Skip to main content

गट्टे बिर्याणी

लेखक manguu@mail.com यांनी शनिवार, 16/06/2018 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
गट्टे बिर्याणी १. भात : बासमती भात दोन वाट्या धुवुन अर्धा तास भिजुन निधळून घ्यावा. अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. शिजताना त्यात तेल १ चमचा, मीठ , तमालपत्र आणि बिर्याणी मसाला एक चमचा घालावे. भात बाजूला ठेवावा. २. गट्टे : एक वाटी बेसन पीठ , तेल, मीठ , तिखट, धना - जिरा पावडर घालून घट्ट मळून घ्यावे. त्याचे लांबट रोल करुन शिजवुन घ्यावेत. गार झाले की तुकडे करावेत. ३. भाज्या : कांदा , गाजर , बटाटा यांचे मोठे तुकडे , मटार , कॉर्न भात शिजून जितकी क्वांटीटी होईल , भाज्या - गट्टे ह्यांचीही साधारण तितकीच क्वांटिटी हवी, या बेताने गट्टे व भाज्या घ्याव्यात. ४.

अनवट किल्ले ३४ : बिष्टा ( Bishta )

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 16/06/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
अनवट किल्ले मालिकेत मी आज सटाणा परिसरातील दुर्ग चौकडीविषयी लिहीणार आहे, अजमेरा, दुंधा, कर्‍हा आणि बिष्टा. तुम्ही म्हणाल, 'आम्ही यांची नावेही कधी एकली नाहीत'. अगदी खरे आहे, महाराष्ट्रातील काही मोजके दुर्गभटके सोडले तर फार कोणी हे किल्ले पहाणे सोडा, एकले तरी असतील कि नाही याचीच शंका. अर्थात यावर असलेल्या मंदिरांमुळे आणि यात्रांमुळे परिसरातील गावकर्‍यांचा यावर अपवादात्मक वावर असतो, तो सोडला तर इथे फारसे कोणी फिरकतही नाही. अर्थात या उपेक्षित किल्ल्यांचे अंतरंग समजावेत म्हणूनच या मालिकेच्या लेखनाची यातायात.

पार्टीतून कमी झालेला ग्लास

लेखक शाली यांनी शनिवार, 16/06/2018 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
ऊचलावा त्या दगडाखाली विंचू निघायचे दिवस होते आयुष्यातले. काहीच मनासारखं होत नव्हते. नुकतेच ईंजिनिअरींगचं शेवटचं वर्ष पुर्ण केलेले. तेही ऊत्तम मार्कांनी. पण “काहीही झाले तरी नोकरी करणार नाही” हा बाणा. आणि वडीलांचे म्हणने “अनुभव येईपर्यंत नोकरी कर वर्ष दोन वर्ष, मग पाहू आपण व्यवसायाचे काहीतरी.” खरंतर माझं आणि वडीलांचे फार छान जमायचं. आई कधी कधी वडीलांवर फार चिडायची. “अहो, तो मुलगा आहे तुमचा, मित्र नाही. जरा ओरडा त्याला” म्हणायची आणि काही फरक पडणार नाही हे माहित असल्यामुळे स्वतःच चिडचीड करायची.

ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता ( उत्तरार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 16/06/2018 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध https://www.misalpav.com/node/42796 इथे आहे ************** ‘ड’चा अभाव आणि आजार : हा मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये दिसून येतो. अशा अभावाने calcium ची रक्तपातळी नीट राखण्यात अडचण येते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. मुलांमध्ये होणाऱ्या आजाराला ‘मुडदूस’ म्हणतात. त्यामध्ये अभावाच्या तीव्रतेनुसार खालील लक्षणे दिसू शकतात: डोक्याचा खूप मोठा आकार बरगड्या व पाठीचा कणा वाकणे मोठे पोट पाय धनुष्यकृती आकारात वाकणे मूल वेळेत चालायला न लागणे दात योग्य वेळेवर न येणे वृद्धांमध्ये हाडे व स्नायूदुखी आढळते.

