Skip to main content

तृषा

लेखक Bhakti
गुरुवार, 03/10/2024 या दिवशी प्रकाशित केले.
चमचमणारी चांदणी मला व्हायचीच नाही, काळ्याकुट्ट रात्री ती चंद्राशिवाय एकटीच झुरत राहते... पहाटेची उषा मला व्हायचीच नाही विखुरलेल्या किरणांनी सूर्य हट्टाने तिला होरपळतो... रंगीत फुलपाखरू मला व्हायचेच नाही कोमल फुलाला नकळतही टोचून बढेजाव मिरवायचा नाही... मला व्हायचंय नदी...सरिता... खळखळ मधूर नादात अस्तित्व माझं जपतं तुझ्या कुशीत शिरणार आहे नदी-समुद्राच्या मिलनात तू माझा समुद्र होशील ना.. तिथे तृषा विरेल बहरेल अंतरंग गहिरे -भक्ती

परतीचा पाऊस...

गुरुवार, 03/10/2024 या दिवशी प्रकाशित केले.
थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला.. परतीचा पाऊस... विजांच्या मागून जोरदार गरजला बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला मग जाताना कानात पुटपुटला... कागदाच्या होड्या सोडताना आताशा भेटत नाहीस ? पन्हाळीखाली चिंब भिजताना मुळी दिसतचं नाहीस ? अनवाणी पायांनी वाहत्या पागोळ्यांमागे धावत ही नाहीस की ओंजळीत विरघळणाऱ्या बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस इतका मोठा झालास की पावलांना गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस इतका थोर झालास की कपड्यांवर थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस.. गड्या !!
काव्यरस

रानफुले

गुरुवार, 03/10/2024 या दिवशी प्रकाशित केले.
असाच भटकत रानात असता रानफुले समोर येती नव्हता कसला गंध तयांना रंगही नव्हते भरजरी विविध परी तयांत होती नक्षी बारीक नाजूक सुंदर कोमल पिवळे गेंद उन्हात चमके वार्यावरती डौलाने डुलके वेड लागले मलाच तेथे दृष्य मनोरम खरोखर ते डोंगर उतार पठारावरती फुले पाहता लागली समाधी घोस तयांचे लेऊन घ्यावे वाटले तक्षणी अंगावरती एकरूप व्हावे, तेथेच रमावे परत न फिरावे घराप्रती बघतो जेव्हा अचानक रानफुले समोरी येती - पाभे (03/10/24) (काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)
काव्यरस

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

लेखक स्वधर्म
सोमवार, 30/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय.

सूर्य पाहिलेला माणूस

सोमवार, 30/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता.

स्मशान

रविवार, 29/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
शमशान . . . मुझे खुद में दिखाई दिए वो, जिन्हें मैं पागल समझता था ! एक दिन पता चला , वह साले बड़े सयाने थे ! धरम की अंधेरी खाइयों मे सेवादार बनके जीता हू । लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है उन्हे शराब बनाकर पीता हूँ आप हसोगे मुझे , कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! " मै कभी आपको समझा नही सकूंगा , की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !? जिंदगी जीने के इस झमेले मे अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा जन्मा था इन्सान बन के फिर इन्सान होकर ही मरूंगा । ------------ अतृप्त . . .
काव्यरस

पिनाडी पिनाडी पिनाडी………

शनिवार, 28/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं. हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू.

African Love Bird

गुरुवार, 26/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.