पावसाळी भटकंती : संतोषगड (Santoshgad)
महाराष्ट्राचे देश व कोकण असे दोन भौगोलीक भाग करण्यात दक्षीणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीचा मोठा वाटा आहे. या सह्याद्रीला पश्चिमेला कोकाणात आणि पुर्वेला देशावर डोंगररांगाचे फाटे फुटलेत. अजंठा-सातमाळा, हरिश्चंद्र-बालाघाट, सेलबारी-डोलबारी अशा काही यातील प्रमुख रांगा. अशीच आणखी एक रांग दक्षीण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आहे. या रांगेच्या शेवटी शिखरांच्या राजाचे शंभु महादेवाचे "शिखर शिंगणापुर" हे देवस्थान आहे. यामुळे या रांगेला "शंभु महादेव डोंगररांग" म्हणतात.
मिसळपाव