गूढ अंधारातील जग -९ पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 16/06/2018 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -९ पुढे पाणबुडीतील सैनिकांचे मानसिक प्रश्न हे सामान्य सैनिकांपेक्षा वेगळे असतात. धातूच्या नळकांड्यात बंद असताना बाहेरचे काहीही दिसत नाही. जेवढे दिसते ते यंत्राच्या पडद्यावरच, ते सुद्धा प्रकाशमान बिंदूंची आकृती, जी आपण प्रत्यक्षात कधीच पाहिलेली नसते. त्यातून तुम्ही शत्रूच्या प्रदेशात किंवा जवळ गस्तीसाठी जाता तेंव्हा शत्रूने पेरून ठेवलेले पाणसुरूंग किंवा शत्रूच्या गस्त घालणाऱ्या पाणबुड्या यांच्याशी सामना होण्याची सतत असणारी भीती. शिवाय शत्रूचे टेहळणी करणारे उपग्रह किंवा विमाने आणि जहाजे यांची भीती.

कवितेचे पान - ऑनलाईन कवितेची मैफिल

लेखक पारुबाई यांनी शनिवार, 16/06/2018 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हा काही खास रसिकांचा प्रांत. कवितेवर प्रेम करणारे लोक नेहमीच एका सुरेख कल्पनाविश्वात वावरत असतात. वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचणे, ऐकणे, संग्रह करणे, काव्यवाचनाचे कार्यक्रम पाहणे आणि इतर रसिकांना आपल्याला स्वतःला आवडलेल्या कविता ऐकवणे, अश्या नादात ते मश्गुल असतात. या रसिकांची बातच निराळी.आणि एखाद्या प्रसंगी एखादी चपखल कविता किंवा अगदी अचूक अश्या कवितेच्या दोनच ओळी ऐकवणे अश्या गोष्टींमध्ये यांचे आनंद डुलत असतात. ऐकणारा आणि ऐकवणारा जर या धामधुमीत एकाच जातकुळीचा निघाला तर मग होणारा आनंद केवळ अवर्णनीय. मी देखील अशीच एक काव्य रसिक. लग्नापूर्वी २०-25 वर्षांपूर्वी पुण्यात असताना बी. जे.

ग्रामीण आणि इतर वाद्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/06/2018 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तीस चाळीस वर्षांपूर्वी गावात बँड हा प्रकार फोफावला नव्हता. बँड अस्तित्वात असला तरी तो फक्‍त जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या गावी पोचला होता. तरीही अतिश्रीमंत घरातल्या लग्नात दूरवरून गावात बँड बोलवला जायचा. म्हणून अशा बँड ‍लावल्या गेलेल्या लग्नाची मजा पाहण्या- ऐकण्यासाठी आख्‍खा गाव जमा व्हायचा. बँडची नवलाई आख्या गावाला भुरळ घालायची. अन्यथा गावात गुरवचा वाजा वा सांबळचा वाजाच लग्नात वाजवले जायचे. आता तर सगळीकडे डीजेचा आवाज धुमाकूळ घालू लागला. तेव्हा सांबळाचा वाजा गावकुसात लोकप्रिय होता. सांबळाच्या वाजावर कोणालाही कोणत्याही चालीवर सहज नाचता येत असे.

Wavy Bob - माझी पहिली कादंबरी आता उपलब्ध!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 15/06/2018 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे अधून-मधून मी डोकावून जात होतो पण बर्‍याच व्यवधानांमुळे इकडे येणे थोडे कमीच झाले होते. आता माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली म्हणून त्याची जाहिरात करायला म्हणून आलोय असा आळ माझ्यावर येण्याची शक्यता आहे. :-) खोटे कशाला बोला; अगदी तसे नाहीच असे ठामपणे म्हणायला मी धजावणार नाही. मिपाकरांसमोर खोटे बोलायला जिवावर येते. अर्थात, अधून-मधून माझी हजेरी होतीच आणि वावर, प्रतिक्रिया आणि वाचनापुरता का असेना पण होता. तरी माझे मिपा कुटुंब मला समजून घेईल अशी खात्री आहे.

प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 15/06/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला होता. त्यावेळी याविषयी थोडे वाचले देखील होते. यावर्षी मात्र, मृगाचा किडा पाहताना, ते वाचलेले सर्व आठवले व एक वेगळाच विचार मनात येऊन गेला. आता थोडा थोडा आठवुन इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.