Skip to main content

नेदरलँड्सची सफर भाग -३

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 06/06/2018 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
नेदरलँड्सची सफर भाग -३ मेहुण्याच्या (अक्षय) घरी वास्तव्य असल्याने बऱ्याच गोष्टी फार सुलभ झाल्या हि एक वस्तुस्थिती होती. त्याने आम्ही येणार म्हणून तेथे वापरायची दोन ovi chipkaart नावाची प्रीपेड कार्डे घेऊन ठेवली होती. यात जालावरून पैसे भरायचे आणि बस, ट्राम, मेट्रोमध्ये चढल्यावर आणि उतरताना तेथल्या यंत्रावर टेकवायचा कि आपोआप त्यातून पैसे वळते होतात. एकंदर युरोपातील हवामान बेभरंवशी असते हे ऐकून माहित होते. त्यामुळे तेथे हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडत होतो.

संगीत एकच प्याला

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 06/06/2018 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
हे वर्ष राम गणेश गडकर्‌याच्या संगीत एकच प्यालाच्या शताब्दीचे असून महाराष्ट्र शासन आणि जनता हे महान नाटक पूर्ण पणे विसरून गेली आहे. मिसळपाव वर वावर असलेल्या पत्रकारांना विनंती अशी की त्यांनी यात लक्ष घालून शासनाला याबाबत जागे करावे.

राजयोग - १०

लेखक रातराणी यांनी बुधवार, 06/06/2018 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
कालीमातेच्या मूर्तीसमोर उभा राहून जयसिंह म्हणाला, "तुला खरंच आपल्याच मुलांचं रक्त हवंय, आई? राजवंशातलं रक्त मिळाल्याशिवाय तुझी तहान भागणार नाही? लहानपणापासून मी तुला आई म्हणत आलो, तुझी सेवा केली. इतर कुणाकडे पाहावं सुद्धा वाटलं नाही. तुझी सेवा हेच माझ्या जीवनाचं उद्देश्य आहे असं समजत आलो. मी एक राजपूत आहे, या धमन्यांमध्ये क्षत्रिय कुळाचं रक्त वाहतंय. माझे आजोबा राजा होते, माझ्या मामांचा वंश अजूनही राज्य करतोय.. राजरक्त हवंय ना तुला, मग घे हे.." जयसिंहने अंगावरची चादर काढून फेकली. कमरेला बांधलेल्या म्यानातून चाकू काढला. वीज चमकावी तसं क्षणार्धात त्यानं चाकू आपल्या हृदयाच्या आरपार नेला. मृत्यूची धारदार जीभ त्याच्या छातीला छिद्र पाडत गेली. जयसिंह मूर्तीसमोर कोसळला. पाषाणाची मूर्ती तसूभरही हलली नाही.

दत्तोबा

लेखक शाली यांनी बुधवार, 06/06/2018 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची सकाळ. छान मुड लागला होता. बरेच दिवस पडून असलेला लेख आज पुर्ण करायला घेतला होता. इतक्यात सौभाग्यवतींने बटर लावलेली थालिपीठाची डिश समोर आणून ठेवली. थालिपीठ म्हणजे शिळ्या भाकरीचे थालिपीठ. (कधी तरी सविस्तर पाककृती सांगेन याची.) मन कसं प्रसन्न झालं. कारण एकतर हे थालिपीठ मला फार आवडतं आणि दुसरं म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी म्हणजे दुपार चविष्ट होणार हे ठरलेल. किबोर्डबरोबर चाळा करत मी विचारलं “तुला बरा सारखा सारखा कंटाळा येतो स्वयपाकाचा!” त्याचं काय आहे, ईतकी वर्ष संसार केल्यानंतर कुठे ईतकीशी समजायला लागलीय बायको.

एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 05/06/2018 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद ५: अंबड- औरंगाबाद एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड योग- सायकल यात्रेचा चौथा दिवस, १४ मेची पहाट. आज अंबडवरून औरंगाबादला जायचं आहे.

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – २

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 05/06/2018 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

हुलग्याची (कुळीथ) शेंगोळी

लेखक शाली यांनी मंगळवार, 05/06/2018 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
ईथे ही माझी पहिलीच पाककृती आहे. आमच्या मावळप्रांताची ही पारंपारीक पाकृ आहे. शेंगोळी. हिची आवड एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येते. नविन मानसाला हा पदार्थ शक्यतो आवडत नाही. खायला आणि पहायलादेखील. खास केलेला पदार्थ शेजारी द्यायची पध्दत असल्याने मी हा प्रकार एकदा आमच्या शेजारी दिला होता पण त्यांनी पहाताक्षणीच “ई ऽ हे क्काये?” म्हणत असा काही चेहरा केला की विचारु नका. हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पिठाचा करतात अनेकजन. पण आम्ही हुलगेच (कुळीथ, हॉर्स ग्राम) वापरतो. त्या शिवाय मज्जा नाही.

"अथातो घाटजिज्ञासा" - भाग ३ रा

लेखक दिलीप वाटवे यांनी मंगळवार, 05/06/2018 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
.

'घाटवाटांची प्रशासन व्यवस्था'

घाटवाटांची प्रशासन व्यवस्था बहूतेक करुन सर्वात जास्त वाहतूक असलेल्या म्हणजे व्यापारी मार्गांवरच असे. कारण राजनैतिक दृष्टीने अशा वाटा अत्यंत महत्त्वाच्या असत. एकूणच संपुर्ण व्यापारी मार्गावर घाटमार्गाचा टप्पा अवघड आणि महत्वाचा असे. जसजसा काळ गेला तसतशा व्यापारी मार्गांवरच्या घाटवाटांतील त्रुटी समजू लागल्या आणि त्यानुसार त्यात सुधारणा होत गेल्या.

पदर

लेखक कहर यांनी मंगळवार, 05/06/2018 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
युष्या मला तुझी खबर मिळू दे केलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे प्रेमरोगी कधी होत नाही बरा औषधाच्या नावावर जहर मिळू दे जन्म जावो उभा वाळवंटी फिरून अंत समयी परी तुझे शहर मिळू दे काट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी कागद कोरा कराया रबर मिळू दे नको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष मिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे वाट पंढरीची सरता सरे ना झाली विठुनामी अमृताचा गजर मिळू दे मंजूर आहे मरण अगदी या क्षणीही एक तुझी हळहळती नजर मिळू दे किनाऱ्यावर आता नाही राहिली मजा खोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे सात जन्म संपत आले गोष्ट तरी बाकी सोबतीचा अजून एखादा प्रहर मिळू दे काहीच यातले वा नको तुझ्या कुशीत लपायला तु
काव्यरस

राजयोग - ९

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 05/06/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिरात कोलाहल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आषाढ चतुर्दशी होती. आजच रात्री मंदिरात चौदा देवतांची पूजा संपन्न होणार होती. सकाळी ताडाच्या झाडांमागून सूर्य उगवला तेव्हा आकाशात कुठेही ढगांचा मागमूस नव्हता. सोनेरी किरणांनी उजळून निघालेल्या मंदिराभोवतीच्या बागेत जयसिंह जाऊन बसला. लहानपणी त्यानं इथं घालवलेले सुखद क्षण त्याच्या मनात रुंजी घालू लागले. याच मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर, इथेच गोमतीच्या घाटावर, या सुंदर बागेच्या थंडगार सावलीत त्यानं जो काही काळ घालवला होता, तो आता त्याला एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे वाटू लागला.