष्ट्रातील किल्ले म्हणले कि पर्यटकांचा नाराजीचा सुर असतो, कि खुप पडझड झाली आहे, बघण्यासारखे काही शिल्लक नाही. वास्तविक या गडकोटांनी अखेरच्या सैनिकापर्यंत दिलेली झुंज हिच यांच्या लढाउपणाची पावती. पण तरीही एखादा सुस्थितीतील तटबंदी असणारा, बुलंद, भक्कम बुरुजांचे कवच बाळगणारा, फारसी, देवनागरी आणि चक्क ईंग्लिश शिलालेख असणारा, तुलनेने चढायला सोपा असणारा असा गड पहायचा असेल तर नाशिक जिल्ह्यातील गाळणा हा किल्ला तुम्हाला पाहिलाच पाहिजे.
मिसळपाव